' सचिनचं लॉबिंग-हरवलेला फॉर्म-राजकारण, कांबळीच्या अपयशाचं खरं कारण समजून घ्या

सचिनचं लॉबिंग-हरवलेला फॉर्म-राजकारण, कांबळीच्या अपयशाचं खरं कारण समजून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश. नेहमीच्या शब्दात सांगायचं तर क्रिकेट हा इथला धर्म.

एका खेळाच्या इतकं लोकप्रिय होण्यात त्या खेळात असलेल्या वैशिष्ट्यांसोबत खूप लोकांचे कष्ट आणि परिश्रम देखील आहेत. कित्येकांनी आयुष्यभर यासाठी स्वतःला वाहून घेतले.

 

cricket-ball-inmarathi02

 

दरवर्षी नवनवीन खेळाडू, त्यांच्यात सर्वोत्तम होण्यासाठी स्पर्धा, त्यासाठी लागणारी जिद्द आणि चिकाटी अशा सगळ्यातून काहीच खेळाडू मोठे होतात. त्यांची कारकीर्द मोठी होते.

पण बरेच खेळाडू असे असतात ज्यांच्याकडे प्रतिभेची कमी नसते. पण मिळालेल्या संधीचे ते सोने करू शकत नाहीत, अन काळाच्या ओघात ते कुठेतरी हरवून जातात.

विनोद कांबळी हा अशा प्रतिभावंतातील एक. कांबळी तसा पूर्णतः पडद्यामागे कधी गेलाच नाही. उलट तो एक दंतकथा बनून राहिला.

 

vinod kambli inmarathi

 

याची सुरुवात होते, शालेय स्तरावर हॅरिस-शिल्ड चषकाच्या उपांत्य सामन्यात सचिन तेंडुलकर सोबत केलेल्या नाबाद ६६४ धावांचा भागीदारीच्या विक्रमापासून.

ज्यात सचिनचा वाटा होता ३२६* धावा तर कांबळीचा ३४९* धावांचा. यावेळी सचिनचे वय होते १५ वर्षे तर कंबळीचे १६ वर्षे.

दोघांच्या या भागीदारीने भारतीय क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. अन या दोन मुलांची नावे सर्वत्र परिचित झाली.

दोघांच्या खेळाची तुलना करता क्रिकेट पंडितांना कांबळी हा अधिक प्रतिभाशाली वाटला. परंतु त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण झाले सचिन तेंडूलकरच्या पदार्पणाच्या ३ वर्षानंतर.

 

vinod kambli 2 inmarathi

 

त्याच्या मोठे फटके खेळण्याच्या क्षमतेने निवडकर्त्यांचे लक्ष त्याने वेधून घेतले. तो १९९२ च्या विश्वचषक संघाचा देखील भाग होता. परंतु या सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारताने सामना गमावला.

१९९३-१९९४ या काळात त्याने १० वेळा पन्नास पेक्षा अधिक धावा केल्या.

१९९६ च्या विश्वचषकात त्याने झिम्बाब्वे सोबत सुरवातीचे तीन गडी लवकर बाद झाल्यानंतर केलेली शतकी खेळी ही त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे व शेवटचे शतक ठरले.

त्यानंतर तो एकदिवसीय संघात येत जात राहिला परंतु संघात आपली कायम जागा तो पुन्हा कधीही बनवू शकला नाही.

 

kambli and sachin inmarathi

हे ही वाचा – एकेकाळी विश्वचषक गाजवणारा क्रिकेटर आज उपजीविकेसाठी सुद्धा करतोय संघर्ष!

कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे पदार्पण झाले १९९३ साली इंग्लड विरुद्ध. त्याच्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात त्याने इंग्लंड विरुद्ध द्विशतक साजरे केले.

त्यानंतर पुढच्याच सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध आणखी एक द्विशतक केले.

पुढच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकून त्याने तीन वेगवेगळ्या देशांविरुद्ध सलग तीन सामन्यांमध्ये १०० पेक्षा अधिक धावा करण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावे केला जो आजही अबाधित आहे.

पण कांबळीने १९९५ नंतर एकही कसोटी सामना खेळला नाही. अशा प्रकारे त्याची कारकीर्द १७ कसोटी सामान्यांपर्यंत मर्यादित राहिली.

कांबळीला संघातून काढून टाकण्याची वेगवेगळी कारणे – त्यातील बरीच तर आता दंतकथा बनून राहिली आहेत.

काहींनी त्याच्या संघात समावेश न होण्याला सचिनच्या मैत्रीशी जोडलं. तर कुणी अंतर्गत राजकारणाशी.

परंतु गमावलेला फॉर्म हेच एकमेव कारण त्याच्या संघात निवडीच्या आड आलेले दिसते.

कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका षटकात शेन वॉर्नला २२ धावा काढणारा कांबळी शॉर्ट बॉल वर खेळताना बिचकतो ही त्याची कमजोर कडी ध्यानात आल्यावर ‘कांबळी-बाद-झेल-गली’ हे समीकरणच बनून गेले.

 

 

त्यानंतरच्या १३ खेळींमध्ये तो फक्त दोन वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा काढू शकला.

शेवटचा कसोटी सामना खेळला तेंव्हा कांबळी २४ वर्षांचा होता.

सोबतच १९९६ या वर्षात राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली या तीन दिग्गज खेळाडूंनी संघात पदार्पण केले.

कसोटी सामन्यात गांगुली आणि एकदिवसीय सामन्यात लक्ष्मण यांनी कांबळीची जागा घेतली.

१९९६ च्या विश्वचषकातील वादग्रस्त सामना, त्यावर कांबळीने केलेले आरोप अशा एकूण परिस्थितीत आधीच आपल्या फॉर्ममध्ये नसलेल्या कंबळीवर शिस्तभंगाची कारवाई झाली.

आपला शेवटचा एकदिवसीय सामना कांबळी २००० साली खेळला त्याच सामन्यात युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

 

sachin-vinod-inmarathi

हे ही वाचा – क्रिकेटमधील हे ११ जबरदस्त रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं!

क्रिकेटमधून २००९ साली निवृत्ती घेणारा कांबळी हा या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिला. कधी सचिनसोबतची मैत्री असो वा सार्वजनिक जीवनातील त्याची भडक वक्तव्ये.

प्रतिभा असूनही कांबळी वर अन्याय झाला अशी एक भावना क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे किंवा कांबळी हा एक कुतूहलाचा विषय बनून राहिलेला आहे.

म्हणूनच क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय पटलावर येऊन अचानक पडद्याआड जाणाऱ्या खेळाडूंचे तो नेतृत्व करतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “सचिनचं लॉबिंग-हरवलेला फॉर्म-राजकारण, कांबळीच्या अपयशाचं खरं कारण समजून घ्या

  • April 10, 2020 at 2:03 am
    Permalink

    खरच एक प्रतिभाशाली खेळाडू होता, होता ह्यासाठी की आता तो निवृत्त झाला आहे. सुरवातीला जेव्हा इंग्लंड येथे जाण्यासाठी त्याचे सिलेक्शन झाले तेव्हा तो आमच्या घरी नेहमी येण-जान होत मी लहान असताना तो मला त्याने केलेले रेकॉर्ड जे त्यावेळच्या साप्ताहिक पत्रात छापून येयायचे ते दाखवायचा त्याचा आमचा सहवास म्हणजे त्याचे वडील गणपत काका म्हणजे गणपत कांबळी हे माझे वडील शांताराम पाटील ह्यांचे एकाच कंपनीत(GKW ) भांडुप स्टेशन येथे कामाला असल्यामुळे मित्र होते, माझ्या वडलांना त्याचा खेळ फार आवडायचा म्हणुन जेव्हा त्याच सीलेक्शन झाले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती फार खराब होती म्हणून माझ्या वडिलांनी त्याला सोबत घेऊन पैशाची जुळवा जुळव केली आणि अशा प्रकारे महान विनोद गणपत कांबली हे नाव भारतीय क्रिकेट जगतात जन्माला आले खूप छान होता त्याचा प्रवास पण यश लवकर पदरात पडल ते सांभाळता आले नाही एवढेच बोलेन….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?