विविध देशांच्या चलनी नोटांनी केलेले हे अनोखे विक्रम वाचून थक्क व्हाल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

वर्ल्ड रेकॉर्ड हे फक्त माणसांनीच करावे, किंवा त्यांच्याच नवे असावे असा कुठलाही नियम नाही. काही वर्ल्ड रेकॉर्ड हे नोटांनी देखील बनविले आहेत. म्हणजे हे नोट केवळ वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्यासाठीच कामी येत नाही तर नोटांचा देखील स्वतःचा वर्ल्ड रेकॉर्ड बनू शकतो. हे आपल्याला विचित्र जरी वाटत असले तरी ते रेकॉर्ड झालेले आहेत.

१४ शून्य :

 

currency world record-inmarathi

झिम्बाब्वेमध्ये खूप महागाई आहे, हा देश नेहेमी आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहिला आहे. पण ह्याच देशातील नोटांनी एक विचित्र असा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. २००९ साली झिम्बाब्वेमध्ये एक नवा नोट जरी करण्यात आला होता, ह्या नोटेवर दोन-तीन नाही तर चक्क १४ शून्य होते. म्हणजे ही एक नोट जवळपास १०००० अरब डॉलर एवढी होती.

सर्वात महाग नोट :

 

 

जगातील सर्वात महाग नोट म्हणवून घेण्याचा मान हा सिंगापूरच्या डॉलरला मिळाला आहे. ही नोट १९७३ साली जारी करण्यात आली होती, जी १०००० डॉलरची होती. ह्या नोटेचे मुली हे जवळपास ४.५ लाख एवढे होते. पण काही काळाने भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी ही नोट बाद ठरविण्यात आली.

सर्वात लहान आकाराची नोट :

 

currency world raecord-inmarathi02

 

पूर्व युरोप येथील रोमानियन लियु नोटेच्या नवे जगातील सर्वात लहान आकाराची नोट असण्याचा रेकॉर्ड आहे. १० लियुची एक नोट २७*३८ मिलीमीटर एवढ्या आकाराची आहे. म्हणजे आपल्या कडील एका पोस्टाच्या तिकीटाएवढी ती एक नोट असेलं. युद्धादरम्यान कच्च्या मालाची कमतरता झाल्याने ह्या नोटेला एवढे लहान आकाराचे छापण्यात आले.

१०० च्या वरील नोटांवर बंदी :

 

currency world record-inmarathi03

 

चीनमध्ये भ्रष्ट्राचार आणि काळाबाजारी थांबविण्यासाठी १०० युआन च्या वरच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. ह्यामुळे तिथल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

सर्वात हायटेक नोट :

 

currency world record-inmarathi04

 

सर्वात हायटेक नोटेचा मान हा युरो झोनच्या सामान्य चलन युरोला मिळाला आहे. येथील ५० युरोच्या नोटेची कॉपी करणे अशक्य असल्याचे म्हटल्या जाते. ह्या नोटेला जर वॉशिंग मशीनमध्ये ९० डिग्री तापमानावर धुण्यात आले तरी ह्या नोटेला काहीही होणार नाही. ही नोट अनेक रसायनांना देखील सहन करू शकते, त्यामुळे येथे ५० युरोची नोट सर्वात जास्त वापरात आणली जाते.

व्हर्च्युअल चलन :

 

inmarathi.com

बिटकॉईन हे एक व्हर्च्युअल चलन आहे, तरी देखील इंटरनेट तर्फे होणाऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये ह्याचा खूप वापर केला जातो. हे चलन सातोषी नाकामोतो द्वारे २००८ साली लॉन्च केले गेले. काळानुसार ह्यात सुधारणा होत गेली आणि आता हे चलन ऑफिशियल करन्सी एक्स्चेंज रेटमध्ये देखील वापरले जाते.

छायाचित्रांचा स्त्रोत : dw.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “विविध देशांच्या चलनी नोटांनी केलेले हे अनोखे विक्रम वाचून थक्क व्हाल!

  • December 15, 2018 at 5:54 pm
    Permalink

    good information…expalain in detail about Bitcoin?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?