' कंडोमचा शोध लागला नव्हता तेव्हा गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या गेल्यात या विचित्र पद्धती! – InMarathi

कंडोमचा शोध लागला नव्हता तेव्हा गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या गेल्यात या विचित्र पद्धती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या सगळीकडेच एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे राज्य सरकारने कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये रबरी लिंग सुद्धा समाविष्ट केल्याने एकच खळबळ माजली आहे. लोकसंख्या वाढ हा एक सर्वात मोठा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे.

भारत, हा लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘हम दो हमारे दो’ सारख्या घोषवाक्यांचा मारा करणं आणि जनतेला समंजस बनवणं असे पर्याय आपल्या देशात वापरावे लागतात.

लोकसंख्या नियंत्रणात ठेवणं फारच गरजेचं आहे असं म्हणता येईल. यासाठी गर्भधारणा होऊ नये हा उपाय करण्यावाचून पर्याय नसतो. हा उपाय कायमस्वरूपी स्वीकारण्यासाठी नसबंदीचा पर्याय निवडला जातो.

अर्थात ही नसबंदी स्वतःच्या मर्जीने झालेली असणं योग्य आहे. नसबंदीचा विषय आला, की अनेकदा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या सरकारने घडवून आणलेली नसबंदी नक्कीच आठवते.

 

indira gandhi inmarathi

 

भारतीय लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नसबंदी हा उत्तम पर्याय असल्याचं जणू काही तत्कालीन सरकारला वाटलं होतं. लोकांच्या मर्जीशिवाय नसबंदी करण्याचा आदेश अमलात आणला गेला होता.

अर्थात, अशाप्रकारे दबाव आणणं चुकीचं असलं, तरीही लोकसंख्या नियंत्रणात येणं गरजेचं आहेच. त्याचसाठी आज लोक अनेक तंत्रांचा वापर करताना दिसतात.

आधुनिक काळात गर्भधारणा होण्यापासून रोखण्याच्या अनेक टेक्निक आणि साधनं उपलब्ध आहेत. कंडोम सारख्या साधनांचा सर्रास वापर केला जातो. पण असा एक काळ होता, ज्यावेळी हे पर्याय उपलब्ध नव्हते.

 

condoms inmarathi

 

पण ज्या काळात ही सर्व साधनं उपलब्ध नव्हती, तेव्हा सुद्धा गर्भधारणा होऊ नये म्हणून काही पद्धती वापरल्या जात असत.

‘तेव्हा स्त्रिया गर्भवती होण्यापासून वाचण्यासाठी कुठले कुठले उपाय करत असतील?’ असं प्रश्न कधी पडला आहे का तुम्हाला? त्याकाळातील लोक गर्भधारणा रोखण्यासाठी खूप विचित्र अश्या पद्धती वापरत असत.

 

Contraception-inmarathi

 

लोखंडाचं पाणी :

 

iron-water-inmrathi

 

ग्रीसमध्ये स्त्रियांना ते पाणी प्यायला दिलं जायचं ज्यात लोहार आपली अवजारं थंड करत असे. ह्यामुळे शुक्राणू बऱ्याचशा प्रमाणात योनीतच नष्ट होऊन जातात.

एवढचं नाही तर चीनमध्ये स्त्रियांना लेड आणि मर्क्युरीचे मिश्रण प्यायला दिलं जात असे. हे मिश्रण एवढं नुकसान करणारं असायचं की, गर्भाशयच नाही तर किडनी आणि मेंदूला देखील इजा पोहोचत होती.

 

कोक :

 

COKE-INMARATHI

 

कोक प्यायल्याने शुक्राणू नष्ट होऊ शकतात का? १९५० ते १९६० दरम्यान हावर्ड मेडिकल स्कूलकडून बर्थ कंट्रोल लॅब मध्ये अनेक प्रकारचे शोध लावण्यात आले.

एन्डरसन, हिल आणि एम्पियर नावाच्या वैज्ञानिकांनी चार प्रकारच्या कोकना शुक्राणूसोबत मिक्स करून बघितले. तर ह्यात असे दिसून आले की, डायट कोकमुळे सर्व शुक्राणू एका मिनिटांतच नष्ट झाले.

तर इतर ४१ टक्के शुक्राणू हे इतर कोक मध्ये नष्ट झाले नाहीत. एन्डरसन ह्यांनी सांगितले की, कोकमधील कार्बोनिक अॅसिड ने शुक्राणूंना मारले.

 

लिंबू :

 

lemon juice-inmarathi01

 

गर्भधारणा होण्यापासून थांबण्यासाठी आधीच्या काळी लोक लिंबाचा वापर देखील करत असत. असे मानले जाते की, ह्यामध्ये असलेले सायट्रस अॅसिड हे स्पर्म ला नष्ट करू शकते. पण हे घातक असू शकते.

म्हणजेच रोजच्या वापरातील लिंबाचा वापर करून गर्भधारणेवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

अफू  :

 

afim-inmarathi

 

अफू हा पदार्थ साधारणपणे नशा करण्यासाठी वापरण्यात येतो. हा एक अंमली पदार्थ मानला जातो. मात्र याचा वापर गर्भधारणा टाळण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. इंडोनेशिया देशात हा असा वापर केला जात असे.

इंडोनेशियाच्या सुमात्रामध्ये स्त्रिया अफूच्या झाडाचा वापर संभोग करताना करायच्या जेणेकरून त्या गर्भवती होणार नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?