'थंडीच्या दिवसात तोंडातून वाफ का निघते? समजून घ्या..

थंडीच्या दिवसात तोंडातून वाफ का निघते? समजून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

हिवाळा हा ऋतू सर्वांनाच आवडणारा ऋतू आहे. हिवाळ्याची ती दवबिंदूची सकाळ, दिवसभर अंगाला झोंबणारा तो थंड वारा, गोदडीतली ती उबदार रात्र, जागोजागी पेटणाऱ्या शेकोट्या. असा हा हिवाळ्याचा ऋतू आपल्यासोबत अनेक गोष्टी आणि नवन अनुभव घेऊन येत असतो. जसे की खूप थंडी असली की आपल्या तोंडातून वाफ येते. हे बघून आपल्याला जरी नवल वाटत नसलं तरी लहान मुलांना मात्र मजा येते, म्हणून ते मुद्दाम तोंडातून वाफ काढण्याचा प्रयत्न करतात.

 

winter-Vapor-inmarathi01
scienceabc.com

त्यांच्यासाठी हे एखाद्या जादूसारख असतं. आपण लहान असताना आपल्यासाठी देखील ही एक जादूच होती. कारण तेव्हा माहित नव्हतं की, तोंडातून वाफ का येते? पण तुम्हाला माहित आहे ना थंडीच्या दिवसांत तोंडातून वाफ का निघते ते?

कदाचित तुम्हाला आजही ह्याचं उत्तर मिळालेलं नसावं.

 

winter-Vapor-inmarathi04
rocketstock.com

तर श्वासोच्छवास प्रक्रीयेदरम्यान आपल्या शरीरात कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते. आपली फुफ्फुस ह्या पाण्याचं बाष्पीभवन करून ही वाफ तोंडाद्वारे आणि नाकाद्वारे बाहेर टाकण्याचं काम करते. श्वसन आणि पचन ह्या दोन्ही कार्यादरम्यान ही प्रक्रिया घडत असते. तसेच आपण जे पाणी पित असतो ते देखील मूत्र, घाम आणि बाष्पीभवना द्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते.

 

winter-Vapor-inmarathi03
istockphoto.com

थंडीच्या दिवसांत शरीराबाहेरील वातावरणाचे तापमान हे अतिशय कमी असते. अश्यात मग जेव्हा ही पाण्याची वाफ श्वासासोबत बाहेर येते तेव्हा ती कंडेन्स्ड होऊन पाण्याच्या लहान लहान कणांचे ढग तयार होतात. आणि ते तोंडातून बाहेर येताना धुव्यासारखे दिसतात. ज्याला आपण तोंडातून वाफ निघणे म्हणतो.

 

winter-Vapor-inmarathi
twoeggz.com

आता हे हिवाळ्यातच का होते उन्हाळ्यात का नाही ते जाणून घेऊ :

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराच्या बाहेरील वातावरणाचे तापमान हे शरीराच्या तापमानापेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे जेव्हा शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ती तोंडाद्वारे बाहेर येते तेव्हा ते पाण्याचे कण कंडेन्स्ड होऊ शकत नाही आणि बाष्पीभवनाची प्रक्रिया जलद गतीने होते. ज्यामुळे तोंडातून वाफ येताना दिसत नाही.

 

winter-Vapor-inmarathi02
ijpr.org

तर आता तुम्हाला नक्की कळाल असेलं की हिवाळ्यात तोंडातून वाफ का निघते आणि उन्हाळ्यात का येत नाही…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?