' प्राचीन भारताची ही नावं माहिती नसणं, आपल्या इतिहासाबद्दलच्या अनास्थेचं लक्षण आहे – InMarathi

प्राचीन भारताची ही नावं माहिती नसणं, आपल्या इतिहासाबद्दलच्या अनास्थेचं लक्षण आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपल्यापैकी अनेकजणांना आपल्या देशाचं नाव एक तर भारत असल्याचं माहीत आहे नाहीतर इंडिया. ज्यांना इतिहासात रुची आहे तेच भारताला भारतवर्ष म्हणून किंवा आर्यवर्त म्हणून संबोधतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भूतकाळात आपला भारत देश हा इतरही बऱ्याच नावांनी ओळखला जात असे. त्यातलीच काही नावं आणि त्या नावांच्या उगमाच्या गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहोत.

 

india-map-marathipizza

 

जांबूद्वीप :

जांबूद्वीप हे भारताचं खूप जुनं नाव आहे. याचा शब्दशः अर्थ जांब वृक्षांची जमीन. भारताचा हा उल्लेख विविध धार्मिक ग्रंथात वाचावयास मिळतो.

जांब म्हणजे जांभूळ आणि द्वीप म्हणजे विस्तीर्ण प्रदेश.

नाभिवर्ष :

जैन साहित्यात, भारताला नाभिवर्ष या नावाने ओळखले जाते. नाभी हा चक्रवर्ती राजा होता आणि पहिल्या जैन तीर्थंकर रिषभनाथाचा तो वडील होता.

पुरातन भारतीय ग्रंथात नाभिवर्ष याची आणखी एक व्याख्या सापडते. हिंदू ग्रंथानुसार, नाभी म्हणजे ब्रह्मदेवाची नाभी आणि वर्ष म्हणजे देश. ब्रह्मदेव हा हिंदू तत्वज्ञानात विश्वनिर्माता मानला जातो. म्हणून हे नाव.

आर्यवर्त/ द्रविड :

संस्कृत साहित्यात आर्यवर्त हे नाव उत्तर भारतासाठी वापरले आहे. मनुस्मृतीमध्ये हा हिमालयीन रांगा आणि विंध्य पूर्वेच्या पर्वतरांगांमधील बंगालच्या उपसागरापासून अरेबियन समुद्रामधील मार्ग असल्याचे म्हटले आहे.

===

हे ही वाचा – रामायण, महाभारतापुर्वी इतिहासातील हे पहिलं महायुद्ध भारतभूमीवर लढलं गेलं होतं!

===

aryavart-inmarathi

 

दुसरीकडे, दक्षिण भारत हा द्रविड नावाने ओळखला जातो. द्रविड भाग हा आधुनिक भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा आणि छत्तीसगढचा काही भाग याचा मिळून बनलेला आहे.

यात अंदमान निकोबार बेटे हे केंद्रशासित प्रदेश, लक्षद्वीप आणि पॉंडीचेरी हे ही येतात.

भारतवर्ष/भारतम् :

विष्णू पुराणातला पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो.

उत्तरम्य समुद्रस्य, हिमाद्रे शैव लक्षणम् |
वर्षम् भारतम् नाम, भारतीय यत्र संततिः ||

म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जी भूमी तिचे नाव आहे, भारत अन् त्या भारतभूमीची संतती ते भारतीय आहेत.

इथे, भारत हा शब्द पौराणिक वैदिक काळातील राजा भरताला उद्देशून आलाय तर वर्ष म्हणजे देश.

 

vishnupuran inmarsthi

 

भारत :

भारत, आपल्या देशाचे हिंदीतील संवैधानिक नाव हा भारतवर्ष या शब्दाचे छोटे रूप आहे. असे म्हणतात की, शकुंतला ही  विश्वामित्र  ऋषींची  मेनका या अप्सरेपासून झालेली कन्या होती. तिचा विवाह पुरुवंशीय राजा दुष्यंताशी झाला होता.

त्यांचा पुत्र पराक्रमी भरत होता. भारत हा त्याच राजा भरताला उद्देशून आला आहे. यावरून आपल्या देशाला भारत हे नाव पडले असावे असा एक मतप्रवाह आहे.

 

bharat-inmarathi

 

तर काहींच्या मते, मनू हा पृथ्वीवरील आदिपुरुष आणि त्यांची पत्‍नी शतरूपा ऊर्फ बार्हिष्मती म्हणजेच आद्य स्त्री यांच्या संतानांनी पुढे विश्वात मानवजात अस्तित्त्वात आली.

मनूचे पुत्र मानव म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यातील प्रियव्रताच्या सात मुलांपैकी एकाचे नांव अग्निध्र होते.

अग्निध्राला वारसाहक्काने जंबूद्वीप नावाचा प्रदेश मिळाला. अग्निध्राचा मुलगा नाभि आणि त्याची पत्‍नी मेरुदेवी यांचा पुत्र ऋषभदेव होता. या ऋषभदेवामुळे जंबूद्वीपाला अजनाभवर्ष या नावाने ओळखले जाऊ लागले.

ऋषभदेवाची पत्‍नी ही इंद्रकन्या जयंती होती व त्यांना भरत नावाचा मुलगा होता. हा जडभरत या नावाने ज्ञात आहे. त्या ऋषभपुत्र भरतामुळे अजनाभवर्ष नावाचा देश भारत या नावाने प्रसिद्ध झाला.

‘भा’म्हणजे तेज व ‘रत’म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत.

हिंद :

 

jai hind inmarathi

 

हिंद हा पर्शियन भाषेत सिंध या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. इतिहासकारांच्या मते, पर्शियन लोकांना सिंध हा शब्द नीट उच्चारता येत नसे. ते स ला ह म्हणत. म्हणून सिंध हा शब्द हिंद असा म्हटला जाऊ लागला.

हिंदुस्थान :

हिंदुस्तान या शब्दाचा इतिहास हिंदू कुश डोंगररांगांशी सुद्धा जोडलेला आहे. हिन्दू कुश डोंगरांच्या मागील भागास हिंदुस्तान असे म्हटले जात असे.

हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचे स्थान किंवा हिंदूंची भूमी. ११ व्या शतकात जेव्हा मुघल हिंदुस्तानात आले तेव्हा त्यांना सर्वात प्रथम डोंगरदऱ्यातील या माणसांचा सामना करावा लागला.

अल् हिंद:

काही अरेबिक साहित्यात भारताला अल् हिंद या नावाने संबोधिले आहे.

तियांझु (tianzhu) :

हे इतिहासात चायनीज लोकांकडून वापरण्यात आलेले नाव आहे. हे झेईन-त-जुक असे उच्चारले जात असे.

तेनजिकु ( tenjiku) :

तेनजिकु हे भारताच्या चायनीज नावाचे म्हणजेच tianzhu चे जापनीस भाषांतर आहे.

चिऑनचूक (Cheonchuk) :

हे भारताचे इतिहासातील कोरियन नाव आहे.

शेंदू :

Sima Qian’s Shiji या Scribes Record मध्ये , भारताचा उल्लेख शेंदू म्हणून केलेला दिसतो. कदाचित हा सिंधू शब्दाचा अपभ्रंश असावा.

===

हे ही वाचा – मुघलांच्या कचाट्यातून हे राज्य एकहाती वाचवणारा एक दुर्लक्षित योद्धा!

===

तायंडू (Tiandu) :

Hou Hanshu किंवा Book of the Later Han मध्ये, हान डायनेस्टीचा इतिहास वर्णन करणाऱ्या चायनीज कोर्ट डॉक्यूमेंट्समध्ये, भारत हा तायंडू म्हणून ओळखला जातो.

यीनतेजीआ (Yintejia) :

चायनिज कच्छ डायनेस्टीमध्ये भारताला यीनतेजीआ म्हणत.

वुतीआंझु (Wutianzhu) :

हा सुद्धा भारतासाठी चायनामध्ये वापरला जाणारा शब्द. त्याचा शब्दशः अर्थ पाच भारत असा होतो. हा शब्द भारतासाठी वापरण्याचे कारण भारत मुख्यत्वेकरून मध्य, पूर्व,पश्चिम, उत्तर, दक्षिण या पाच भागांमध्ये विभागला जाऊ शकतो.

वू यिन (Wu Yin) :

वू यिन हे चायनीज बुद्धिस्ट विचारवंताने भारताला दिलेले नाव होते. ते सतरा वर्षे भारतात राहिले.

यिनदू (yindu) :

यिन्दू ही सध्या भारतासाठी वापरला जाणारा चायनीज शब्द आहे. हा देखील सिंधू अगर हिंदू या शब्दापासून निर्माण झाल्याचे मानले जाते.

हिदुष (Hidush) :

हिदुष हा पर्शियन शब्द भारतासाठी वापरला जातो. हा शब्द ड्युरियस द ग्रेट याने प्रथम वापरला असे मानतात. ड्युरियसने गांधार ते आत्ताची कराची हा इंडस व्हॅलीचा प्रदेश ख्रिस्तपूर्व ५१५ पर्यंत आपल्या अधिपत्याखाली आणला होता.

होदू :

होदू हा बिबलिकल हिब्रू भाषेतील भारतासाठीचा शब्द आहे.

इंडो :

इंडो हे सध्याच्या जापनीज भाषेतील भारतासाठी वापरलेला शब्द आहे.

इंडिका :

 

indica inmarathi

 

ग्रीक इतिहासकार, मॅगेस्थेनिस याने भारताला इंडिका म्हणून संबोधित केले होते. त्याचा इंडिका हा ग्रंथ आपल्याला मौर्य साम्राज्याची माहिती पुरवतो.

ते मूळ पुस्तक आता अस्तित्वात नाही मात्र त्यातील काही भाग हा नंतरच्या लॅटिन आणि ग्रीक भाषेत उपलब्ध आहे.

सोने की चिडियाँ :

सोने की चिडियाँ, याचा शब्दशः अर्थ सोन्याची चिमणी. भारतीय स्वातंत्र्यवीर आपल्या ब्रिटिशपूर्व भारत देशातुन सोन्याचा धूर निघत असे अशी सुबत्ता होती असे म्हणत.

त्यामुळे खचलेल्या भारतीयांना उभारी देण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य सैनिक आपल्या भूतकाळाबद्दल बोलताना आपल्या देशाला सोन्याची चिमणी म्हणत.

इंडिया :

 

muskurayega india inmarathi

 

सध्या प्रचलित असलेले नाव म्हणजे इंडिया. हे नाव ग्रीक संस्कृतीत इसवीसनपूर्व ४०० पासून वापरले गेले आणि इंग्रजीत नवव्या शतकापासून वापरण्यात आले.

इंडिया नावाचा उगम सिंधू शब्दापासून झाला ज्याचा अर्थ नदी असा होतो. सिंधू म्हणजे कोणती एक विशिष्ट नदी नव्हे.

वैदिक संस्कृतीतील माणसे पश्चिमोत्तर भारताला सप्त सिंधूचा प्रदेश म्हणत. सप्तसिंधू म्हणजे सात नद्यांनी व्यापलेला प्रदेश. या सात नद्यांची संस्कृती म्हणून आपली संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि म्हणूनच हे नावही अगदी चपखल बसते.

 

Indian-flag-inmarathi

 

हे नाव आपलं आपल्या नद्यांशी असणारं अनोखं नातं व्यक्त करते. आपण आपल्या नद्यांशिवाय जगूच शकलो नसतो. त्यामुळे या नावाचा आपण सार्थ अभिमान बाळगायला हवा ज्याचा उगम संस्कृतमध्ये असून त्याचा अर्थ आपली जीवनवाहिनी अशी नद्यांची संस्कृती आहे.

तर अशी ही भारताची विविध नावे आणि त्या नावांच्या उगमाची ही छोटी गोष्ट!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – समुद्रात बुडालेले ‘कुमारी कंदम’ : निव्वळ दंतकथा की लुप्त झालेला भारतीय इतिहास?

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?