' बाळाची अम्ब्लिकल कॉर्ड सुरक्षित ठेवणाऱ्या ब्लड बँक : लोकांना लुटण्याचा गोरख धंदा?

बाळाची अम्ब्लिकल कॉर्ड सुरक्षित ठेवणाऱ्या ब्लड बँक : लोकांना लुटण्याचा गोरख धंदा?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लहान मुलांच्या जन्मा अगोदर आजकालच्या पालकांना डॉक्टर्स असे सल्ले देतात की, जर होणाऱ्या बाळाला कुठला जेनेटिक आजार झाला तर बाळाचे अम्ब्लिकल कॉर्ड ब्लडचा वापर करून बाळाचा उपचार केला जाऊ शकतो. ह्या कारणामुळेच अनेक पालक हजारो-लाखो रुपये खर्च करून आपल्या बाळाच्या अम्ब्लिकल कॉर्ड ब्लडला प्रायव्हेट कॉर्ड ब्लड बँकेत सुरक्षित राखून ठेवतात. पण इंडियन अकॅडमी ऑफ पीडिऐट्रिक्स म्हणजेच IAP च्या मते कॉर्ड ब्लडमपो खूप कमी वापर होतो. IAP कडून एक स्टेटमेंटमध्ये प्रायव्हेट कॉर्ड ब्लड बँकिंग इंडस्ट्रीवर टिका करण्यात आली. ह्या स्टेटमेंटमध्ये सांगितले गेले की, हे लोक खोट्या गोष्टींचा प्रचार करत स्वतःच्या फायद्यासाठी आणि व्यवसायासाठी लोकांचे शोषण करत आहेत.

 

umbilical cord-inmarathi03
detcare.com

IAP ने सांगितले की, ‘कॉर्ड ब्लडच्या विषयात आई-वडिलांच्या आपल्या पाल्याप्रती दायित्व निभावण्याच्या भावनेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो आहे. ह्या प्रायव्हेट कॉर्ड ब्लड बँक भविष्यात होणाऱ्या आजारांच्या उपचारासाठी ह्या कॉर्ड ब्लडचा चुकीचा वापर करत आहे. कारण लहान मुलांसाठी ह्या कॉर्ड ब्लडचा वापर कमी प्रमाणात होतो. तसेच प्रायव्हेट कॉर्ड ब्लड बँकांच्या जाहिराती ह्या निव्वळ दिशाभूल करण्यासाठी असतात. जसं काही कॉर्ड ब्लड एखाद बायोलॉजिकल विमाच आहे.

 

umbilical-cord-inmarathi02
future-health.bg

अमेरिकन सोसायटी फॉर ब्लड अॅण्ड मॅरो ट्रांसप्लांटेशननुसार, बाळाला त्याच्याच कॉर्ड ब्लडने फायदा पोहचण्याची शक्यता ही केवळ ०.०४ टक्के ते ०.०००५ टक्के एवढीच असते. जेनेटिक आजारांच्या उपचारासाठी आपल्याच कॉर्ड ब्लडचा वापर केला जाऊ शकत नाही. कारण त्यांचं म्युटेशन देखील सारखंच ठरेल. IAP च्या मते कॉर्ड ब्लड सेल्सचा वापर केवळ हाय रिस्क सॉलिड ट्युमर सारख्या आजारांत होतो.

 

umbilical-cord-inmarathi05.jpg
lifecell.in

IAP च्या जर्नल इंडियन पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित स्टेटमेंटमध्ये डॉक्टरांमध्ये करण्यात आलेला एक सर्व्हे देखील समाविष्ट होता. ह्या सर्व्हेनुसार ६० टक्के डॉक्टरांना हे माहितच नव्हते की ते कुठले आजार आहात ज्याचा उपचार कॉर्ड ब्लड सेल ट्रांसप्लांटेशनमुळे केला जाऊ शकतो. तर ९० टक्के डॉक्टरांच्या मते बाळाच्या त्याच्या अम्ब्लिकल कॉर्डचा वापर थॅलसीमियाच्या उपचारासाठी केला जाऊ शकतो, जे पूर्णतः चुकीचे आहे. भारतात प्रायव्हेट कॉर्ड ब्लड बँकिंग इंडस्ट्री जवळपास ३०० कोटीची आहे. एका बाळाची अम्ब्लिकल कॉर्ड २० वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी ५० हजार ते १ लाखापर्यंतचा खर्च येतो.

त्यामुळे आता ह्यावर किती विश्वास ठेवायचा आणि बाळाची अम्ब्लिकल कॉर्ड सुरक्षित करावी की नाही हे ठरवणे खरंच खूप कठीण आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?