रोहित वेमुला ते उधम सिंघ : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तथाकथित पुरोगामी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

एखाद्याचा आजा-आजी-काका-मामा कुणी तरी ग्रेट होता, म्हणून त्यांच्या वारसांनीही ग्रेट असावं असं होत नाही, आग्रह देखील नसावा, हे माझं वैयक्तीक मत. आपल्याकडे अस्मितांना खरे-खोटे धुमारे फोडत राजकारणाची पोळी भाजून घ्यायच्या सध्याच्या काळात वंशजांना अनन्य साधारण महत्व ! एकदा का अशा ग्रेट व्यक्तिरेखा शोधल्या कि मग त्यांच्यावर कसा आणी किती अन्याय झाला, त्यांना कसं डावललं गेलं, त्यांची कशी अवहेलना झाली हे चित्र रंगवण सोेप होतं.

अस्मितांच्या बुरख्याखाली संघटनेतील खाली “डोकी” वाढवता येतात.

सध्याचा जमाना सोशल मिडीयाचा. पुर्वी पाचशे श्रोते जमवायचे म्हटले तरी ते एक मोठं टास्क असायचं. सोशल मिडीयात तुमचे विचार काही मिनीटांत, जवळपास फुकटात हजारो लोकांपर्यंत पोहोचतात. आपले विचार-मत मांडण्याच सोशल मिडीया हे एक प्रभावी माध्यम झालयं. फेसबुक-ट्वीटरवर कित्येक लोकं ऍक्टीव्ह आहेत. जगभरात सर्वाधीक फ़ॉलोवर्स असणाऱ्यांपैकी काहीजण भारतीय आहेत.

 

dilip-c-mandal-inmarathi
bhadas4media.com

प्रसिद्धी, सोयीची वातावरण निर्मीती, आरोप, स्पष्टीकरण, प्रोपोगंडा असं बरच काही सुरु आहे रोज सोशल मिडीयात.

फेसबुकवर काही हजार ते लाखांचे फ़ॉलोवर्स असलेल्या काही व्यक्ती आहेत, ज्यातील एक नाव दिलीप मंडल. हुच्चविद्या-विभुषीत आणी कित्येक राष्टीय वृत्तपत्रांची मुख्य जबाबदारी सांभाळलेलं पत्रकारीतेतलं मोठे नाव. दीड-दोन लाख फ़ॉलोवर्स असावेत त्यांचे. कित्येक पोस्ट्सला पाचशे-हजारच्यावर शेअर्स असतात त्यांच्या.

२०१४त केंद्रात सत्ता बदल झाला आणी उजव्या विचारांच सरकार सत्तेत आलं. विरोधी पक्ष-संघटनांना अपेक्षीत दुःख झालं. त्यांची हि जखम आजही भळ-भळते आहे. सत्तेतील लोकांमुळ कसं आणी काय वाईट होतंय हे सांगण्यासाठी कित्येकांनी स्वतःला वाहून घेतलयं. माझ्या मते त्यातही काही गैर नाही, बशर्ते त्यात खोटं-अतिरंजीत काही नसावं !

अस्मितांचे मुद्दे अधिकाधीक टोकेरी करत विशीष्ट मांडणी करण्यात दिलीप मंडल यांचा हातखंडा आहे.

काहीशे भारतीयांचे प्राण घेणारं जालीयनवाला बाग हत्याकांड भारतीय कधीच विसरणार नाहीत. सभेसाठी जमलेल्या निःशस्त्र अबाल-वृद्ध लोकांवर अमानुष गोळीबार करून कित्येकांचे जीव घेणाऱ्या जनरल डायरला इंग्लंडमध्ये जाऊन गोळी घालणाऱ्या क्रांतीकारी सरदार ऊधम सिंघांना विसरणं हे देखील भारतीयांना शक्य नाही.

 

Jallianwala-Bagh-Massacreinmarathi
vivacepanorama.com

३१ जुलै रोजी ऊधम सिंघांना फाशी दिली गेली….स्वातंत्र्यासाठीच्या होम-कुंडात आणखी एक समिधा पडली !

दरवर्षी राजधानी दिल्लीत व भारतभर या हुतम्याच्या हुतात्म्याच्या स्मृतींना उजाळा दिला जातो.

२०१६ च्या ३१ जुलै तारखेला दिलीप मंडल यांनी काही मेमें/फोटो शेअर केले फेसबुकबर. काही पोस्ट लिहील्या ज्याचे स्क्रीन-शॉट सोबत जोडलेले आहेत. सदर पोस्ट मध्ये हुतात्मा ऊधम सिंघ यांच्या जातीचा शोध घेतला गेलाय, आणी राजधानी दिल्लीत व ईतरत्र, गैर-उच्चवर्णीय असल्याने ऊधम सिंघांना उचीत सन्मान दिला गेला नाही, दिला जात नाही असाही जावई शोध लावलाय पोस्ट कर्त्याने.

 

mandal-udham-singh-inmarathi
facrbook.com

त्यातही उच्चवर्णीय लोकांना विनाकारण जास्त गौरवान्वीत केलं गेलं, केलं जातय अशी टिपण्णी देखील जोडलीय !

“सत्तेतील भाजपा, विरोधी पक्षातील काँग्रेस, संघ वगैरेंना सरदार ऊधम सिंघांचा विसर पडलाय. पण सरदार ऊधम सिंघांना अमर करायची जबाबदारी तुमची आहे.”

अशा आशयाच्या ३/४ पोस्ट टाकल्या होत्या दिलीप मंडलांनी. त्या पोस्ट वरील कमेंट्स वाचल्या की पोस्ट का आणी कशासाठी टाकल्या होत्या याचा अंदाज येतो. ऊधम सिंघांच्या दलित्वाचा शोध आणी त्याच्या आडून चालवलेला द्वेषाचा प्रोपोगंडा कळायला वेळ लागत नाही. दीड-दोन लाख फॉलोवर्स असलेल्या व्यक्तीला या गोष्टी कळत नसतील असं नाही…किंबहुना सोशल मिडीयाचा वापर हल्ली दिलीप मंडलांसारख्या व्यक्ती प्रोपोगंडा राबवण्यासाठी करताना आढळतात.

 

udham-sinh-inmarathi
facebook.com

त्यांना तसे करायचा अधिकार आहे…जय अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

राज्य सरकारने कर्जमाफी केली नाही म्हणून ऊधम सिंघांच्या नातवाने आत्महत्या केल्याची बातमी नुकतीच एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली. आधीच स्पष्ट केल्या प्रमाणे कुटुंबीय थोर होते म्हणून त्यांच्या वारसांना फायदे मिळावेत हे मला तरी वैयक्तीकरीत्या पटतं नाही. पण ज्यांनी ऊधम सिंघांच्या दलित्वाचा शोध लावला आणी फेसबुकच्या भिंती रंगवल्या, त्यांना ही बातमी दिसली नसावी ?

दीड-दोन लाख फॅन फॉलोवर असलेल्या व्यक्तीला एखादी पोस्ट ऊधम सिंघांच्या नातवाच्या कर्ज माफी प्रकरणा बद्दल टाकता का आली नसावी ?

 

indiatimes.com

सत्तेतील उजव्यांविरुद्ध उठता-बसता आरोप करण्यासाठी ही आत्महत्या देखील एक मुद्दा होता, मग का एखादी पोस्ट नाही आली सरांकडुन ?
या फॉलोवर्सच्या माध्यमांतून एखादा मदतीचा हात ऊधम सिंघांच्या नातवा पर्यंत पोहोचवणे शक्य नव्हतं ? आणी जर मदतीचा हात देणं शक्य होतं, तर का गेलं नसावं ?

दिलीप मंडल सरांप्रमाणे कित्येकांनी वेमुला, ऊधम सिंघ यांचा फक्त वापर केला गेला…होय, फक्त सोयीचा वापर !

त्यांच्या जिवीताशी, जगण्याच्या प्रश्नांशी, रोजच्या समस्यांशी दिलीप मंडल सारख्यांना काहीही सोयर-सुतक नसावं. त्यांच्यासाठी, मढ्याच्या टाळूवरचं लोणी महत्त्वाचं…

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “रोहित वेमुला ते उधम सिंघ : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तथाकथित पुरोगामी

  • June 8, 2018 at 3:00 pm
    Permalink

    ya post ch nav rohit vemula te Udham singh asa dilel aahe pan Rohit Vemula cha kuthech Ullekh nahi

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?