'पुरोगाम्यांनी लपवलेलं काळंकुट्ट सत्य : केरळातील पोलिसांवरील होतात सर्वाधिक अत्याचार

पुरोगाम्यांनी लपवलेलं काळंकुट्ट सत्य : केरळातील पोलिसांवरील होतात सर्वाधिक अत्याचार

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

देशात कोणत्याही प्रश्नांमुळे निर्माण होणाऱ्या कायदा-व-सुव्यवस्थेची जबाबदारी सुरक्षा यंत्रणांवर असते. पोलीस, केंद्रीय सुरक्षा रक्षा पथके, निम-लष्करी दलं, आणी लष्कर अशा विवीध यंत्रणा या जबाबदाऱ्या वेळोवेळी पार पाडत असतात. कायदा-सुव्यवस्था हाताळताना यंत्रणांना बऱ्याचवेळी ताकदीचा प्रयोग करावा लागतो.

 

internal-security-inmarathi
rstv.nic.in

जिवीत तसेच मालमत्तांची हानी रोखताना सुरक्षाकर्मींना काही धोके पत्करावे लागतात. तणावाच्या वातावरणांत परिस्थीती हाताळायची तंत्र, सुरक्षा यंत्रणेतील लोकांना शिकवली जात असतील, तरीही परिस्थिती नुसार responses- प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. कारण त्या क्षणी स्थिती सांभाळायची असते.

असं करताना दोन्हीं बाजुंकडून एकमेकांना धोका संभवतो. पोलीसी लाठीचार्ज वगैरे नेहमी ऐकायला मिळतात. त्याच सोबत सुरक्षा कर्मींवर झालेले हल्ले देखील ऐकायला/पहायला मिळतात.

देशात पोलीसांवर झालेल्या हल्यांचे आकडे आश्चर्यकारक आहेत. म्हणजे नेहमी अशांत राहणारा काश्मीर, नक्षलवाद ग्रस्त राज्य किंवा पुर्वांचलातील राज्य ( north-east ), यांच्या तुलनेत, पोलीसांवर झालेल्या हल्ल्यांचे प्रमाण केरळात अधिक !

म्हणजे कित्येक वर्षांपासून दहशतवाद आणी संघटीत धार्मीक गुन्हेगारीने ग्रस्त असलेल्या काश्मीर पेक्षा केरळातील पोलीसांवर अधिक हल्ले झालेत. जमावांनी सुरक्षा यंत्रणावरील केलेल्या हल्ल्यांसाठी जरी काश्मीर कु-प्रसिद्ध असेल तरी आश्चर्यकारकरीत्या केरळचे तपशिल चक्रावणारे आहेत.

 

thehindu.com

२०१६ मध्ये दहशतवाद्यांचा चॉकलेट बॉय-बुऱ्हाण वाणी काश्मिरात मारला गेल्या नंतरच्या घटनां व्यतीरीक्त, पोलीसांवरील हल्ल्यां विषयी Minister of State for Home Affairs हंसराज अहिर यांनी लोकसभेत जे आकडे सादर केले त्यात ही तथ्य समोर आलीत.

केरळातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगीतलं की, “काश्मीर प्रमाणे केरळात संघटीत दगडफेक वगैरे जरी होत नसली, तरी इथे वेळोवेळी होणाऱ्या विवीध संघटना/पक्ष यांची निदर्शनं-विरोध-मोर्चे यासर्वांत पोलिसांवर हल्ले वगैरे होतात. आम्ही जखमी साथीदारांची योग्य ती काळजी घेतो”. तुलनात्मकरीत्या काही पट जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तरेतील “बिमारु”राज्यांपेक्षाही सुरक्षा यंत्रणां वरील हल्ले केरळात अधिक आहेत.

मागचे काही वर्ष डाव्यांचा गड असलेल्या केराळतील या तथ्यांकडे राष्ट्रीय माध्यमांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलयं की काय या विषयी रास्त संशय वाटतो !

कारण, ideology मॅटर्स.

 

बाकी राजकीय वरदहस्त असलेल्या तथाकथीत तटस्थ पत्रकारीते कडुन आणी पत्रकारांकडून विशेष अपेक्षा नाहीत !

गल्लीबोळातल्या बातम्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्वरूप देणाऱ्या माध्यमांनी, TV डीबेट्स मध्ये घसा फाडून मुद्दे मंडणाऱ्यांनी, जस्टिस लोया सारख्या खास प्रकरणांत सुताहून स्वर्ग गाठणाऱ्या शोध प्रकारांनी, विचारवंतांनी या बद्दल मौन बाळगावं हे देखील काही गोष्टी स्पष्ट करतं.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?