' सावधान! पेट्रोल पंपावर अशा ७ पद्धतीने फसवणूक केली जाते! – InMarathi

सावधान! पेट्रोल पंपावर अशा ७ पद्धतीने फसवणूक केली जाते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतातील सामान्य वाहनचालक नेहमी एका समस्येचा सामना करत असतात. असे अनेक पेट्रोल पंप भारतात आहेत जे दिलेल्या पैश्याचा मोबदल्यात कमी इंधन देऊन तुमची फसवणूक करतात.

जर तुम्ही सतर्क नसाल तर तुमची हमखास फसवणूक करण्यात येते. आम्ही आज तुम्हाला अशा घोटाळ्याबद्दल सांगणार आहोत, ज्याचा मदतीने पेट्रोल पंपाचे मालक सामान्य चालकांची फसवणूक करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ग्राहकांना फसवण्याच्या काही पद्धती :

१ ) द लॉन्ग होज –

ही खरंतर ग्राहकांची फसवणूक नाही. डिस्पेन्सरच्या डिझाईनमधला दोष आहे. अनेक इंधन डिस्पेन्सर मध्ये hoses अर्थात नलिका गरजेपेक्षा अधिक लांब असतात. जेव्हा गाडीत आपण इंधन भरतो तेव्हा बरचसं इंधन त्या नलिकेतच राहून जातं.

 

Fuel-Oil-Delivery-Hose-petroleum-hose-inmarathi

 

जवळ जवळ १०० ते १५० मिली इंधन त्या नलिकेत राहून जातं. त्यामुळे शेवटचा थेंब टाकीत पडेपर्यंत लक्ष आपलं लक्ष असलं पाहिजे.

२ ) The Sleight of Hand , Shortchanging Trick:-

बऱ्याचदा वाहनचालक घाईत असतो. याचा फायदा घेऊन कमी दराचे इंधन गाडीत भरण्यात येते. म्हणजे ५०-६०-१०० रुपयांपर्यंतचे इंधन तो गाडीत भरतो.

बऱ्याचदा सुट्टे पैसे नसल्याने आपण ५०० ची नोट देतो. मग उरलेले पैसे परत करण्याच्यावेळी सुट्टे पैसे पूर्णपणे परत केले जात नाहीत.

 

pump-inmarathi

 

आधीच घाईत असलेला वाहनचालक पैसे न मोजताच खिशात ठेवून निघून जातो. अशाप्रकारची फसवणूक पेट्रोल पंप चालकांकडून मोठ्या प्रमाणात होत असते. सामन्यत: दुचाकीचालक याचे शिकार होतात.

३ ) The Diversionary Trick :

बऱ्याचदा पेट्रोल पंपावर आपण विशिष्ट किंमतीचं इंधन गाडीत टाकायला सांगतो. त्याचवेळी पेट्रोल पंपावरील दुसरा कर्मचारी आपल्या जवळ येतो आणि आपल्याला वेगवेगळ्या ऑफर्सची माहिती सांगू लागतो.

कुठल्यातरी भलत्याच विषयावर आपल्याशी संवाद साधतो. जेणेकरून आपलं लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं. त्याचवेळी इंधन भरणारा कर्मचारी शिताफीने, पूर्ण इंधन भरायच्या आधीच डिस्पेन्सर बाजूला करतो.

 

Petrol-Bunk-Scam-India-inmarathi

 

समजा तुम्ही १००० रुपयांचे पेट्रोल गाडीत भरायला सांगितले, तर फक्त ९५० रुपयांचे पेट्रोल प्रत्यक्षात गाडीत भरले जाते. आता मात्र, इलेक्ट्रॉनिक बिल मिळत असल्यामुळे हा प्रकार कमी झाला आहे.

हा प्रकार बऱ्यापैकी थांबला असला तरी ज्याठिकाणी अशी बिलिंग यंत्रणा नाही तिथे सामान्यांची फसवणूक आजूनही केली जात आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बिल घ्यायला विसरू नका.

हे ही वाचा – पेट्रोलची ३०% बचत करणाऱ्या यंत्राचा शोध लावणाऱ्या मराठी माणसाबद्दल जरूर वाचा!

४ ) The Double Start Trick :

तुम्ही १००० रुपयांचे इंधन पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला भरायला सांगितले, तर तो व्यवस्थित ऐकू न आल्याचं कारण देत फक्त ३०० रुपयांचं पेट्रोल भरेल.

जेव्हा तुम्ही त्याला १००० रुपयांचं पेट्रोल भरायला सांगाल तेव्हा तो मशीन रिसेट करण्याचं कारण देत तुमचं लक्ष भरकटवेल आणि ७०० पर्यंतच पेट्रोल गाडीत भरेल.

 

fraud-inmarathi

 

तुम्हाला वाटेल की त्याने पूर्ण १००० रुपयांचं पेट्रोल गाडीत भरलं आहे. परंतु त्याने तुमची फसवणूक करून केवळ ७०० रुपयांचे पेट्रोल गाडीत भरलेले असेल. हा सुद्धा ध्यान भरकटवण्याचा प्रकार आहे. यात देखील २ लोक सामील असतात.

अशा युक्तीला अजिबात बळी पडू नका.


५ ) The Jerky Stop Start Trick :

 

patrol-fraud-inmarathi

 

पंपावरचे कर्मचारी पेट्रोल भरताना नलिका पूर्णपणे लॉक करत नाहीत. याऐवजी गाडीच्या टाकीत पेट्रोल भरत असताना बंद चालू करत असतात. नॉब दाबल्यावर इंधन बाहेर येते. काहीवेळाने नॉबवरील दाब कमी करून प्रवाह कमी करतात. नंतर पुन्हा चालू करतात.

याप्रकारामुळे, प्रत्येक १० लिटर मागे १५०-२०० मिली इंधन चोरले जाते.

हे ही वाचा – पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या या मूलभूत सुविधांबद्दल आपण अजूनही अंधारात आहात!


६ ) The Continuity Trick :

प्रत्येक नवीन गाडीत पेट्रोल भरण्यापूर्वी मशीन रिसेट होणे गरजेचे असते. पंप कर्मचारी यातच चापलुसी करतात. तुमच्याआधी येणाऱ्या दुचाकीस्वाराने थोड्याच किमतीचे पेट्रोल भरले असेल, तर मशीन रिसेट न करता तिथूनच तुमच्या गाडीत पेट्रोल भरायला सुरुवात करतात.

 

trick-inmarathi

 

समजा तुम्ही ५०० चं इंधन भरायला सांगितलं, तर तो आधीच्या १०० पासून सुरवात करून फक्त ४००चं पेट्रोल गाडीत भरलं जातं. १०० रुपयांची फसवणूक होते. ही सुद्धा एक लक्ष भरकटवून केली जाणारी युक्ती आहे.


७ ) Dispenser Tampering :

पेट्रोल डिस्पेन्सर यंत्रणा tampering करणं नव्या तंत्रज्ञानामध्ये कठीण झालं आहे. त्यामुळे हा धोका टळतो.  ही एक चांगली बाब आहे.

प्रत्यक्ष दिलेल्या रकमे इतकीच रक्कम मीटर दाखवते पण पेट्रोल मात्र कमी भरलं जातं. ग्राहकांची फसवणूक केली जाते. आजही काही प्रमाणात ही फसवणूक केली जाते. 

 

dispenser-tampering-inmarathi

 

अशाप्रकारे आपली फसवणूक केली जाऊ शकते. या फसवणुकी पासून स्वतःला कसं वाचवायचं हे सुद्धा समजून घ्या:-

१ ) नेहमी छापील बिलाची मागणी पेट्रोल पंप चालकाकडे करत जा.

२ ) इंधन नेहमी प्रसिद्ध आणि मान्यताप्राप्त पंपावरूनच भरा

३ ) इंधन भरताना नेहमी वाहनावरून उतरून मीटर व्यवस्थित चेक करा.

४ ) नेहमी वाहनासोबत राहा. नेहमी मीटरवर बारीक लक्ष ठेवा. लक्ष भरकटू देऊ नका.

५ ) तुम्ही आधीच सेट केलेल्या किंमतीचं इंधन भरत असाल, तर कर्मचाऱ्याला ते डिस्पेन्सर मध्ये लोड करायला लावा. नोझल ( नलिका ) गाडीत टाका व्यवस्थित लॉक करा आणि बाजूला सरकुन घ्या, ते स्वयंचलित यंत्र आहे भरल्यावर ते आपोआप थांबेल.

===

हे ही वाचा – पेट्रोल, डिझेल स्वस्त दरात भरून घेण्यासाठी ‘ह्या’ ४ युक्त्या आजमावून बघाच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?