' जर तुम्ही पोह्यातील हे गुण जाणून घेतले कधीही पोह्यांना 'नाही' म्हणणार नाही

जर तुम्ही पोह्यातील हे गुण जाणून घेतले कधीही पोह्यांना ‘नाही’ म्हणणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आरोगाच्या दृष्टीने सकाळचा पहिला नाश्ता खूप महत्वाचा असतो हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे सकाळचा नाश्ता कधीही मिस करायला नको.

डॉक्टर्स आणि डायटीशियन्स देखील सकाळचा नाश्ता न विसरता करण्याचा सल्ला देतात. पण आता सकाळी नाश्ता नेमका काय करायचा किंवा नाश्त्यात कुठला पदार्थ खाल्ला की तो आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरेल, हे अनेकांना माहित नसतं.

आपण नाश्ता तर करतो पण तो कदाचित चुकीचा करतो. पण आम्ही आपल्याला आपल्याच एका अश्या नाश्त्याबाबत सांगणार आहोत जो तुम्ही रोज घेऊ शकता आणि त्याचा तुमच्या शरीरावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही.

तो पदार्थ म्हणजे पोहे. पोहे हे केवळ बघण्याच्या कार्यक्रमात दोन व्यक्तींची ओळखच करवून देत नाहीत तर ते आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी देखील असतात.

१. शुगर लेव्हल नियंत्रणात राहते :

 

diabetes-inmarathi02

 

पोह्यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असतात, त्यामुळे हा शरीरात साखरेच प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम करते.

२. प्रकाशाचे गुण :

 

poha-inmarathi05

 

पोहे बनविण्यासाठी एका विशेष प्रकारच्या धान्याला उकडून अनेक तासांसाठी उन्हात सुकवले जाते. ह्या प्रक्रीयेदरम्यान पोह्यात अनेक प्रकारची प्रोटीन्स आणि कार्ब्स तयार होतात. ज्यांना पचविणे अगदी सहज असते. आणि ते शरीरासाठी देखील फायद्याचे ठरते.

३. हेल्दी कार्ब्स :

 

poha-inmarathi01

 

पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाइड्रेट आणि ३३ टक्के फॅट असतात. ह्यात आढळणाऱ्या कार्ब्समुळे तुम्हाला दिवसभर उर्जा मिळत असते.

४. पचवायला सोपं असतं :

पोह्यात खूप मोठ्या प्रमाणात आयरन असतं, आणि आयरन हे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असल्याचं मानल्या जाते. गर्भवती महिलांमध्ये नेहेमी आयरनची कमी बघितली जाते. अश्यात मग गर्भवती महिलांच्या आहारात पोहे असणे हे खरंच फायद्याचं ठरू शकतं.

५. कॅलरीजचे प्रमाण :

 

weight-loss-inmarathi

 

एक प्लेट पोह्यात जवळपास २५० कॅलरीज असतात. सोबतच ह्यात मोठ्या प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे पोहे शरीरासाठी खूप हेल्दी असतात.

६. ग्लूटन फ्री :

पोह्यात ग्लूटन नसते. त्यामुळे देखील हे शरीरासाठी खूप फायद्याचे असते. हे पचवायला सोपे जाते. त्यामुळे  पोटाचा त्रास असणाऱ्या लोकांनी पोह्यांचे सेवन करावे.

७. हाडांसाठी फायद्याचं :

 

curd InMarathi

 

पोह्यांसोबत एक वाटी दही खाल्याने ते तुमच्या हाडांना मजबूत करण्याचं काम करेल. ह्याने शरीरातील कॅलशियमचे प्रमाण वाढते.

८. प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत :

 

poha-inmarathi04

 

पोह्यात प्रोटीन्स देखील खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे योग किंवा वर्कआउट केल्यावर पोहे खाण्याचा सल्ला दिला जातो.

ऑलिव ऑईल, सोयाबीनच्या वड्या, शेंगदाणे, दही, नारळाच तेल इत्यादी सर्वांचा उपयोग जर आपण पोहे बनविण्यासाठी केला तर ते खूप एक हेल्दी असा पदार्थ बनू शकेल.

म्हणजे आपले देसी पोहे हे किती गुणकारी आहेत, त्यात किती गुणकारी गोष्टी लपलेल्या आहेत जे जाणून घेतल्यानंतर इतर प्रोटिन्स ड्रिंक घेण्यापेक्षा नाश्त्याला चविष्ट पोहे खा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?