'बियरवर चालणाऱ्या कारचा अचाट शोध आपल्या वाहतुकीचा चेहरामोहराच बदलून टाकेल का?

बियरवर चालणाऱ्या कारचा अचाट शोध आपल्या वाहतुकीचा चेहरामोहराच बदलून टाकेल का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आतापर्यंत बियरचा उपयोग हा केवळ पिण्यापुरता होता, पण आता बियर पेट्रोल आणि डिझलचं देखील काम करणार आहे. होय, लवकरच तुम्हाला तुमची कार बियरवर चालताना दिसू शकते. सध्या वैज्ञानिकांनी ह्यादिशेने पावलं उचलले आहेत. म्हणजे आता तुम्हीच नाही तर तुमची गाडी देखील बियर पिणार.

 

beer for car-inmarathi01
economist.com

ब्रिटनच्या ब्रिस्टल विश्वविद्यालयाच्या संशोधकांनुसार पेट्रोलच्या नवीकरणीय विकल्पाच्या स्वरुपात जगभरात मोठ्या प्रमाणात बॉयो- इथॅनॉलचा प्रयोग केला जाऊ शकतो. आपल्या कारमध्ये वापरला जाणारा इथॅनॉल गॅस हा पेट्रोल किंवा डिझल पासून तयार होत असतो. इथॅनॉल हा कुठेही सहज उपलब्ध असतो, पण त्याचा अतिवापर आपल्या कारसाठी नुकसानदायक ठरू शकतो.

 

beer for car-inmarathi02
danielhenriquefotografia.com.br

ह्या व्यक्तिरिक्त बूटनॉल हा पदार्थ ह्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण हा एवढ्या सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वैज्ञानिक इथॅनॉल ला बूटनॉल मध्ये परावर्तीत करण्याच्या पद्धती शोधात आहेत. ब्रिस्टल विश्वविद्यालयातील वैग्यानिकांनी इथॅनॉलला बूटनॉलमध्ये परावर्तीत करण्यासाठी कॅटालीस्टचा वापर केला आणि बियर सोबत त्याचे परीक्षण केले.

 

petrol-offers-inmarathi
businesstoday.in

ह्या प्रोजेक्टमधील डंकन वास ह्यांच्यानुसार, “बियर ही रसायनांच्या मिश्रणासाठी एक उत्कृष्ट मॉडेल आहे. ज्याचा आपल्याला अस्त्विक औद्योगिक प्रक्रियेत वापर करण्याची गरज आहे. मद्यांमध्येअल्कोहोल हे आणखी काही नसून इथॅनॉलच आहे. तेच अणू आम्हाला पेट्रोलच्या पर्यायी बूटनॉलमध्ये परावर्तीत करायचे आहे.”

 

beer for car-inmarathi
thedailymeal.com

सध्या ह्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर लागू करण्यात आणखी काही वेळ लागू शकतो, पण तरी आता पेट्रोल डिझलला आणखी एक विकल्प येणार हे नक्की. हा शोध पर्यावरणाच्या दृष्टीने खूप सुरक्षित ठरू शकतो. तसेच पेट्रोलचे वाढते दर आणि कमी साठा बघता हा खरंच एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?