“हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भीमा कोरेगाव दंगल ही यल्गार परिषदेने घडवली आणि त्या यल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. दलित समाजाच्या चळवळीत घुसून जय भीम म्हणत नक्षलवादी वृत्ती जोपासून दलित चळवळ बदनाम करण्याचं कारस्थान मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र दलितांनी आता सतर्क झालं पाहिजे.

हिंदू आणि दलित वाद कधीच नाही, कारण दलित हे हिंदू आहेत. जगाचा बाप असणारे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की “माझे आणि बुद्धांचे विचार जोपर्यंत या भूतालावावर जिवंत आहेत तोवर नक्षलवादी वृत्तीला थारा देऊ नका. ठेचून काढा.” बाबासाहेबांचा विचार वेगळा आणि नक्षलवाद्यांची कारस्थाने वेगळी.

आज अन्न, वस्त्र, निवारा आणि भौतिक सुविधा मिळवण्यासाठी आम्ही आमच्या पराकाष्टा करत असताना दलितांना हाताशी धरून शहरी नक्षलवाद फोफावण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

 

bhimakoregaon_elgarparishad_inmarathi
facebook.com/bhimakoregaon200

१४ एप्रिल २०१६ रोजी आदरणीय बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आणि त्यात नानाजी नागोसे या पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. हे भावांनो कधीच विसरू नका.

एका बाजूला जय भीम म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला जय भिमच्या म्हणणाऱ्या जयंतीवर हल्ला करायचा. याचा अर्थ सरळ आहे की, लाल सलाम जय भीमवर हल्ला करतो आणि करत राहील कारण वाघाला कितीही गोंजारलं तरी एके दिवशी भूक लागली की आपल्याला फाडणार हा नियम आहे.

नक्षलवादी समर्थक अथवा थेट त्या चळवळीला उघडं पाडण्यासाठी ज्या ज्या वेळी लिहिलं जातं तेव्हा दलित समाजाच्या बदनामीचा अथवा दलित चळवळीच्या विरोधाचा डांगोरा पिटला जातो. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान आहेत. कुण्या लुंग्या सुंग्यांनी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्नही करू नये.

भीमा कोरेगाव दंगल घडली तेव्हाही बोललो होतो आणि आताही त्यावर ठाम आहे. सातत्याने हेच सांगत आलो की दलित समाजाला जर कुणी खोल दरीत लवंडण्याचं पाप करत असेल तर ते आहेत प्रकाश आंबेडकर.

 

prakash-ambedkar-marathipizza

 

दलित म्हणून मला समाजाचा प्रचंड अभिमान आहे भावांनो. कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करावी लागणार आहे. बाबासाहेबांनी कर्तृत्वाने दलितांना दिलेला संस्कार जर खुद्द आंबेडकर आडनाव लावून आणि नातू म्हणवून घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना जपणे शक्य नसेल तर त्यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊच नये. नक्षलवादी चळवळी आता जंगलातून शहरात कूच करत आहे.

यल्गार परिषद ही तर शहरी नक्षलवादाची एक प्राथमिक ट्रायल होती.

आज Times Now या चॅनलवर बोलताना आता खुद्द प्रकाश आंबेडकरांनी जाहीर धमकी दिली आहे. जर सुधीर ढवळे आणि संबंधितांना अटक केली तर प्रकाश आंबेडकरांना त्याचे वाईट वाटण्याचे कारण मला अजून उमगलं नाही. वृत्तवाहिनीवर बोलताना थेट प्रकाश आंबेडकरांनी शिवराळ भाषा वापरत पत्रकार आनंद नरसिंहन यांना वापरलेली धमकी प्रचंड मोठ्या विषयाला वाचा फोडते आहे.आणि हे दुर्दैव आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणतात…

“हम तुम्हारी ** मारेंगे. तुम्हे लगता है ये सरकार ५ साल चलेगी ? सरकार ६ महिने में बदल जाएगी, हम तुम्हारे पिछे लग सकते है. सरकार बदलने दो, फिर उसे देख लेंगे| मिलेंगे सरकार बदलने के बाद…”

असं म्हणत त्यांनी थेट चर्चेतून काढता पाय घेतला.

prakash ambedkar threatening times now reporter

 

जर नक्षलवाद्यांशी हितसंबंध आहेत म्हणून कारवाई होत असेल आणि ती कारवाई जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीला अधीन राहून पोलीस करत असतील तर प्रकाश आंबेडकरांना इतकं दुखः का होतं? प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही का याचा खुलासा करावा.

मनुस्मृती मानणारा म्हणून तुम्ही कितीही टाहो फोडून माझ्यावर गरळ ओका. मनुस्मृती तेव्हाही जाळली होती आताही जाळली जाणार आणि पुढेही जाळू. बाबासाहेबांच्या संविधानाला प्रमाण मानूनच देश चालणार आहे आणि चालतो आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. दलित समाज्याच्या कल्याणाचा विचार करून तुम्ही प्रगतीचा यल्गार करा हा विकास तुमच्या सोबत उभा राहील. प्रकाशराव केवळ तुम्ही दलित समाजच नाही तर अखंड मानव जातीचे नेते व्हाल हेच मी सातत्याने सांगतो आहे.

जय भीम

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

One thought on ““हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय?

  • December 5, 2018 at 3:06 pm
    Permalink

    I am not agree with you

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?