'उन्हाळ्यात जास्त चिडचिड होते? आहारात ह्या स्ट्रेस रिलीज करणाऱ्या पदार्थांचा समावेश करून बघा!

उन्हाळ्यात जास्त चिडचिड होते? आहारात ह्या स्ट्रेस रिलीज करणाऱ्या पदार्थांचा समावेश करून बघा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

उन्हाळ्यात थंडीच्या तुलनेत मेंदूमध्ये असलेले ‘कॉर्टिसॉल’ नावाचे स्ट्रेस हार्मोन्स अधिक प्रमाणात सक्रीय होऊन जातात ज्यामुळे आपल्याला खूप चिडचिड होते, लहान लहान गोष्टींवर राग येतो.

हे सर्व तुम्ही देखील अनुभवलं असेलं. उन्हाळ्यात एकत्र उष्णतेमुळे आधीच अंगाची लाहीलाही झालेली असताना जर थोडं जरी आपल्याला कुठे काही खटकलं किंवा आपल्या मनासारखं होत नसेल तर आपल्याला खूप लवकर राग येतो आणि मग आपण चिडचिड करायला लागतो.

 

mood-disorder-inmarathi
paradigmmalibu.com

हे सर्व ह्या ‘कॉर्टिसॉल’ हार्मोन्समुळे घडून येतं. ज्यामुळे व्यक्ती स्ट्रेस आणि मूड डिसऑर्डरच्या स्थितीतून जाते. ज्यामुळे आपलं मन खूप अशांत होतं, भावना अस्थिर होतात, राग अनावर होतो आणि शरीर देखील अस्वस्थ होतं. ह्यासार्वांचा सरळ सरळ कार्यक्षमता आणि शारीरिक तसेच मानसिक विकासावर परिणाम होतो.

 

anger-inmarathi
psychologistworld.com

ह्यापासून वाचण्यासाठी, स्वतःला शांत ठेवण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही हेल्थ टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याची मदत तुम्हाला त्या उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी नक्कीच होईल.

 

salmon-fish-inmarathi
bettycrocker.com

सॅलमन फिश, फ्लॅक्स सीड्स, अक्रोड ह्यासारख्या वस्तूंचा आपल्या आहारात समावेश करावा. ह्यामध्ये ओमेगा-३ युक्त लीन प्रोटीन आणि अमिनो अॅसिड असते जो मूड ठीक करण्यात मदत करतो. सॅलमन फिश, फ्लॅक्स सीड्स, अक्रोड आणि रास्पबेरी चे सेवन केल्याने स्ट्रेस दूर होतो. म्हणून दिवसभरातून एकदा सुखा मेवा किंवा फळ नक्की खावे.

 

Milk-egg-paneer-inmarathi
indiafilings.com

दुध, पनीर, दही आणि अंडे ह्यात विटॅमिन बी-१२ खूप मोठ्या प्रमाणात असते. विटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे स्ट्रेस लेव्हल वाढतो. म्हणून अश्या पदार्थांचे सेवन करा ज्यात विटॅमिन बी-१२ चे प्रमाण जास्त असेल.

 

Dark-Chocolate-inmarathi
stylecraze.com

मूड डिसऑर्डर किंवा स्ट्रेस अश्या परिस्थितीत थोडी साखर खा किंवा डार्क चॉकलेटचा एक तुकडा तोंडात ठेवा. ह्यामुळे खराब मूड ठीक होण्यास मदत होते.

 

oatmeal-inmarathi
everydayhealth.com

फॉलिक अॅसिड ने भरपूर ओटमील, सनफ्लॉवर सीड्स, संत्री, डाळी आणि सोयाबीन ने सेरोटोनीन हार्मोन्स वाढण्यास मदत होते. सेरोटोनीन हा गुड हार्मोन आहे जो आपल्याला आनंदी राहण्यासाठी मदत करतो.

 

banana-inmrathi01
tipsdietsehat1001.blogspot.com

केळीमध्ये नैसर्गिक साखर, कार्ब आणि पोटॅशियमचे पुरेशे प्रमाण असते आणि हा एक परफेक्ट ब्रेकफास्ट मानल्या जातो. ह्याचे सेवन केल्याने एंग्जाइटी कमी होते जे स्ट्रेसच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. म्हणून उन्हाळ्यात रोज एक केळी नक्की खावी.

या काही हेल्थ टिप्स वापरून तुम्ही तुमच्या ह्या ट्रेस आणि चिडचिडेपणापासून नक्कीच सुटका मिळवू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?