' मेस्सी, रोनाल्डोसारख्या दिग्गजांच्या चेंडू आणि गोलपोस्टमधला नवा पहारेकरी गवसलाय!

मेस्सी, रोनाल्डोसारख्या दिग्गजांच्या चेंडू आणि गोलपोस्टमधला नवा पहारेकरी गवसलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

world-cup-2018-inmarathi

 

२०१८ साली रशियामध्ये फिफा वर्ल्ड कपची धूम सुरु होती. फुटबॉल म्हटलं, की आपल्याला दोनच नावं आठवतात. एक म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो आणि दुसरा लिओनेल मेसी!

हे दोघेही फुटबॉलच्या खेळातील लेजन्ड मानले जातात. जेव्हा हे दोघे मैदानावर उतरतात तेव्हा सर्वांच्या नजरा फक्त ह्यांच्यावर खिळलेल्या असतात. जेव्हा ह्यांच्या पायाशी बॉल असतो तेव्हा तो कधी गोलपोस्टमध्ये जाऊन गोल होईल हे सांगता येत नाही.

 

Messi-Ronaldo-inmarathi

 

पण २०१८ च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये काही वेगळंच दृश्य प्रेक्षकांना बघायला मिळालं होतं. या स्पर्धेत एक गोलकीपर रोनाल्डो आणि मेसी ह्या दोघांनाही गोलपोस्ट पर्यंत पोहोचूच देत नव्हता.

हा तोच गोलकीपर आहे ज्याने मेसीची पेनल्टी किक अप्रतिमरित्या रोखून सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेतले. तो खेळाडू म्हणजे Hannes Thor Halldorsson.

 

Hannes Thor Halldorsson-inmarathi03

 

Hannes Thor Halldorsson हा एक गोलकीपर असून तो आईसलंडच्या टिमकडून खेळतो. फिफा वर्ल्ड कप दरम्यान अर्जेंटिना आईसलंडमध्ये झालेल्या एका सामन्यात मेसीने गोल करण्यासाठी एकूण ११ शॉट मारले, पण एकदाही त्याला गोल करता आला नाही. आणि त्याचे कारण म्हणजे Halldorsson.

जेव्हा हा सामना १-१ च्या बरोबरीत येऊन संपला तेव्हा मेसीला पेनल्टी किक मिळाली. आता मेसी पेनल्टी किक मारणार म्हणजे तिथेच जिंकलो आपण असे अर्जेंटिनाच्या टीमला वाटले.

पण घडले अगदी उलट. कदाचित ह्याचा विचार मेसीनेही केला नसावा. मेसीने आपल्या शैलीत पूर्ण ताकदीने आणि चतुराईने तो शॉट मारला; पण Halldorsson ने आपल्या उजव्या बाजूने जबरदस्त डाइव्ह घेत तो गोल थांबवला. अखेर हा सामना १-१ च्या बरोबरीनेच संपला.

 

Cristiano_Ronaldo-inmarathi

 

असचं काहीसं रोनाल्डो सोबतही घडलं होतं. युरो कप २०१६ दरम्यान तेव्हा रोनाल्डोने गोल करण्यासाठी जवळपास १० शॉट मारले पण Halldorsson ने त्याचा एकही शॉट गोलपर्यंत पोहोचू दिला नाही.

हा सामना देखील १-१ च्या बरोबरीत संपला होता. म्हणून आता Halldorsson देखील मेसी आणि रोनाल्डो प्रमाणेच चर्चेत आहेत.

 

Hannes Thor Halldorsson-inmarathi06

 

Halldorsson ने एक फुटबॉलर म्हणून कुठलंही वर्ल्ड क्लास ट्रेनिंग घेतलेलं नाही. एक चांगला खेळाडू बनण्यासाठी त्याने स्वतःच मैदानावर घाम गाळत गोलकीपर आणि स्ट्राईकरचा सराव केला.

आपल्या करिअरच्या सुरवातीला त्याने एका भितींवर स्वतः बॉल किक करून गोल किपींगचा सराव केला.

 

Hannes Thor Halldorsson-inmarathi

 

जेव्हा Halldorsson २० वर्षांचा होता तेव्हा त्याला थर्ड डिव्हिजन टिममधून काढण्यात आले होते. ह्यावेळी त्याने फुटबॉल सोडून द्यायचा विचार केला होता.

त्याचं आणखी एक स्वप्न होतं. चित्रपट दिग्दर्शन करण्याचं! त्या मार्गाकडे जाण्याचा निश्चय केला. पण त्याच्या वडिलांनी त्याला “फुटबॉल सोडू नकोस, तुझं गोलकीपर होण्याचं स्वप्न पूर्ण कर”, असं सांगितलं.

त्यानंतर Halldorsson ह्याने दिवसरात्र सराव करून अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलं, Halldorsson हा आज जगातील सर्वात उत्कृष्ट गोलकीपर्स पैकी एक आहे.

 

Hannes Thor Halldorsson-inmarathi05

 

पण त्यानं त्याचं चित्रपट दिग्दर्शनाचं स्वप्न देखील सोडलं नाही. त्याने दहाव्या वर्गात असल्यापासूनच काही संगीत व्हिडीओज बनवायला सुरवात केली होती.

तो गर्ल बॅण्ड ‘नायलॉन’ करिता व्हिडीओज बनवायचा. तसेच त्यांनी टीव्हीवरील अनेक जाहिराती, चित्रपट आणि कार्यक्रमांसाठी देखील दिग्दर्शन केलं आहे.

 

 

Coca Cola च्या फिफा वर्ल्ड कप थीमची ही जाहिरात देखील त्यांच्याच दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. त्याला जेव्हा जेव्हा फुटबॉलमधून फावला वेळ मिळतो, तेव्हा तो दिग्दर्शन करतो.

 

Hannes Thor Halldorsson-inmarathi01

Hannes Thor Halldorsson च्या रुपात फुटबॉल प्रेमींना आता एक नवीन हिरो आणि आयडॉल मिळाला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?