'तुमच्या रोजच्या आहारातील, आवडीचा पदार्थ - अतिसेवनाने करतो प्रचंड मोठा घात!

तुमच्या रोजच्या आहारातील, आवडीचा पदार्थ – अतिसेवनाने करतो प्रचंड मोठा घात!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

असं म्हणतात की फक्त आहाराच्या सवयी योग्य असतील तर आरोग्य निरोगी रहातं. परंतु बहुतेकांचं इथेच चुकतं! काय खावं, काय खाऊ नये – ह्याचं पथ्य पाळलं जात नाही आणि विविध आजार, विकारांना आमंत्रण जातं!

रोजच्या आहारातील असे काही पदार्थ असतात जे अति-सेवनाने हानिकारक ठरतात. अश्याच पदार्थांमधील एक म्हणजे – साखर!

कधी आपल्याला काही गोडधोड खायची इच्छा झाली की लगेच आपण शिरा, खीर किंवा इतर कुठला पदार्थ बनवतो. आता गोड पदार्थ म्हटल की त्यात सर्वात महत्वाचा घटक असतो ती म्हणजे साखर.

साधारणपणे आपण रोजच ह्या साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो, ज्याची सुरवात आपल्या सकाळच्या चहाने होते. पण आपण हे विसरतो आहोत की साखर हे एक हळूहळू चढत जाणारे विष आहे. गोड चव देऊन ही आपल्या शरीरात विष पसरविण्याच काम करत आहे. आता तुम्ही तर हे ऐकलच असेल की, साखर हे पांढरं विष असतं. पण साखरेला पांढरं विष का म्हटलं जात असेल ह्याचा विचार केलाय? आणि ती कश्याप्रकारे आपल्या शरीरात विष पसरवते ते जाणून घेऊ…

पचन क्रिया मंदावते :

 

 

साखरेचं अति प्रमाणात सेवन केल्याने त्यामुळे शरीरात आम्ल बनायला लागतात. त्यामुळे पोटात गॅस तयार होते. साखरेला पूर्णपणे पचविण्यासाठी ५०० कॅलरीज खर्च होतात, म्हणजे शरीराला साखर पचविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जर साखरेचे सेवन केल्यावर फिजिकल वर्क नाही केलं तर शरीरात नुकसानकारक केमिकल रिअॅक्शनहोऊ लागते, त्यामुळे पचन क्रिया मंदावते.

लठ्ठपणा आणि मधुमेह :

obesity-inmarathi05
drweil.com

साखरेत पोषकतत्वांची कमतरता तर कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे खूप जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. त्यासोबतच लठ्ठपणामुळे अनेक आजार आपल्याला होऊ शकतात. ज्यामध्ये मधुमेह हे देखील आहे.

वृद्धत्व लवकर येतं :

 

sugar-poison-inmarathi02
onlinehealth.wiki

हो साखरेचे अति प्रमाणात सेवन केल्याने आपण आपल्या वयापेक्षा जास्त दिसू लागतो. कारण साखरेमुळे रक्तातील अॅसिडचे प्रमाण वाढते ज्याचा दुष्परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्वचेवर रिंकल्सचे प्रमाण वाढत जातात, आणि आपण वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागतो.

दातांसाठी नुकसानदायक :

 

sugar-poison-inmarathi03
all-green.ca

सारखेचा अति वापर हा आपल्या दातांसाठी खूप नुकसानदायक असतो. कारण साखरेमुळे आपल्या दातावरील इनॅमल नष्ट होतं, तसेच साखरेमुळे वाईट बॅक्टेरियाज अगदी सहजपणे तोंडात निर्माण होतात ज्यामुळे आपल्या दातांना नुकसान पोहोचू शकते.

हाडांसाठी हानिकारक :

 

sugar-marathipizza00
rd.com

साखरेला पचविण्यासाठी आवश्यक असे कॅलशियम हे हाडांपासून आणि दातांपासून घेतले जाते. ज्यामुळे हाडांमधील कॅलशियम आणि फॉस्फोरस ह्यांचे संतुलन बिघडते आणि हाडे कमकुवत होऊ लागतात. ज्यामुळे ऑस्टिओपोरेसिस सारखे हाडांचे आजार होण्याची शक्यता बळावते.

मूड स्वींग्स :

 

mood-disorder-inmarathi
paradigmmalibu.com

जास्त साखर खाल्ल्याने व्यक्ती मूडी होऊ लागते तसेच ती तणावाखाली जाते. अश्या व्यक्तींमध्ये मूड स्वींग्स मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. असे व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहू शकत नाहीत.

विसरभोळेपणा वाढतो :

 

sugar-poison-inmarathi4
hugoanywhere.com

साखर जास्त प्रमाणात खाल्ल्याने तणावाच वाढ नाही तर आपण गोष्टी विअस्रायला देखील लागतो. त्याने विसरभोळेपणा वाढू लागतो.

आता साखरेचे एवढे दुष्परिणाम होतात हे जाणून एकदम साखर खाणे सोडू नये. कारण आपल्या शरीराला एका मर्यादित प्रमाणात साखरेची देखील गरज असते. कारण साखरेतुनच आपल्या शरीराला कार्बोहाइड्रेट आणि ग्लुकोज मिळत असतो. त्यामुळे साखर खा पण मर्यदित प्रमाणातच.

एक चमचा साखरेत जाल्पास ५० कॅलरीज असतात. जेव्हाकी आपल्या शरीराला साखरेतून मिळणाऱ्या कॅलरीज पैकी केवळ १० टक्के कॅलरीजची गरज असते. त्यामुळे साखरेचे सेवन हे जेवढ्या कमी प्रमाणात करू शकाल तुम्ही तेवढेच आजारांपासून दूर राहाल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?