व्यायाम आणि डायट न करता देखील तुम्ही प्रदीर्घ आयुष्य जगू शकता ! कसं? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आजकाल सर्वचजण फिटनेस फ्रिक झाले आहेत. त्यासाठी कोणी डायट फॉलो करतो, तर कोणी जिम आणि योगा करतो. ह्याचं कारण म्हणजे सर्वांना फिट राहायचं आहे, कोणालाही कुठला आजार नको, वृद्धत्व नको. सर्वांना एक स्वस्थ आणि प्रदीर्घ आयुष्य हवं आहे. पण एवढे कष्ट घेणे काही सर्वांनाच जमत नाही. मग आता जे लोक व्यायाम करत नाहीत किंवा डायट करत नाही, करू शकत नाहीत काय ते प्रदीर्घ आयुष्य जगू शकत नाही. तर असं अजिबात नाहीये. व्यायाम आणि डायट न करता देखील तुम्ही प्रदीर्घ आयुष्य जगू शकता.

 

lepfitness.co.uk

आज आम्ही आपल्यासोर स्वस्थ आणि प्रदीर्घ आयुष्य जगण्याचे काही मस्त आयडीयाज घेऊन आलो आहोत. ह्यात नाही तुम्हाला जिममध्ये तुमचा घाम गाळायची गरज नाही उकडलेलं बेचव अन्न खायची गरज. आता तुम्ही नक्की विचार करत असाल की हे सर्व न करता कसं काय एवढं चांगलं जीवन जगता येऊ शकत? तर ह्याशिवाय देखील काही अशी करणे आहेत जी तुम्हाला प्रदीर्घ आयुष्य जगण्यात मदत करतात आणि बरं का हे नाही तर एक रिसर्च वरून सिद्ध झालं आहे.

लग्न :

 

marriage-inmarathi
theindianfeed.in

अनेकांना असं वाटतं की लग्न केल्याने जीवन खूप तणावपूर्ण होऊन जातं, आपल्या चित्रपटांचे डायलॉग देखील वेळोवेळी हेच सिद्ध करत असतात, तर लग्न झालेली प्रत्येक व्यक्ती ही कधी गमतीत तर कधी गंभीरपणे हे सांगत असतो की लग्न करू नये. पण विशेषज्ञांच्या मते विवाहित लोक हे अविवाहित लोकांच्या तुलनेत जास्त काळ जगतात.

सेक्स करणे :

 

Sex-inmarathi
greatist.com

आपल्या शरीराच्या काही मानसिक तसेच शारीरिक गरजा असतात ज्या त्या त्या वयात पूर्ण होणे गरजेचे असते. त्यापैकीच एक म्हणेज शारीरिक संभोग किंवा सेक्स. सेक्स करणे हे आल्या आरोग्याच्या दृष्टीने किती चांगले आहे हे तर तुम्हाला माहितच असेल, एव्हाना सेक्स करण्याचे काय काय फायदे असतात हे देखील तुम्ही जाणून असाल. पण काय तुम्हाला हे माहित आहे की सेक्स मुळे तुमचं वय देखील वाढू शकतं. BMJ च्या एका शोधानुसार सेक्स केल्याने कॅन्सर आणि हृदया संबंधी आजारांचा धोका कमी होते आणि तणावही कमी होतो. आणखी एका रिसर्चनुसार नियमितपणे आणि सुरक्षित सेक्स केल्याने तुमचं वय ३ ते ८ वर्षांपर्यंत वाढतं.

जबाबदारी पार पाडणे :

 

responsible man-inmarathi01
environmental.co.uk

काय तुम्ही देखील नेहेमी आपली जबाबदारी इतरांवर टाकत असता? तर आजपासून ही सवय सोडून टाका. जर्नल ऑफ पर्सनॅलीटी अॅण्ड सोशल सायकोलॉजी च्या रिसर्च नुसार जे लोक आपली जबाबदारी चोख पार पाडतात ते इतरांच्या तुलनेत अधिक सामाजिक आणि सकारात्मक असतात. त्यामुळे ते प्रदीर्घ आयुष्य जगू शकतात.

लठ्ठपणा :

 

fat-girl-inmarathi
fiercelyfat.com

जर तुम्ही थोडेजरी लठ्ठ असाल तर ह्यावर आजपर्यंत तुम्हाला अनेकांची बोलणी ऐकावी लागली असतील. अनेकांनी तुम्हाला वजन कमी करण्याचा सल्ला दिला असेल, कोणी वजन कमी नाही केलं तर तुम्हाला खूप आजार होतील अशी भीती देखील दाखविली असेल. तर कोणी तुमच्या लठ्ठपणाची थट्टा देखील केली असेलं. पण आता तुम्हाला तुमच्या लठ्ठपणावर वाईट वाटून घेण्याची गरज नाही कारण, ‘How Men Age’ नावाच्या एका पुस्तकानुसार लठ्ठ लोकांना हृदयविकाराचा धक्का आणि कॅन्सर होण्याची शक्यता खुप कमी असते, म्हणजे त्यांना प्रदिर्घ आयुष्य लाभतं. पण ह्याचा संबंध केवळ थोडेफार लठ्ठ लोक ह्यांच्याशी आहे, ओबेस लोकांशी नाही.

आई-वडील होणे :

 

responsible man-inmarathi
velvet.by

आई-वडील झाल्यावर कोणीही आधीपेक्षा अधिक जबाबदार होऊन जाते. एपिडेमियोलॉजी अॅण्ड कम्युनिटी हेल्थ नुसार अविवाहित लोकांच्या तुलनेत मुलांची जबाबदारी घेणारे लोक २ वर्ष जास्त जगतात.

तर प्रदीर्घ आयुष्य लाभण्यासाठी केवळ स्वस्थ निरोगी राहणेच गरजेचे नाही, जर तुम्ही वरील पोईंट्समध्ये बसत असाल तरी देखील तुम्ही प्रदीर्घ आयुष्य जगू शकता.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?