‘लोकशाही’ देश असलेल्या ब्रिटनच्या ‘शाही’ कुटुंबाने बनवलेले विचित्र नियम आजही पाळले जातात !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

ब्रिटनच्या शाही कुटुंबाला आपल्या रोजच्या दिनचर्येत देखील अगदी शिस्तबद्ध पद्धतीने वावरावे लागते. अनेक नियमांचे पालन करावे लागते, जेव्हा ते प्रवास करतात तेव्हा त्यांना ह्या नियमांचे पालन करावे लागते. ह्यात त्यांच्या कपड्यांपासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्वकाही येतं.

महाराणी ह्यांना पासपोर्टची गरज नसते :

 

queen-elezabeth-inmarathi
tg24.sky.it

ब्रिटनच्या महाराणीजवळ पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स नसते. कारण त्यांना ह्याची गरजच पडत नाही. त्याच इतरांचे पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स इशू करतात. ब्रिटनच्या महाराणीजवळ सर्व हक्क असतात त्यामुळे त्यांना पासपोर्ट अथवा ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नसते.

ह्या कुटुंबातील दोन वारस सोबत प्रवास करू शकत नाही :

 

royal family of england-inmarathiroyal family of england-inmarathi
popsugar.com

ब्रिटनचे हे शाही कुटुंब अनेक वर्षांपासून ह्या परंपरेचे पालन करत आले आहे. म्हणजेच प्रिन्स विलियम्स आणि प्रिन्स हॅरी हे सोबत एका विमानात प्रवास करू शकत नाही.

जेणेकरून जर कधी प्रवासादरम्यान कुठला अपघात घडला किंवा विमान क्रॅश झाले तर दोघांपैकी एकतरी वारस सुरक्षित राहू शकेल. त्याचप्रकारे आता प्रिन्स विलियम्सचे मुलं देखील सोबत प्रवास करू शकत नाही.

महाराणीच्या जेवणाआधी जेवण संपवू शकत नाही :

 

royal family of england-inmarathi06
cheatsheet.com

शाही कुटुंबातील लहान मुलांना देखील हा नियम पाळावा लागतो. महाराणीचं जेवण पूर्ण होई पर्यंत कोणीही आपलं जेवण संपवून टेबल वरून उठू शकत नाही.

जेव्हा राणीचं जेवण संपेल तेव्हाच सर्वांच जेवण व्हायला हवं. एवढचं नाही तर येथे चहा आणि कॉफी पिण्यासाठी देखील नियम आहेत. कप कश्याप्रकारे पकडायचा आहे, कश्याप्रकारे चहाचा घोट घ्यायचा ह्यासाठी देखील नियम आहेत.

महाराणी उभ्या राहिल्या की सर्वांना उभे व्हावे लागते :

 

queen-elizabeth-inmarathi
royal.uk

फक्त शाही कुटुंबालाच नाही तर ब्रिटनमधील प्रत्येक व्यक्तीला हा नियम पाळावा लागतो. जेव्हा महाराणी उभ्या रहातील तेव्हा त्यांच्या आसपासच्या सर्व लोकांना देखील उभं राहावं लागतं, मग ती व्यक्ती ९० वर्षांची म्हातारी का असेना. सर्वांना महाराणीच्या आदरार्थ उभं राहावं लागतं.

ड्रेस कोड :

 

royal family of england-inmarathi03
evoke.ie

शाही कुटुंबातील सदस्य यात्रेदरम्यान देखील आरामदायक किंवा त्यांना जे आवडतील ते कपडे घालू शकत नाहीत. त्यातही त्यांना काही नियमांचे पालन करावे लागते. यात्रेदरम्यान त्यांना फॉर्मल ड्रेस, स्मार्ट सूट आणि ब्लेझरच घालावे लागते.

नुकतीच शाही कुटुंबाची सदस्य झालेली मेगन मार्कल हिने देखील शाही कुटुंबानुसार स्वतःचा ड्रेस कोड पूर्णपणे बदलला आहे. कितीही उष्णता असेल तरीही शाही कुटुंबातील सदस्यांना फॉर्मल कपडेच घालावे लागतात.

काळ्या कपड्यांचे महत्व :

 

royal family of england-inmarathi07
alloy.com

आपल्या देशापासून दूर गेल्यावर देखील ह्या शाही कुटुंबाला सर्व नियम कायद्यांचे पालन करावे लागते. त्यामुळे त्यांना आपल्यासोबत काळे कपडे देखील नेहेमी सोबत ठेवावे लागतात. जेणेकरून जर तिथे कोणाचा मृत्यू झाला, तर त्यावेळी ते काळे कपडे घालू शकतील.

ब्रिटनमध्ये कोणाचाही मृत्यू झाला तर शाही कुटुंबाला काळे कपडे घालणे गरजेचे असते. तसा त्यांचा नियम आहे आणि देशाबाहेर देखील त्यांना हा नियम पाळावा लागतो. त्यामुळे यात्रेवर जाताना त्यांना आपल्यासोबत काळे कपडे सोबत ठेवणे देखील बंधनकारक असते.

सेलफिश नाही खाऊ शकत :

 

royal-family-of-england-inmarathi05
travelandleisure.com

जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या ठिकाणी किंवा परदेशात जातो तेव्हा आपण तिथल्या जेवणाचा आस्वाद आवर्जून घेतो. तिथली स्पेशालिटी काय आहे ते नक्की खायला हवं, असं आपल्याला वाटत असतं. पण शाही कुटुंब तसं करू शकत नाही.

यात्रे, दरम्यान त्यांना सेलफिश मासा खाण्यास सख्त मनाई असते, तसेच ते इतर कुठल्याही देशातील नळाचे पाणी देखील पिऊ शकत नाही.

सेल्फी आणि ऑटोग्राफ नाही देता येत :

 

royal family of england-inmarathi04
popsugar.com

यात्रे दरम्यान शाही कुटुंबातील सदस्यांना कुणालाही सेल्फी किंवा ऑटोग्राफ देण्यास सख्त मनाई आहे. शाही कुटुंबातील कुठलीही व्यक्ती कुणासोबत सेल्फी घेऊ शकत नाही.

बसण्यासंबंधीचा नियम :

 

royal family of england-inmarathi02

 

शाही कुटुंबातील सदस्यांना बसण्यासाठी देखील नियमांचे पालन करावे लागते. त्यांच्या बसण्याची पद्धत ही सामान्य लोकांपेक्षा वेगळी असते. त्यांना बसण्यासाठी शाही पद्धतीचा अवलंब करावा लागतो, ते त्यांच्या इच्छेनुसार किंवा आरामदायक पद्धतीने बसू शकत नाही.

भलेही ते शाही कुटुंबाचा भाग असले तरी शाही कुटुंबातील सर्व सदस्यांना हे काही नियम पाळावे लागतात. जे आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी जेवढे विचित्र तेवढेच कठीण आहेत.

त्यामुळे ब्रिटनचे हे शाही कुटुंब जगातील सर्वात महाशक्तिशाली लोकांपैकी एक समजले जात असले, तरी त्यांना त्यांच्या रोजच्या दिनचर्येत आपल्या मनानुसार वागता देखील येत नाही, तर त्यांना शाही कुटुंबाचे सर्व नियम पाळावे लागतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?