रेल्वे चुकली तर आरक्षणाचे पैसे परत मिळवण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया अशी आहे..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
आज ट्रेनने देशाचा एक खूप मोठा वर्ग प्रवास करतो.
इतर कुठल्याही वाहतूक सुविधांपेक्षा ट्रेनला जास्त पसंती देतात. कदाचितच असं कोणी असेलं ज्याने आयुष्यात आजवर कधीही ट्रेनचा प्रवास केला नाही.
कधी कुटुंबासोबत, कधी मित्रांसोबत तर कधी एकट्यानेही आपण बिनधास्तपणे ट्रेनचा प्रवास करतो.
प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही म्हणून आपण रिझर्वेशन देखील करतो.
पण जर कधी कुठल्या कारणामुळे तुमची ट्रेन सुटली तर? असं अनेकांसोबत होत असतं,
शहरातलं ट्रॅफिक ही समस्या तर हमखास असतेच, अशावेळी हे एक कारणही ट्रेन चुकण्यासाठी पुरेस आहे.
अर्थात कारण कोणतंही असो, ट्रेन चुकण्याचा प्रसंग अनेकांवर येतोच.
तुम्हालाही याचा अनुभव कधीतरी आला असेल.
आपणही आपल्या प्रवासादरम्यान अश्या घटना बघत असतो.
पण अश्यावेळी नेमकं करावं काय हे कोणालाच सुचत नाही.
कोणत्याही कारणामुळे आपण प्रवास करु शकलो नाही, तरी आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का याबाबत केवळ विचार केला जातो, मात्र कृती फारच कमी लोकं करतात.
ज्यांना कायद्याची जाणं असते ते कायदेशीररित्या ह्यावर पाउल उचलतात. पण ज्यांना कायदा माहित नसतो ते निराश होऊन आता काय करायचं म्हणून तिथून निघून जातात.
पण जर तुमची गाडी सुटली तर घाबरण्यापेक्षा, हताश निराश होऊन बसण्यापेक्षा हे जाणून घ्या की अश्या परिस्थितीत तुम्ही काय-काय करू शकता.

जर तुमची ट्रेन सुटली आणि त्या गाडीत तुमचं रिझर्वेशन असेलं तर पुढील २ स्टेशन पर्यंत टीटीई तुमची रिझर्व्ह सीट आणखी कोणालाही अलॉट करू शकत नाही.
अश्यात तुम्ही पुढील दोन स्टेशनवर पोहोचून गाडी पकडू शकता.
पण जर तुम्ही दोन स्टेशनवरही गाडी पकडण्यात यशस्वी झाला नाहीत तर तुमची रिझर्व्ह सीट आरएसी प्रवाश्याला अलॉट करण्यात येते.
ट्रेन सुटल्यावर तुम्ही टीडीआर फाईल करू शकता. त्यामुळे तुम्हाला बेस फेअरच्या ५० % परत मिळेल. म्हणजेच तुमच्या तिकिटाचे अर्धे पैसे तुम्हाला परत मिळेल.

आता ट्रेन सुटल्यावर काय करावे हे तर तुमच्या लक्षात आलेच असेलं पण जर प्रवासाआधी तुमचं तिकीटं हरवलं तर तुम्ही काय करू शकता हे देखील जाणून घ्या.

प्रवासाआधी जर तुमचं तिकीट हरवलं तर त्यात घाबरायचं कारण नाही.
असं झाल्यास तुम्ही बोर्डिंग स्टेशनवर जाऊन तिथल्या चीफ रिझर्वेशन सुपरवायझरला डूप्लीकेट तिकीट जारी करण्यासाठी लिखित निवेदन देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचं एखादं आयडी प्रुफ सोबत घेऊन जावं लागेल.
पण डूप्लीकेट तिकीट मिळविण्यासाठी तुम्हाला प्रवासाच्या २४ तासा अगोदर निवेदन करणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला डूप्लीकेट तिकीट मिळू शकेल त्यासाठी तुमच्याकडून काही चार्जेस देखील घेतले जाईल.
पण जर त्यानंतर तुमचं हरवलेलं तिकीट सापडलं तर तुम्हाला डूप्लीकेट तिकीटासाठी घेतलेली फी सहजपणे परत मिळवू शकता.
ह्याव्यतिरिक्त जर कुठल्या कारणास्तव ट्रेन रद्द झाली किंवा प्रवास पूर्ण होऊ शकला नाही किंवा रेल्वे इतर कुठलं ट्रान्सपोर्टच साधन उपलब्ध करू शकली नाही यात्री त्या प्रवासाचा पूर्ण रिफंड घेऊ शकतो.
त्यासाठी प्रवाश्याला आपले तिकीट स्टेशन मास्टरला सरेंडर करावे लागते.
ट्रेनने प्रवास करताना जर कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवली तर तुम्ही काय काय पावलं उचलू शकता हे जाणून घेणं खरंच खूप गरजेचं असतं. ह्यामुळे तुम्ही स्वतःची तसेच गरज पडल्यास इतरांचीही मदत करू शकता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
These should now be things of past. Mobile phones were not available and people had no means of knowing if train is on time or not. But now with information available it should be easy to manage, not rush. also inform the train stn if you are not able to make the journey for whatever reason. It should also be possible to get easy refund for journey not done. Save lives donot rush.