' नासाच्या अंतराळवीरांनी बनवला अचाट करणारा रेकॉर्ड !

नासाच्या अंतराळवीरांनी बनवला अचाट करणारा रेकॉर्ड !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

प्रत्येक वर्षी नासा आपल्या काही अंतराळवीरांना स्पेस किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवते. ह्यावेळी पण त्यांनी आपल्या अंतराळवीरांना स्पेसमध्ये पाठवले पण ह्यावेळी काहीतरी असं घडून आलं ह्याचा विचार कदाचित कोणीही केला नव्हता. ह्यावेळी दोन अंतराळवीरांनी नकळत एक रेकॉर्ड ब्रेक केला. ह्या दोघांनी सर्वात लांब स्पेसवॉकचा जुना रेकॉर्ड तोडून एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे.

पिटीआयच्या रिपोर्टनुसार स्पेस स्टेशनवर रिपेअरिंग आणि मेंटेनेंसचे काम करणाऱ्या दोन वैज्ञानिक ड्रु फ्युस्टल आणि रीकी ऑर्णाल्ड ह्यांनी जवळपास ६:३० तास स्पेसवॉक केला. जो त्यांचा ह्या वर्षीचा पाचवा स्पेसवॉक होता.

 

spacewalk-inmarathi01
equity.media

ह्या दोन वैज्ञानिकांनी हा कारनामा स्पेस स्टेशनवर आपल्या ५५ दिवसांच्या मिशन दरम्यान एका लिक पंपाला ठीक करताना घडवून आणला. हा पंप फ्लो कंट्रोल सबअसेम्ब्ली इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या आतील कुलिंग सिस्टीम साठी अतिशय महत्वाचा होता आणि तो स्पेस स्टेशनवर आढळणाऱ्या अमोनियाला योग्य पद्धतीने स्टेशनबाहेर फेकण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतो.

 

spacewalk-inmarathi
theverge.com

आजवर स्पेस स्टेशनवर गेलेल्या अनेक अंतराळवीरांनी एकूण ५४ दिवस १६ तास ४० मिनिटे एवढा वेळ स्टेशनबाहेर स्पेसवॉक करताना घालवला आहे. पण ह्यावेळी हे अंतराळवीर स्पेसमध्ये फिरत नव्हते तर पृथ्वीची परिक्रमा करत असताना ह्या विशाल स्पेस लेबॉरेटोरीच्या मेंटेनेंसचे काम करत होते.

 

spacewalk-inmarathi02
nasa.gov

ह्याआधी देखील अंतराळात खूप वेळ पर्यंत चालण्याचा विक्रम बनलेला आहे. एका रिपोर्टनुसार आतापर्यंत अंतराळात सर्वात लांब स्पेसवॉक ८ तास ५६ मिनिटांचा होता. हा ११ मार्च २००१ साली नासाचे दोन अंतराळवीर जिम वॉस आणि सुसन हॅल्‍मस ह्यांनी बनविला होता. तर दुसऱ्या स्तानी रशियाचे दोन अंतराळवीर फ्योडोर यर्चिखिन आणि फ्लाइट इंजीनियर अलेक्जेंडर मिसयुर्खिन ह्यांनी १६ ऑगस्ट २०१३ साली ७ तास २९ मिनिटे स्पेसवॉक केले होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?