' बॉक्स-ऑफिस म्हणजे काय, आणि त्याला बॉक्स-ऑफिसच का म्हणतात? जाणून घ्या.. – InMarathi

बॉक्स-ऑफिस म्हणजे काय, आणि त्याला बॉक्स-ऑफिसच का म्हणतात? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अनेकांना चित्रपट हे चित्रपट गृहात जाऊन बघायला जास्त आवडतात. त्यामुळे कुठल्या आठवड्याला कुठला चित्रपट लागला आहे, कुठल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कितीचा गल्ला जमवला आहे, त्याचे रीव्हुज काय आहे, त्याला बॉक्स ऑफिस वर किती रेटिंग देण्यात आली आहे, कुठला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट गेला कुठला पडला हे सर्व एक चित्रपट रसिक बघत असतो.

 

Boxoffice-inmarathi01
rogersmovienation.com

एक मिनिट… तुमच्या लक्षात आलं का, वरील चार ओळींत तीनदा हा बॉक्सऑफिस शब्द येऊन गेला. पण चित्रपटांचा आणि ह्या बॉक्स ऑफिस चा काय संबंध. म्हणजे चित्रपट, हिट, फ्लॉप इथपर्यंत ठीक आहे पण बॉक्स ऑफिस म्हणजे नेमकं काय? हा शब्द आपण नेहेमीच ऐकत आलो आहोत, जिथे कुठे चित्रपट सृष्टीचा मुद्दा येतो तिथे मागोमाग हा बॉक्स ऑफिस देखील येतो. पण हा बॉक्स ऑफिस आहे तरी काय, कुठनं आला हा शब्द, काय आहे ह्याचा अर्थ, माहितेय? कदाचित नसेल माहित तुम्हाला…

तर चला जाणून घेऊ ह्या बॉक्स ऑफिसच्या जन्मामागील रंजक कहाणी…

 

Boxoffice-inmarathi02
vecer.mk

आधी हे जाणून घेऊ की बॉक्स ऑफिस ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय.. तर बॉक्स ऑफिस एक अशी जागा असते जिथे चित्रपट बघायला चित्रपट गृहात जाण्याची तिकीट मिळते. हे तिकीट ऑफिस बॉक्स प्रमाणे तयार केलेले असते, त्यामुळे ह्याला बॉक्स ऑफिस देखील म्हटले जाते.

 

censor board-inmarathi04

भलेही तिकीट विक्री करणारे हे ऑफिस अगदी छोटे असेल पण येथे मोठमोठ्या चित्रपटांचे भविष्य ठरते. कुठला चित्रपट हिट गेल आणि कुठला फ्लॉप केल ह्याच पहिला साक्षीदार हा बॉक्स ऑफिस असतो. हाच ठरवतो की कुठल्या चित्रपटाने कितीचा गल्ला केला. कुठला चित्रपट लोकांच्या जास्त पसंतीस पडला. म्हणून चित्रपटांची तिकीट विक्री करणारा हा बॉक्स ऑफिस चित्रपट सृष्टीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो.

 

Boxoffice-inmarathi04
mp.natlib.govt.nz

बॉक्स ऑफिसच्या सुरवातीचा एक आणखी रंजक किस्सा आहे. एलिजाबेथ ह्यांच्या काळात चित्रपट गृहात लोकांना फ्रीमध्ये चित्रपट दाखविल्या जायचा. म्हणजे सामान्य लोकांना चित्रपट बघण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नव्हती. मग अश्यात प्रत्येक चित्रपटाच्या शो दरम्यान चित्रपट गृहात खूप गर्दी असायची. आणि ह्यामुळे श्रीमंत वर्गाला चित्रपट बघण्यासाठी जागा नसायची.

 

Boxoffice-inmarathi
thatsmye.com

ह्या समस्येचे निवारण करण्यासाठी खास श्रीमंत वर्गाकरिता एक वेगळा बॉक्सच्या आकाराच्या बैठकीची सोय करण्यात आली. ह्या सीट्सची बुकिंग ऑफिस म्शून क्लेय जायची आणि बुकिंग करण्यासाठी त्याचे मुली देखील आकारले जायचे. मग बॉक्स आणि ऑफिस ह्या दोन शब्दांना जोडून बॉक्स-ऑफिस असे म्हटले जाऊ लागले. ह्या बॉक्समध्ये बसणाऱ्या लोकांमुळेच चित्रपट गृहाच खर्च निघायचा.

आज भलेही चित्रपट दाखविण्याच्या पद्धतीत बदल झाला असला तरी बॉक्स-ऑफिस हा शब्द आजही चित्रपट सृष्टीसाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण हाच त्याचं भविष्य ठरवत असतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?