' या ६४ वर्षीय भारतीय महिलेने रक्त संकलनाचे आजवरचे सर्व रेकॉर्ड्स तोडलेत ! – InMarathi

या ६४ वर्षीय भारतीय महिलेने रक्त संकलनाचे आजवरचे सर्व रेकॉर्ड्स तोडलेत !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

ऑगस्ट २०१६ मध्ये, बंगळुरुच्या डिस्ट्रिक्ट ३१९० येथील रोटरीच्या एका टीमने इतिहासात त्यांचं नाव कोरलं. त्यांनी ३०३४ लीटर रक्त कर्नाटकातील १३ वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा केलं. ते सुद्धा फक्त ८ तासाच्या कालावधीत, हा एक गिनीज बुकचा रेकॉर्ड होता जो आजपर्यंत त्यांचा नावावर आहे.

या संपूर्ण टीम मध्ये ६४ वर्षीय लता आमाशी ह्या स्वयंसेवक म्हणून सहभागी झाल्या होत्या. कर्नाटकातील दीनदलितांची सेवा लता आमाशी मागील १७ वर्षांपासून करत आहेत. त्यांचातील अफाट ऊर्जेने आणि जबरदस्त साहसाने त्यांचे रूपांतर एका कार्यकुशल महिलेत केले आहे.

लता यांचा जन्म दिल्लीत कन्नड दाम्पत्याचा पोटी झाला. काहीतरी बदलण्याची इच्छा लहानपणापासून त्यांचात होती. लता यांचे आई वडील देखील समाजकार्य करायचे. लता यांचे वडील संयुक्त राष्ट्रांत उच्च पदस्थ अधिकरी होते. लतासाठी त्यांचे पालक हे सामाजिक कार्य करण्यामागील सर्वोच्च प्रेरणा होते.

 

lata-amashi-inmarathi
indianwomenblog.org

शिक्षण झाल्यावर लता सिंडिकेट बँकेत नोकरीला लागल्या. ते करत असताना देखील लता यांनी जवळच्या स्थानिक बाजारातील गरीब विक्रेत्यांचा मुलांचा अभ्यासाचा खर्च उचलला व त्यासाठी त्या थोड्याफार प्रमाणात योगदान देत राहिल्या. त्यानंतर कौटुंबिक कारणांनी त्यांनी नोकरी सोडून बंगळुरु विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. त्यांचा समाज कार्याला इथूनच खरी गती मिळायला सुरुवात झाली. त्यांनी रोटरीच्या संपर्कात येण्या आधी गरीब अंध मुलांसाठी काम केलं.

तब्बल ३०००० मोतीबिंदूपीडित बालकांची त्यांनी शस्त्रक्रिया करून घेतली.

परंतु त्यांची समाज कार्य करण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती आणि हीच इच्छा त्यांना रोटरी क्लब ऑफ बंगळुरु डिस्ट्रिक्ट ३१९० च्या दरवाज्यापर्यंत घेऊन गेली. रोटरी क्लब ही अंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या संपर्कात येताच लता यांना अनेक समविचारी मित्र मिळाले. समाजसेवेच्या लता यांच्या कामात रक्तदानाने महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना रक्तदान ही आवडीची गोष्ट झाली.

रोटरीमध्ये कार्यरत असताना लता खूप उत्साहाने रक्तदान व तत्सम उपक्रमात सहभागी होऊ लागल्या. त्यांनी त्यांचं उरलेलं आयुष्य समाजसेवेसाठी वाहून दिलं. लोकांमध्ये आरोग्यविषयक समस्यांविषयी जागृती करणे व प्रामुख्याने TTK ब्लड बँक यांचा सोबत रक्तदान शिबिरांचे आयोजन हे त्यांचं काम होतं.

 

lata-amash-inmarathi
manoramaonline.com

त्यांचा समाजसेवेचा प्रवास त्यांना अनेक अश्या अवघड भागात घेऊन गेला. त्यांनी अनेक खस्ता त्यासाठी खाल्या, पण प्रत्येक प्रसंगातून त्या शिकल्या व नव्या उमेदीने कामाला लागून त्यांनी काम करून घेतलंच.

लतांनी रक्तदानासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी रिक्षावाले, बाईकवाले आणि कार चालवणाऱ्या लोकांनाही प्रोहोत्सहित केले. त्यांनी देखील या कार्यक्रमात सहभागी होऊन रक्तदान केले आणि हे सिद्ध केले की त्यांचात जरी लाख फरक असेल तरी ते रक्ताच्या नात्याने बांधले गेले आहेत. लता यांचा प्रवास हास्य , दुःख , शिकवण या सर्वानी व्याप्त आहे.

एकदा एका दहा वर्षीय मुलाला ज्याला डेंग्यूची लागण झाली होती त्याचसाठी लता यांनी शिबिराचे आयोजन केले. तो मुलगा याने इतका आनंदी झाला की त्याने लता यांना ” fairy Aunty” म्हणायला सुरुवात केली. जेव्हा तो मुलगा ICU मध्ये होता तेव्हा त्याचा वाढदिवस होता, खास त्याचा इच्छेखातर लता यांनी त्याच्यासाठी केक बनवून त्याला भरवला होता. दुर्दैवाने त्याचा दुसऱ्या दिवशीच तो मुलगा दगावला.

या घटनेने लता यांचे डोळे उघडले, त्यांनी त्यांचं समाजकार्य चालू ठेवलं. त्यांच्याकडे रक्ताची मागणी करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली होती. कधीकधी परराज्यातील लोक सुद्धा लता यांची मदत मागत. लता त्यांच्या संपर्क यंत्रणेचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यँत मदत पोहचवली आणि अनेकांचे आयुष्य वाचवले.

मरणशय्येवर असलेल्या वृद्धापासून ते घरापासून लांब असलेल्या तरुणांपर्यंत, सर्वांची त्यांनी मदत केली.

हे एवढं सोपं नव्हतं, लता यांनी अनेक समस्यांचा सामना केला, अनेकदा लोक रक्तदान करायला तयार होत नसत, ते सरळ नकार देत , अश्यावेळी लता यांनी प्रयत्न चालू ठेवले. १० वर्षापूर्वी लता यांनी ज्या समस्यांना लता सामोरं गेल्या त्या समस्या आज निवळल्या आहेत. आज कुठलीच समस्या अस्तित्वात नाही. आज लोकांचं मत आणि दृष्टिकोन बदलत आहे, अशी भावना लता यांनी व्यक्त केली.

 

blood-donation-inmarathi
healththoroughfare.com

आज लता रक्तदान क्षेत्रातील पदाधिकारी आहेत व असंख्य रक्तदान व संबंधित गोष्टींवर लक्ष ठेवून समाजकार्य करत आहेत. रक्तदान शिबिरांपासून जनजागृती पर्यंतची अनेक कामं लता करत आहेत. अचानक आलेल्या सुचनेवर गरजूपर्यंत रक्त पोहचवण्याचे काम लता करत आहेत. एवढी मोठी यंत्रणा त्यांनी स्वतःहून उभी केली आहे. शिवाय कमी वेळात सर्वाधिक रक्तदान करवून रक्त जमा करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.

एवढयावरच न थांबता लता डायबेटीस जनजागृती कार्यक्रम देखील चालवत आहेत. असे मोठे कार्यक्रम चालवताना त्यांना गरज असते मोठयाप्रमाणावर निधीची. अश्यावेळी त्या खूप प्रयत्न करून त्यांचा कार्यक्रमासाठी प्रायोजक शोधत असतात. डायबेटीस मोहीमेसाठी त्यांनी एका फार्मा कंपनीला देखील हाती घेतलं होतं. कधीकधी त्यांना निधीची पूर्तता न झाल्यावर स्वतःच्या खिशातून त्यांनी निधी देऊ केला आहे.

निधींसंकलन करण्यासाठी त्यांनी विविध व्हिडिओ माध्यमातून प्रचार करणं सुरू केलं आहे. हे व्हिडिओ ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रक्तदाते ते तयार करत आहेत, त्यासाठी त्यांना २५ लाखापेक्षा जास्त खर्च त्यांना आला आहे.

लता हे कार्य त्यांचा कुटुंबाच्या विरोधात जाऊन करत आहेत. त्यांनी त्यांचा बँकेतील सर्व साठवणी या कार्याला अर्पण केल्या आहेत. रोटरी क्लब कडून त्यांना आर्थिक मदत मिळाली आहे पण ती पुरेशी नाही. त्या समाजाकडून मदतीची अपेक्षा लावून आहेत. लता म्हणतात,

“जर समाजाला आपण काही देऊ करत आहोत तर समाजाने ही त्याची परतफेड म्हणून काही तरी केलं पाहिजे. नुसतंच रक्तदान नव्हेच तर विविध Bone Marrow अश्या अनेक गोष्टींच दान लोक करतात. यातुन अनेकांचे जीव वाचतात. पण यासाठी खूप मोठी यंत्रणा उभी करावी लागते, गरजवंताला अपेक्षित असलेली गोष्ट त्याचा पर्यंत पोहचवणे हे देखील खूप काटेकोरपणे करावं लागणारं काम आहे.”

लता म्हणतात की त्यांना कधी नकार ऐकायला आवडत नाही, त्यांना काम करत राहायला आवडते. जर कोणी त्यांच्याकडे मदत मागितली तर त्या व्यक्तीला कधीच नाही म्हणू शकत नाही. त्या व्यक्तीला मदत केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही कारण प्रत्येक व्यक्तीला केलेली मदत ही एक ईश्वरसेवा आहे असं त्या समजतात. त्या म्हणतात की त्यांचं कार्य आज खूप पसरलं आहे. अश्यावेळी त्या एकटीने सर्व सांभाळताना आर्थिक गरज खूप निर्माण होत असते. यासाठी समाजाची मदत आवश्यक आहे कारण त्या हे कार्य निस्वार्थपणे फक्त समाज हितासाठी करत आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?