“मोदींचा राजीव गांधींसारखा खून करायचा प्लॅन करतोय” : माओवाद्यांचं पत्र

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या आधी झालेली एल्गार परिषद, त्या परिषदेचे आयोजक आणि त्यांचे माओवादी चळवळीची असलेले संबंध याबाबत आता पोलीस तपासातून अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यापैकी ज्या गोष्टीने सगळ्यात जास्त खळबळ माजवली ती म्हणजे माओवाद्यांच्या एका नेत्याने “कॉम्रेड प्रकाश” याला उद्देशून लिहिलेले पत्र.

या पत्रात लिहिलेली सगळ्यात आक्षेपार्ह गोष्ट ही, की राजीव गांधी यांचा जसा खून झाला तसाच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोडी यांचा खून करण्याची योजना माओवादी अखात असल्याचे या पत्रात बोलून दाखवण्यात आले आहे.

पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत हे पत्र पुरावा म्हणून मिडियासमोर मांडले आहे. मूळ पत्र इंग्रजीत असून त्याचे मराठी भाषांतर खालीलप्रमाणे…

===

प्रिय कॉम्रेड प्रकाश,

लाल सलाम

आम्हाला तुझं पत्र मिळालं (20/3) सद्यपरिस्थिती बाबत, इकडे अरुण, वेर्नोन आणि इतर सर्व देखील चळवळीच शहरी भागात काम आकार घेत असतांना दोन बाजुंनी चाललेल्या संघर्षाबाबत चिंताग्रस्त आहेत. बिजॉय दा यांच दुःखद निधन ही त्यादरम्यान झालं आहे. ते एक शक्तिशाली नेते होते आणि निस्वार्थ भावनेने पार्टी आणि क्रांतीसाठी झटत होते. त्यांचा नेतृत्वाची आजच्या कठीण प्रसंगात खरंच खूप मदत झाली असती.

प्रशांत ने त्याचा अहंकारी अजेंडा राबविण्यापूर्वी परिस्थिती चांगली होती व मोठ्याप्रमाणात पार्टी आणि आपल्या राजकीय तुरुंगवासीच्या हिताची होती.

कॉम्रेड साईबाबा यांनी हा विषय आधी २०१३ साली उपस्थित केला होता जेव्हा प्रशांतने त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते. पण एका अर्थाने गडचिरोली कोर्टाने प्रशांत विरोधात दिलेला निकाल पार्टीच्या हिताचा होता, यामुळे पार्टीचे आजून जास्त नुकसान होण्यापासून वाचले. साईबाबाला वाचवण्यासाठी चांगला भक्कम डिफेन्स तयार केला जावा यासाठी आम्ही झटत आहोत. जेलमध्ये असलेल्या कॉम्रेडसच्या सुटकेसाठी शक्य ती कायदेशीर मदत पुरवण्यावर आमचं लक्ष आहे.

वरिष्ठांनी आपल्याला जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी विविध कार्यक्रम आणि आंदोलने करण्याची जबाबदारी दिली आहे. आपण “G N साईबाबा बचाव आणि मुक्तता समिती” या बॅनरखाली २० एप्रिलला अजून एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत.

 

saibaba-inmarathi
indianexpress.com

आम्ही तुरुंगावासी साथीदारांना मुक्त करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहोत. कॉ. अशोक बी, अमित बी, सीमा आणि सुधीर यांनी CRPP EC च्या सतत बैठकी घेण्याची मागणी केली आहे. छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली येथे चालू असलेल्या केसेसला हळूहळू गती देण्याचं काम हे करणार आहेत. दुसऱ्या बाजूला कॉ. सिराज पार्टीला सर्वप्रकारची मदत करायला तयार आहे. तो अनेक वर्षांपासून पार्टीचा साहित्याचा, तत्वांचा व संविधानाचा गाढा अभ्यास करतो आहे. अश्या कठीणप्रसंगात सुद्धा तो दुसऱ्या APT Cross over साठी तयार आहे.

यावेळी मी सिराज सोबत आजून एक कॉम्रेड पाठवू इच्छित आहे. त्याची माहिती या पत्रासोबत जोडलेल्या मेमरी चिप मध्ये आहे.

मागच्या काही वर्षात विष्णूने डिल करण्यासाठी कॉ.बसंताची भेट घेतली आहे. कॉ. किसान त्यावेळी प्रत्यक्ष भेटण्यास असमर्थ होता. मला अपेक्षा आहे की आतापर्यंत तुला बैठकी संदर्भात आणि 400000 राउंडसवाल्या M4 चा वार्षिक पुरवठ्यासाठी लागणाऱ्या ८ कोटी रुपयाबद्दलची माहिती मिळाली असणारच, लवकरच तुझा काय निर्णय होतो तो मला कळव.

हिंदू फॅसिझमला हरवणे हा आपला सुरवतीपासूनचा अजेंडा होता आणि चिंता देखील आहे. गुप्तपणे आणि खुल्यापद्धतीने काम करणाऱ्या अनेक संघटनांच्या नेतृत्वाने हा मुद्दा उचलून धरला आहे. आम्ही समविचारी संघटना, राजकीय पक्ष आणि अल्पसंख्याक समूहांच्या संघटनांना सोबत घेऊन यावर काम करत आहोत.

मोदींच्या नेतृत्वाखाली फॅसिस्ट शक्ती आदिवासींच्या आयुष्यात प्रवेश करून स्वतःच स्थान निर्माण करत आहे. बिहार आणि पश्चिम बंगाल मधल्या मोठया पराभवानंतर देखील मोदीने यशस्वीरीत्या १५ राज्यात सरकार स्थापन केलं आहे.

 

modi-letter-inmarathi
newsoftown.com

जर हीच गती कायम राहिली तर पार्टीला सर्व आघाड्यांवर धोका निर्माण होणार आहे. अधिक तीव्र आणि सुनियोजित मिशन 2016 ( OGH) चं खच्चीकरण यामुळे झालं आहे. कॉ. किसान आणि आणखी काही वरीष्ठ कॉम्रेडस मोदीराज संपण्यासाठी कठोर पावलं उचलत आहेत. आम्ही अजून एखाद्या राजीव गांधी सारख्या घटनेचा विचार करत आहोत. जे आत्महत्या करण्यासारखं वाटतं.. आणि आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त आहे परंतु पार्टीची कोअर कमिटी या प्रस्तावावर हेतुपुरस्पर पद्धतीने विचार करत आहे. रोड शो ला लक्ष करणे हे उपयुक्त ठरू शकते. आमचा विश्वास आहे की पार्टीचं अस्तित्व सर्व बलिदानांपेक्षा सर्वोच्च आहे. बाकी पुढच्या पत्रात.

पुढील कार्यास शुभेच्छा देतो

R

18/04/17

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?