कार घेऊन फिरायला जाताय? या गोष्टींची खात्री करायला विसरू नका
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळा म्हणजे सुट्ट्या, व्हॅकेशन चा सिझन. ह्यावेळी अनेकजण हे बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असतात. आणि या उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक जास्तकरून एखाद्या हिलस्टेशनवर जाण्याचा कार्यक्रम करतात. पण जर तुम्ही कारने हिल स्टेशनला जायचा विचार करत असाल तर त्याआधी ह्या काही गोष्टी नक्की तपासून घ्या.

मैदानी भागांच्या तुलनेत डोंगराळ प्रदेशांत गाडी चालविणे हे अतिशय कठीण आहे. म्हणून सर्वात आधी हे तपासून घ्या की, तुमची गाडी अश्या प्रदेशात चालविण्यासाठी योग्य आहे की नाही. तसेच गाडीचे टायरही एकदा तपासून घ्या. ते घासले गेले तर नाही ना हे बघून घ्या. डोंगराळ प्रदेशात गाडी चालविण्यासाठी टायरची ग्रीप ही चांगली असायला हवी. कारण अश्या प्रदेशातील रस्ते हे जास्तकरून वळणाचे असतात.
तुमच्या गाडीत टूल किट आहे की नाही हे देखील एकदा तपासून घ्या. त्यात सर्व अवजारे व्यवस्थित आहेत की नाही तेही बघा, जर प्रवासादरम्यान द्खी काही झाले तर हे अवजार तुमच्या कामी पडू शकतात. त्यासोबतच गाडीत नेहमी एक स्पेअर टायर देखील ठेवा.

गाडीचे लाईट ठीक आहेत की नाही त व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे एकदा तपासून पहा. कारण डोंगराळ प्रदेशात सायंकाळ होताच अंधार पसरून जातो आणि काहीही दिसत अन्ही. तेव्हा तुंच्या गाडीचे हेडलाईट आणि टेल लाईट्स व्यवस्थित काम करणे आवश्यक असते.

टायरमध्ये हवेचं प्रेशर किती आहे हे देखील तपासून घ्यावे. टायरमध्ये हवा जास्तही नको आणि मर्यादेपेक्षा कमीही नको. त्यासोबतच गाडीचा व्हायपर सिस्टीम देखील चेक करावे, जेणेकरून प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवू नये.

सिग्नल इंडिकेटर हे खूप गरजेचं असतं. ह्यामुळे दिशा बदलताना, वळण घेताना तर उपयोग होतोच त्यासोबतच जर रस्त्यात कशी गाडी खराब झाली त्याचं सिग्नल म्हणून तुम्ही हे इंडिकेटर दाखवू शकता. म्हणून बाहेर फिरायला जाण्याआधी हे नक्की तपासून घ्यावे. तसेच ब्रेक सिस्टीम देखील तपासून घ्यावे.

प्रवासाचा आणि सुट्ट्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गाडी नीट तपासून घ्या म्हणजे प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा अडथळा येणार नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.