' बॉलीवूडमधील "बॅकग्राऊंड डान्सर्स" च्या कमाईचे आश्चर्यकारक आकडे

बॉलीवूडमधील “बॅकग्राऊंड डान्सर्स” च्या कमाईचे आश्चर्यकारक आकडे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

बॉलीवूडमधलं कुठलंही गाणं घ्या, त्यात हिरो हिरोईनच्या मागे काही आणखी लोक सुद्धा नाचताना दिसत असतात. त्यामुळे ते गाणं आणखी चांगलं दिसतं. बॉलीवूडमध्ये हे ‘बॅकग्राऊंड डान्सर्स’ खूप महत्वाची भूमिका बजावतात.

मागील अनेक वर्षांपासून हे बॅकग्राऊंड डान्सर्स आपल्या आवडत्या गाण्यांची शोभा वाढवत आले आहेत.

आधी निव्वळ हिरो आणि हिरोईन यांच्या आजूबाजूची जागा भरण्यासाठी वापरले जाणारे बॅकग्राऊंड डान्सर्स आता ह्या चित्रपट सृष्टीचा एक महत्वाचा भाग बनले आहेत.

 

Related image

 

बॅकग्राऊंड डान्सर्स ह्यांना इंडस्ट्रीत फिलर्स किंवा एक्स्ट्रा म्हटलं जातं.

गेल्या काही वर्षांत जशी चित्रपट सृष्टी बदलत आली आहे, तसेच ह्या बॅकग्राऊंड डान्सर्सकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील बदलत चालला आहे. आणि ह्या बॅकग्राऊंड डान्सर्सने देखील आता त्यांच्या कामाला महत्व द्यायला लागले आहेत, काम सिरीअसली घ्यायला लागले आहेत.

कारण ह्यापैकी अनेकांसाठी हेच त्यांचं पोट भरण्याचं साधन आहे, त्यांचं करिअर आहे.

हे ही वाचा –

===

 

Related image

 

बॉलीवूडचे हे बॅकग्राऊंड डान्सर्स ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, ह्रितिक रोशन, सलमान खान सारख्या बड्या कलाकारांच्या मागे स्टेजवर आणि चित्रपटांच्या गाण्यांत पण दिसून येतात. त्यामुळे त्यांचा मेकअप ते कपडे ह्या सर्वांवर विशेष लक्ष दिले जाते.

कुठल्याही गाण्याला यशस्वी आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी हे बॅकग्राऊंड डान्सर्स तेवढीच मेहनत घेतात जेवढे बाकी लोक घेत असतात. तेही तेवढ्याच तळमळीने नाचत असतात.

हे ही वाचा –

===

 

Image result for taal gif

 

शाहीद कपूर सारखा अभिनेता देखील एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनच ह्या इंडस्ट्रीत आला होता.

त्याची सुरवात देखील एका अभिनेत्रीच्या मागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनच झाली आणि आज तो स्वतः एवढा मोठा बॉलीवूड स्टार झाला आहे.

शाहीद कपूरने श्यामक दावर कडून डान्सची ट्रेनिंग घेतलं. ज्याचा त्याला त्याच्या करिअरमध्ये खूप फायदा झाला.

 

Related image

 

रंगीला चित्रपटातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर्सने उर्मिला मातोंडकरला जी साथ दिली आहे, त्याने ते गाणं आणखीनच यशस्वी ठरलं. ह्या एक्स्ट्राज मुळेच चित्रपटातील गाणी एवढी उत्कृष्ट बनतात.

चित्रपट सृष्टीत एवढं महत्व असलेले हे बॅकग्राऊंड डान्सर्स आज अभिनेता-अभिनेत्री इतकेच महत्त्वाचे आहेत. मग त्यांना तेवढंच चांगलं मानधन मिळत असेलं का?

 

 

Image result for bollywood songs gif

 

फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर टीव्हीवरील डान्स रियालिटी शोजमध्ये देखील ह्या बॅकग्राऊंड डान्सर्सचे काम असते.

हिरो-हिरोईनच्या मागे नाचणाऱ्या ह्या बॅकग्राऊंड डान्सर्सना किती मानधन मिळत असेलं?

बघितलं गेलं तर त्यांची कमाई ही कोरिओग्राफर आणि जो कलाकार तो चित्रपट करत आहे त्यांच्यावर अवलंबून असते.

जर चित्रपटाचे बजेट कोटींच्या घरात असेल तर मात्र बॅकग्राऊंड डान्सर्सना चांगले मानधन मिळते. अश्या चित्रपटासाठी त्यांना एका दिवसाचे ५० हजार ते १ लाखापर्यंत मानधन दिले जाते.

 

dance-indian-dance

 

प्रत्येक सिनेमानुसार हे मानधन बदलते, मात्र कलाकारांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळतोच.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “बॉलीवूडमधील “बॅकग्राऊंड डान्सर्स” च्या कमाईचे आश्चर्यकारक आकडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?