इयरफोन्स वापरण्याचे हे धोके जाणून घेतलेत तर इयरफोन्स वापरणे बंद कराल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
जेव्हापासून स्मार्टफोन्स आले आहेत तेव्हापासून त्यांच्यासोबत येणाऱ्या त्या इअरफोन्सची क्रेझ देखील वाढली.
आजकाल रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीच्या हातात स्मार्टफोन आणि कानात इयरफोन्स दिसून येतात. हे सतत कानात इयरफोन घालून राहणे किती घातक असू शकते हे वारंवार अनेक माध्यमांतून आपल्याला सांगितले जाते.
पण तरी देखील कदाचित आपण त्याला हवं तेवढ्या गांभीर्याने घेत नाही.
पण खरंच असं निष्काळजीपणे निरंतर इयरफोन्सचा वापर करणे आपल्या कानांसाठी खूप घातक ठरू शकते.
तुम्हाला देखील कानात इयरफोन लावून फिरायची सवय आहे का? जर असेल तर लवकरात लवकर ही सवय सोडण्याचा प्रयत्न करा.
कारण असं करणं तुमच्या कानांसाठी अतिशय घातक ठरू शकते. ईएनएटी स्पेशालिस्ट ह्यांच्या मते आपला कानात पडणारी निरुपयोगी ध्वनी ही कानाच्या पडद्याला लागून वापस येते.
पण जेव्हा आपण इयरफोन लावून काही ऐकत असतो तेव्हा मल्टीपल फ्रिक्वेन्सीजच्या टोन म्हणजे उपयोगी आणि निरुपयोगी असे दोन्ही ध्वनी कानाच्या पडद्यावर आदळतात.

मल्टीपल फ्रिक्वेन्सीजच्या टोन कानाच्या पडद्यावर आदळल्याने ते सर्व आवाज कानातच फिरत असतात. ज्यामुळे आपल्या कानाच्या नसांना त्रास होऊन त्या कमकुवत होतात.
जर तुम्ही खूप काळ इयरफोनचा वापर केला असेलं तर त्यामुळे आपल्या कानाच्या नसा थकतात.
पण आपलं ह्याकडे कधी लक्ष जात नाही किंवा ते आपल्याला कळून येत नाही कारण कानातील नसा ह्या इलैक्ट्रिक इम्पल्सवर काम करत असतात.
इयरफोन्सचा नियमित वापर करणाऱ्या लोकांना जवळून ऐकण्याची सवय होऊन जाते, त्यामुळे त्यांना दूरचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही.
तसेच इयरफोन कानाला लावून गाडी चालवल्याने त्याचा परिणाम सरळ मेंदूवर होतो. ह्यामुळे आपला मेंदू विचलित होऊन जातो, त्याचं लक्ष इयरफोनच्या आवाजावर केंद्रित होत नि ह्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो.

रिपोर्टनुसार दर दिवशी ४-५ तरुण ह्या रोगाला बळी पडत आहेत.
मोबाईलफोन आणि इयरफोन्सच्या अतिवापरामुळे ह्या तरुणांमध्ये हियरिंग लॉस सारख्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
ऑडियोमिट्री द्वारे करण्यात आलेल्या ऐकण्याच्या एका तपासणीत २५ ते ३० टक्के लोक या रोगाने ग्रासले असल्याचे समोर आले आहे.
पण नसांना नुकसान झाल्यामुळे ह्यावर कुठलाही उपचार होऊ शकत नाही हे दुर्दैव आहे.
त्यामुळे ह्या आजारापसून वाचण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे इयरफोन्सचा कमीतकमी वापर करणे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
test comment