'पाणी पिऊन पाण्याची बाटली खाऊन टाका : खाण्यायोग्य प्लास्टिकचा पर्यावरणस्नेही पर्याय

पाणी पिऊन पाण्याची बाटली खाऊन टाका : खाण्यायोग्य प्लास्टिकचा पर्यावरणस्नेही पर्याय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आज आपण म्हणतो ओझोन चा थर इतका वाढला किंवा कमी झाला, ग्लोबल वॉर्मिंग खूपच झालंय, पोल्यूशन तर खूपच वाढलं आहे वगैरे वगैरे!

पण कधी विचार केला आहे की या सगळ्या निसर्गाच्या होणाऱ्या ऱ्हासाला कोण आणि कसं कारणीभूत आहे?

तर याला दोन गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत आहे, एक म्हणजे माणूस आणि दुसरी म्हणजे मानवनिर्मित प्लास्टीक आणि तत्सम घातक पदार्थ!

 

plastic problem inmarathi

 

होय ह्याच गोष्टीमुळे आज निसर्गाचा ऱ्हास होतोय आणि आपण सगळे तो उघड्या डोळ्यांनी बघत राहण्यावाचून दुसरं काहीच करू शकत नाही, कारण हे सगळं माणसानेच केलं आहे!

केवळ आणि केवळ माणूस, त्याची जीवनशैली, आणि डेव्हलपमेंट च्या नावावर त्याने चालवलेली मनमानी हेच कारणीभूत आहे! 

आपल्या देशात २०२२ सालापर्यंत सिंगल युज प्लास्टिक नेहेमी करिता बंद करण्याची शपथ जागतिक पर्यावरण दिनाला घेण्यात आली. पण हे ध्येय दिसत तेवढं सोपं नाही.

कारण आज प्लास्टिकचा वापर हा खूप मोठ्या स्तरावर होतो आहे. म्हणजे साध दुधं घ्यायला गेलं किंवा बाजारात भाजी घ्यायला गेलं तरी आपण प्लास्टिक मागतो.

 

single use plastic inmarathi

 

तर एखाद्या मोठ्या कार्यक्रमात युज अॅण्ड थ्रो अश्या प्लास्टिकचे ग्लास आणि इतर समान वापरतो.

प्लास्टिकच्या व्यापातून सुटणे एवढं सहज शक्य तर नसणारच. पण त्यासाठी आपण काही पर्याय नक्कीच वापरू शकतो. ज्याने प्लास्टिकच्या वापर कमी होण्यास मदत होईल आणि मग हळूहळू ह्यातून आपण सुटू.

आज प्लास्टिक मुळे पर्यावरणावर जो वाईट आणि भयंकर परिणाम होतो आहे, त्यामुळे आपणच नाही संपूर्ण जग चिंतेत आहे.

 

plastic glass inmarathi
thestorypedia

 

ज्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न जागतिक स्तरावर केला जातो आहे. अश्यातच प्लास्टिक वापरापासून वाचण्यासाठी काही पर्याय शोधण्यात आले आहेत!

काही असे पर्याय जे तुम्ही रोजच्या वापरात आणले तर त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होईल. हे काही असे पर्याय आहेत ज्याने पर्यावरणाला काहीही धोका होणार नाही.

रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या भांड्यांचे असे काही पर्याय आहेत जे तुम्ही वापरल्यावर खाऊ देखील शकता.

 

१. Edible Cup :

 

edible things-inmarathi

 

Loliware ही कंपनी बायोडीग्रेडेबल आणि एडीबल प्लास्टिकच्या पर्यायांवर संशोधन करत आहे. ह्या कंपनी द्वारे असे कप्स बनविण्यात आले आहेत ज्यांना वापरल्यानंतर खाल्ले जाऊ शकते.

हे कप्स Seaweed Extract ने बनलेले आहेत, जे चेरी, द्राक्ष ह्यांसारख्या अनेक फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहेत. त्यासोबतच आता ही कंपनी खाल्ले जाणारे स्ट्रॉ देखील बनवत आहे.

 

२. ज्वारीने बनलेला चमचा :

 

edible things-inmarathi01
indiaretailing.com

 

दर दिवसाला कित्येक प्लास्टिकचे काटे-चमचे कचरा म्हणून फेकले जातात ज्याने प्लास्टिक कचरा वाढतो. पण जर ह्या चमच्याऐवजी असे चमचे वापरले जे खाल्ले जाऊ शकतात, तर ह कचरा कमी होण्यास मदत होईल.

ह्या समस्येवर तोडगा म्हणून Bakeys नावाच्या एका भारतीय कंपनीने ज्वारी आणि तांदळापासून बनलेले चमचे तयार केले आहेत.

हे चमचे गरम सूपमध्ये देखील वितळत नाहीत. त्यामुळे ह्याचा वापर अगदी सहजपणे केल्या जाऊ शकतो.

 

३. एडीबल पाण्याची बाटली :

 

edible water balls inmarathi
the plaid zebra

 

एकट्या अमेरिकेत ३८ बिलियन प्लास्टिकच्या वॉटर बॉटल डस्टबिनमध्ये फेकल्या जातात. त्यामुळे प्लास्टिकचा किती प्रमाणात आपण वापर करतो हे कळून येते.

पण आता ह्या समस्येवर Skipping Rocks Lab ने ह्यावर एक सोप्पा उपाय शोधून काढला आहे. त्यांनी अश्या वॉटर बॉटल बनविल्या आहेत ज्यातून पाणी प्यायल्यावर तुम्ही त्या खाऊ देखील शकता.

Ooho नावाचं हे कंटेनर Seaweed आणि Calcium Chloride ने बनविण्यात आले आहे. हे प्लास्टिक प्रमाणे पारदर्शक असते.

 

४. रिंग होल्डर्स :

 

edibe ring holders inmarathi
returntonow.net

 

बियर्सच्या कॅन्सला होल्ड करण्यासाठी जे रिंग होल्डर येतात ते प्लास्टिकचे असतात.

पण अमेरिकेच्या Saltwater Brewery नावाच्या कंपनीने एका अश्या रिंग होल्डरचा शोध लावला आहे जे आपण खाऊ देखील शकतो. हे रिंग होल्डर गहू आणि ज्वारी ह्यांपासून बनले आहेत.

 

५. बायोडीग्रेडेबल प्लास्टिक फिल्म :

 

plastic film inmarathi

 

दुधातून मिळणाऱ्या Casein प्रोटीनने रोज वापरात येणारी प्लास्टिक फिल्म तयार केली जाऊ शकते.

प्लास्टिक फिल्मसाठी हा एक अत्यंत योग्य पर्याय असेलं. ह्यामुळे पर्यावरणाला काही नुकसानही पोहोचणार नाही आणि आपण त्याचा वापर देखील करू शकू.

सध्या आपल्यासाठी आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करणे खूप महत्वाचे आहे. जर आपल्याला आपले पृथ्वीवरील अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून थांबवायलाच हवं.

आणि प्लास्टिक हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे त्याचा वापर पूर्णतः बंद करणे गरजेचे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?