' आता नेटफ्लिक्सवरही सेन्सॉरबोर्डची नजर, हे बोर्ड नेमकं करतं काय? जाणून घ्या… – InMarathi

आता नेटफ्लिक्सवरही सेन्सॉरबोर्डची नजर, हे बोर्ड नेमकं करतं काय? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नेटफ्लिक्सवरची सेक्रेड गेम्स असो किंवा सध्या ऍमेझॉनवर गाजत असलेली मिर्झापूर २… बॉबी देओलची प्रमुख भूमिका असणारी आश्रम ही वेब सिरीज असो… ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात मनोरंजन होत असतं.

लॉकडाऊनच्या काळात तर सिनेमागृह देखील बंद असल्याने, मनोरंजनासाठी नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्म्सचा पुरेपूर वापर करण्यात आला.

याच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉरबोर्ड कुठल्याही प्रकारची पाळत ठेवत नाही. त्यामुळेच, सिनेमा किंवा वेब सिरीजची निर्मिती करताना संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य सहजरित्या मिळू शकतं.

परंतु, यापुढे ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा सेन्सॉरबोर्डची नजर असावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

 

mirzapur featured inmarathi

 

चित्रपट बनविण्यासाठी दिग्दर्शक आणि इतरांनी कितीही आटापिटा केला तरी तो तसाच रिलीज होणार की नाही हे सेन्सॉरबोर्डावर अवलंबून असते.

हाच नियम जर ओटीटीसाठी लागू झाला, तर अशा प्लॅटफॉर्म्सवर आमूलाग्र बदल झालेला पाहायला मिळेल.

चित्रपट बनविताना काही नियम-कायद्यांचे पालन करणं महत्वाचं असतं, त्या कायद्यांची आखणी ही सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) करत असते. ज्याला आपण सेन्सॉरबोर्ड म्हणून ओळखतो.

सध्या प्रसून जोशी हे सीबीएफसीचे अध्यक्ष असून, इन्फर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचे मंत्रिपद केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पाहत आहेत.

सीबीएफसी हीच संस्था ठरवते की कुठल्या चित्रपटाला कुठलं सर्टिफिकेट दिलं जावं.

बॉलीवूड चित्रपटांना सर्टिफिकेट जारी करणं हे सेन्सॉरबोर्डाचं काम आहे. पण मागील काही वर्षांपासून सेन्सॉर बोर्ड चित्रपटांना सेन्सॉर करण्याचं काम देखील करत आहेत.

ज्यात ते चित्रपटांमधील काही सिन्स कापतात, जी दृश्यं सार्वजनिकपणे दाखविण्यासाठी योग्य वाटत नाहीत त्या सिन्सवर सेन्सॉरबोर्ड कात्री चालवतो.

उडता पंजाब, लिपस्टिक अंडर माय बुरखासारख्या चित्रपटांवर सेन्सॉरबोर्डाने बऱ्यापैकी कात्री चालवली. त्यानंतर उरलेला चित्रपट रिलीज करण्यात आला.

 

censor board-inmarathi03

 

सर्टिफिकेशन आणि सेन्सॉरशिप ह्यात खूप फरक असतो. सेन्सॉरशिप म्हणजे एखाद्या चित्रपटांच्या विषयानुरूप त्याच्या वस्तुस्थितीवर लक्ष देऊन तो चित्रपट लोकांना दाखविण्यासारखा आहे की नाही.

पण आता प्रत्येक चित्रपट हा प्रत्येकाला आवडेल किंवा नाही आवडणार हे ठरवणं अशक्य आहे. कारण प्रत्येकाची आपली एक वेगळी आवड असते.

काही मर्यादित आणि ठराविक गोष्टींसाठी ही जबाबदारी सेन्सॉरबोर्डाकडे असायलाच हवी. पण त्याहून जास्त नाही. कारण त्यामुळे चित्रपट बनविण्याचे कला स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते, जे आता होताना दिसून येत आहे.

ओटीटीवर सुद्धा सेन्सॉरशिप लागली, तर हीच परिस्थिती ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा निर्माण होऊ शकते.

 

censor board-inmarathi04

 

सर्टिफिकेशन म्हणजे एखाद्या चित्रपटाला त्याच्या विषयानुसार त्याला सर्टिफिकेट देणं. म्हणजे कुठला चित्रपट हा वयस्क लोकांसाठी आहे, कुठला चित्रपट लहान मुलं देखील बघू शकतात वगैरे.

ह्यासाठी चित्रपट सृष्टीतील काही लोकांची निवड केली जाते. जे चित्रपट बघून हे ठरवितात की, त्या चित्रपटाला कुठलं सर्टिफिकेट देण्यात यावं.

गरज पडल्यास चित्रपटातील काही दृश्य काढून टाकण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात. जेव्हा सेन्सॉरबोर्ड कुठल्या चित्रपटातील काही सिन्स कापते तेव्हा त्या चित्रपटाच्या सर्टिफिकेटवर एक त्रिकोणी चिन्ह बनलेलं असते.

सेन्सॉर बोर्ड चित्रपटाला एकूण चार प्रकारचे सर्टिफिकेशन देते :

यू (अप्रतिबंधित सार्वजनिक प्रदर्शन) :

 

censor board-inmarathi02

 

साधारणपणे कौटुंबिक चित्रपटांना यू सर्टिफिकेट देण्यात येते. ड्रामा, लव्ह स्टोरी, शैक्षणिक, अॅक्शन, सायन्स फिक्शन अश्या चित्रपटांमध्ये अडल्ट कंटेंट नसतो, त्यामुळे त्या चित्रपटांना यू सर्टिफिकेट देण्यात येते.

विषयानुरूप जर चित्रपटात थोड्याफार प्रमाणात हिंसा किंवा अश्लिलता असली तरी, पण त्याचा अतिरेक असायला नको.

 

यू/ए (१२ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांनी आपल्या आई-वडिलांसोबत बघावा) :

 

censor board-inmarathi

 

ज्या चित्रपटामध्ये थोडाफार अडल्ट किंवा हिंसक कंटेंट असेलं आणि जे लहान मुलांच्या दृष्टीने चांगले नसेल त्या चित्रपटांना यू/ए सर्टिफिकेट देण्यात येते. म्हणजे असे चित्रपट लहान मुले बघू शकतात पण एकटे नाही.

जर चित्रपटातील काही सिन्स हे १२ वर्षाखालील मुलांच्या दृष्टीने योग्य नसतील तर सेन्सर बोर्ड ते सिन्स काढू शकतो.

 

ए (केवळ प्रौढांसाठी) :

 

censor board-inmarathi01

 

ज्या चित्रपटात खूप जास्त प्रमाणात अडल्ट कंटेंट असतो त्या चित्रपटांना ए सर्टिफिकेट देण्यात येते. हे चित्रपट १८ वर्षांवरील लोकच बघू शकतात.

कारण ह्या चित्रपटांत न्युडीटी, डबल मिनिंग शब्द, शिवीगाळ, हिंसा आणि अडल्ट सिन्स असल्याकारणाने हे चित्रपट लहान मुलांसाठी योग्य समजलं जात नाहीत. पण अशा चित्रपटातील सिन्स सुद्धा सेन्सॉरबोर्ड कापू शकते.

 

एस (एका विशिष्ट समूहासाठी) :

 

censor board-inmarathi05

 

एस सर्टिफिकेट असणारे चित्रपट हे सामान्य लोकांसाठी नसतात. हे चित्रपट एका विशिष्ट समूहासाठी बनवले जातात आणि त्यांनाच दाखवले जातात.

जसे की डॉक्टर, इंजीनियर, शास्त्रज्ञ वगैरे एखाद्या समूहाच्या लोकांना असे चित्रपट बघण्याची मुभा असते.

चित्रपट कितीही उत्तम असला तरी त्या चित्रपटाला सर्टिफिकेट असल्याशिवाय चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकत नाही.

व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत असल्याची ओरड बॉलीवूड सातत्याने करत असते. अशीच परिस्थिती आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

प्रक्षोभक दृश्य लहान मुलांनी पाहू नयेत, हा त्यामागील विचार योग्यच आहे. मात्र, असं करत असताना व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे.

म्हणूनच सेन्सॉरशिपचा निर्णय घेत असताना या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य साधणं सुद्धा गरजेचं आहेच…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?