' कोण म्हणतो “गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो”…? हे वाचा – गैरसमज दूर करा…! – InMarathi

कोण म्हणतो “गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो”…? हे वाचा – गैरसमज दूर करा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ज्या लोकांना खूप गोड अन्नपदार्थ खायची सवय असते त्या लोकांना नेहमी एक सल्ला दिला जातो की गोड जास्त खाऊ नका डायबेटीस होईल. पण खरंच असं होतं का?

हे सत्य आहे की जर तुम्हाला आधीपासूनच डायबेटीस असेल तर तुम्ही साखर युक्त गोड पदार्थ खाणे टाळले पाहिजे. पण तुम्हाला डायबेटीस नसेल आणि तुम्ही गोड पदार्थांचं सेवन करत असाल तर तुम्हाला डायबेटीस होण्याचा धोका असतो का?

 

diabetes featured inmarathi

 

जर तुम्हाला गोडपदार्थ खायला आवडत असतील तर तुम्ही हे नक्की वाचा.

साखर म्हणजे नेमकं काय?

साखर हे एक भाजीपाला, फळ आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारा एक घटक आहे. आपण साखरेचं सेवन प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या करत असतो. साखर जी आपण आपल्या चहा आणि इतर द्रव्यामध्ये टाकत असतो तिला अतिरिक्त टाकलेली साखर (Added Sugar) म्हणतात.

त्यात टेबल शुगर, जिचा वापर चहा बनवण्यासाठी होतो, कॅस्टर शुगर ( खडी साखर अथवा बारीक साखर) जिचा वापर नाश्ता, खाद्यपदार्थ, केक आणि इतर पदार्थांच्या निर्मितीत केला जातो.

 

sweet InMarathi

 

डायबेटीस आणि साखर

२ प्रकारचे डायबेटीस आहेत. एक Type 1 आणि एक आहे Type 2 डायबेटीस. यांचातील फरक आपण जाणून घेऊयात :

टाईप 1 डायबेटीस :

या प्रकारच्या डायबेटीस मध्ये शरीरातील immune cells, Insulin तयार करणाऱ्या Cells ला संपवतात. त्यामुळे साखरेचं प्रमाण रक्तात वाढतं आणि डायबेटीस होतो.

टाईप 2 डायबेटीस

शरीर स्वादुपिंडात तयार झालेल्या इन्सुलिनला वापरू शकत नाही.

महत्वपूर्ण बाब ही आहे की यापैकी कुठलाच डायबेटीस साखर खाल्याने होत नाही तर तो शरीरातील प्रक्रियेत झालेल्या बिघाडामुळे होत असतो. टाईप 2 डायबेटीस हा जास्त जाड झाल्याने पण होत असतो.

 

overcoming Diabetes InMarathi

 

हे स्थिर जीवनशैली, जंक फूडचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने होतं असतं. हा डायबेटीस अप्रत्यक्षपणे साखरेशी जोडला जाऊ शकतो. (जी जंक फूड आणि पेयामध्ये असते)

 

junk food eating inmarathi

 

त्यामुळे बाहेरील जंक फूड अधिकप्रमाणात खाल्ल्यास टाईप 2 डायबेटीसची रिस्क वाढते. परंतु टाईप 2 डायबेटीस इतक्या सहजासहजी होत नसतो. तो अभ्यासायला खूप कठीण आहे. परंतु साखर हे डायबेटीस होण्याचं एकमेव कारण नक्कीच नाही.

डायबेटीस पीडित व्यक्ती साखरेचं सेवन करू शकते का?

जर तुम्हाला आधीपासूनच डायबेटीस असेल तर असं नाही की तुम्ही गोड पदार्थ खाणे बंद केले पाहिजे. जर तुम्ही कमीप्रमाणात सेवन करत असाल तर जास्त त्रास उदभवत नाही.

 

suger inmarathi

 

काही लोकांसाठी ग्लुकोजच्या गोळ्या खाणं गरजेचं असतं, जेव्हा साखरेची हायपो लेव्हल होते अर्थात साखरेची पातळी खूप कमी होते. ( हे फक्त तेव्हाच होत जेव्हा खूप संतुलित आहार सेवन केला जातो, व्यायाम केला जातो आणि योग्य जेवनाचं सेवन केल जात नाही.)

परंतु शरीरात जर साखरेचं प्रमाण खुप जास्त वाढलं तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजार देखील उदभवू शकतात. त्यामुळे तर प्रमाण कमी राखले गेले पाहिजे.

 

diabetes symptoms inmarathi

 

 

शरीराला आवश्यक साखरेची मात्रा :

एका वयस्क माणसासाठी, ज्याचा BMI नॉर्मल आहे, त्याला आहारात रोज 6 चमचे साखर असायला हवी असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सुचवण्यात आलं आहे.

कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात सेवन केली तर ती शरीरासाठी अपायकारक ठरते. जरी साखरेने डायबेटीस होत नसला तरी अप्रत्यक्षरित्या ते एक कारण आहे. त्यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणं हेच आरोग्याला हितदायी ठरेल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?