ही असू शकतात किडनी खराब असण्याची लक्षणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सकाळी झोपेतून उठल्यावर झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करत असतो. आपण अश्यावेळी शारीरिक ताकदीचा पुरेपूर वापर करून घेत असतो.
बऱ्याचदा आपण आपल्या शरीराकडून येणाऱ्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष करतो. त्यातले बरेचसे शरीरातील एखाद्या अवयवाच्या बिघाडीचे असतात. पण जर आपण असेच दुर्लक्ष करत राहिलो तर काही गंभीर शारीरिक समस्यांचा भविष्यात सामना करावा लागू शकतो.
बऱ्याचदा हे असे सिग्नल्स किडनीसारख्या अवयवाकडून पाठवले जातात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने काही गंभीर परिणाम शरीरावर होतात. तर आपण आज अश्या नऊ समस्यांबाबत जाणून घेणार आहोत.
१. अपरात्री जाग येणे, झोप न येणे :
शरीरातील अनावश्यक घटक मुत्राशयामार्गे किडनीच्या मदतीने शरीराबाहेर काढले जातात. परंतु जेव्हा किडन्या व्यवस्थित काम करत नसतात तेव्हा अनावश्यक आणि अपायकारक घटक शरीरात जसेच्या तसे राहतात.
रक्तातील त्यांचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्त दुषित होत जाते. याचा सरळ परिणाम झोपेवर होत असतो. अपरात्री जाग येणे. झोप न येणे. हे किडनीचे कार्य व्यवस्थित सुरु नसल्याचे द्योतक आहे..
२. तांबड्या रक्तपेशींची संख्या कमी होणे :
किडनी ड जीवनसत्वाचे रुपांतर EPO या हार्मोनमध्ये करते. EPO हार्मोन शरीरातील लाल रक्तपेशीच्या वाढीवर नियंत्रण ठेवत असतो. जर किडनी व्यवस्थित काम करत नसतील तर शरीरातील लाल रक्तपेशीच्या निर्मितीवर त्याचा सरळ परिणाम होत असतो.
लाल रक्तपेशी ऑक्सिजन वाहून न्यायचे काम करत असतात. जर त्यांचीच संख्या कमी असेल तर ऑक्सिजनपुरवठा कमी होतो, त्यामुळे मांसपेशी आणि मेंदूच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
३. चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे :
–
हे ही वाचा – जेवणात रोज असणाऱ्या या पदार्थामुळे होऊ शकतो “किडनी स्टोन”? आज सत्य जाणून घ्याच
किडनीच्या विकारामुळे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका देखील निर्माण होत असतो. जर २० ते २५ % किडनीचे कार्य व्यवस्थित होत नसेल तर ही परिस्थिती उद्भवते. चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे आणि झोपताना थकवा जाणवणे याचे लक्षण आहेत.
४. शरीरातील पाणी कमी होणे :
जेव्हा किडनी शरीरातल्या आवश्यक गोष्टी आणि अनावश्यक घटकांचा ताळमेळ साधू शकत नाही. तेव्हा शरीरातील पाणी कमी होत जातं. शरीर कोरडे पडत जाते. शरीरातील पाणी कमी झाल्याने हाडांचे आजार उद्भवतात.
जास्त पाणी प्यायल्याने ह्या आजरावर सहज मात करता येउ शकते आणि पुढे उद्भवणारी धोक्याची परिस्थिती टाळली जाऊ शकते. फक्त डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्या.
५. तोंडाची दुर्गंधी येणे :
किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर अनावश्यक टाकाऊ पदार्थ शरीरात राहतात. त्यामुळे जिभेच्या चवीवर परिणाम होतो. तोंडाचा वास येतो. वजन प्रचंड कमी होत जातं.
विषारी पदार्थ रक्तात साचल्याने ते दुषित होते त्यामुळे रोग प्रतिकार शक्तीवर सुद्धा परिणाम होतो, असे काही लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
६. श्वास घेण्याची क्षमता कमी होणे :
–
हे ही वाचा – ‘किडनीला धर्म नसतो’ – सुषमाजींचं अविस्मरणीय उत्तर!
श्वास घेण्याची क्षमता कमी होणे देखील किडनी विकाराचे एक दृश्य लक्षण आहे. शरीरात असलेले एक्सेस फ्लुइड त्याला कारणीभूत असते, जे किडनीच्या कार्याविफलतेमुळे शरीराबाहेर पडू शकत नाही.
अनेमियामुळे देखील असे होऊ शकते ज्यात रक्त कॅन्सर पेशीमुळे व्यवस्थित भिसरीत होऊ शकत नाही.
७. अंगाला जास्त घाम येणे :
खूप जास्तवेळ एखाद्या ठिकाणी बसल्यावर तळव्याला घाम येणे, हे सुद्धा किडनी खराब असण्याचे लक्षण आहे. किडनीची अनावश्यक द्रव्ये काढून फेकण्याची क्षमता कमकुवत असल्याने असे होते.
बऱ्याचदा खालच्या अंगाला घाम येण्याचा विकार नसांमधील शक्तीहीनतेमुळे होत असतो. हृदयविकार आणि यकृताचे विकार देखील याला तितकेच कारणीभूत असतात.
८. पाठदुखी आणि पायदुखी :
पाठदुखी आणि पायदुखी किडनीच्या POLYCYSTIC प्रकारामुळे उद्भवत असतात. ह्यातील विकार हा मूलतः कमरेखालच्या अथवा बरगडी खालच्या भागात होत असतो.
यामुळे विषारी पदार्थ शरीराच्या वेगवेगळ्या भागात साचतात आणि आम्ल तयार करतात. ज्याने पुढे जाऊन हे विकार उद्भवतात.
९. लघवीचा त्रास :
लघवीचा त्रास होणे, ताप येणे, पाठ दुखणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. जास्त प्रमाणात पेनकिलर्स घेतल्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.
ह्यापैकी कुठलेही लक्षण तुमच्यात दिसत असेल तर तुम्ही डॉक्टर्सचा सल्ला वेळोवेळी घेतला पाहिजे आणि चेक अप करून घेतले पाहिजे. यामुळे शरीराचा धोका टळतो.
===
हे ही वाचा – किडनी ट्रान्सप्लांट का आणि कसे केले जाते ? जाणून घ्या..
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.