' भारतात रॉला जन्म देणा-या चलाख गुप्तहेरामुळे आज आपण सुरक्षित आहोत… – InMarathi

भारतात रॉला जन्म देणा-या चलाख गुप्तहेरामुळे आज आपण सुरक्षित आहोत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

‘राझी’…आलिया भट्टचा हा चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला. ज्यात तिने एका गुप्तहेराची भूमिका निभावली आहे. ह्या चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर हे गुप्तहेर गुप्तपणे पडद्या आड राहूनही आपल्या देशाची तेवढीच सेवा करत असतात.

आपल्या देशासाठी तेवढीच जोखीम घेत असतात जेवढी एखाद्या सीमेवरील जवान घेत असतो.

 

raazi-inmarathi

 

भारतातील रॉ(R&AW) ह्या एजन्सीमध्ये सेहमत खानसारख्या कित्येक गुप्तहेरांच्या अश्या धाडसी कहाण्या असतील. त्याहुनही रंजक कहाणी आहे ह्या एजन्सीच्या संस्थापकाची. भारताचा पहिला स्पायमास्टर आर. एन. काव ज्यांनी रॉ ला उभं केलं.

 

r n kav-inmarathi

 

गुप्तहेरीच्या कलेत पारंगत असलेले काव ह्यांचे आयुष्य त्यांच्या कामाप्रमाणेच खूप रहस्यमयी आणि रंजक आहे. त्यांनी भारतासाठी जगभरात हेरगिरीच एक मोठं नेटवर्क उभं केलं.

आर. एन. काव ह्यांचा जन्म १९१८ साली बनारस येथील एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. इलाहाबाद विश्वविद्यालय येथील इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर केल्यानंतर १९३९ साली ते भारतीय पोलीसात भर्ती झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळायच्या काही वर्षांआधी ब्रिटीश सरकारने त्यांना इंटेलिजेन्स ब्युरोचे डायरेक्टर बनवले.

 

r n kav-inmarathi01

 

१९५७ साली घाना स्वतंत्र झाला. तेथील राष्ट्रपतींनी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांना देशात इंटेलिजेन्स ब्युरो स्थापन करण्यासाठी मदत मागितली. देशाचे तत्कालीन पंतप्रधान नेहरूनी काव यांना घाना येथे पाठवले.

तिथे काही काम करून त्यांनी Foreign Service Research Bureau(FSRB) ची स्थापना केली.

१९६५ दरम्यान चीन आणि पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धानंतर देशात एका अश्या संस्थेची गरज भासू लागली होती जी मुख्यकरून शेजारच्या देशातील हालचाली आणि देशाच्या सीमेवर नजर ठेवू शकेल. याआधी पर्यंत भारत सरकारला पूर्णपणे इंटेलिजेन्स ब्युरो वर अवलंबून राहावे लागत होते.

 

r n kav-inmarathi02

 

१९६८ साली पंतप्रधान इंदिरा गांधींनी अशी एखादी संस्था बनविण्याचा निर्णय घेतला, ज्याला पूर्ण करण्याचं काम हे आर. एन. काव ह्यांना सोपविण्यात आले.

जगभरातील इंटेलिजेन्स सिस्टिमवर रिसर्च करून काव यांनी भारताच्या ह्या नव्या इंटेलिजेन्स संस्थेची ब्लूप्रिंट तयार केली. ह्या संस्थेचं नाव Research And Analysis Wing(R&AW) म्हणजेच रॉ असे ठेवण्यात आले.

संस्थेच्या नावाला मुद्दाम असे ठेवण्यात आले कारण ते ऐकल्यावर एखाद्या शोध संस्थेप्रमाणे वाटावे. काव यांनी  स्वतः इंटेलिजेन्स ब्युरोमधून २५० लोकांना निवडून ह्या संस्थेचा पाया रचला. त्यांच्या ह्या टिमला ‘कावबॉयज’ असे म्हटले जायचे. एका वर्षाच्या आतच रॉ अमेरिका, इंग्लंड, युरोप आणि दक्षिण–पूर्व आशियात पसरली.

 

r n kav-inmarathi04

 

१९७१ साली जेव्हा पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानवर भारी पडत होता. तेव्हा पश्चिमी पाकिस्तानातील लोक आपला जीव वाचविण्यासाठी भारतात शरण घेत होते. तर दुसरीकडे कावना अशी माहिती मिळाली की पूर्व पाकिस्तान हा पश्चिम पाकिस्तानवर आधिकारिक स्वरुपात सैन्य कारवाई करणार आहे.

मग आर. एन. काव यांनी लगेचच ऑपरेशनची सुरवात केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींशी बोलून पुढील कारवाई सुरु करण्यात आली.

 

r n kav-inmarathi05

 

पूर्वी पाकिस्तानातील सर्व जहाजांना भारतीय क्षेत्रातून जाण्यास थांबविण्यात आले. यासाठी कावनी रॉच्या एजंटद्वारे विमानाला हायजॅक करवले आणि हायजॅक करणाऱ्यांना काश्मिरी अलगाववादी असल्याचं सांगितलं गेलं, असं सांगितले जाते.

सर्व प्रवाश्यांना सुरक्षितपणे भारतात पोहोचवून विमानाला लाहौर एअरपोर्टवर ब्लास्ट करण्यात आले. ह्या युक्तीमुळे पूर्व पाकिस्तानच्या सेनेला भारतीय क्षेत्रातून जाण्यास मनाई करण्यासाठी एक कारण मिळालं, आणि त्यावर बंदी लावण्यात आली.

 

r n kav-inmarathi06
कावनी रहनूमाई येथे पश्चिमी पाकिस्तानमधील स्थानिकांना गोरील्ला लढाई साठी प्रशिक्षण दिले. ‘मुक्ती वाहिनी’ नावाच्या या गोरील्ला सेनेने आठ महिन्यातच पाकिस्तानच्या सेनेला चांगलाच धडा शिकवला.

१९७१ साली बांगलादेशचे तत्कालीन पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान ह्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचला जात होता. काव नी बांग्लादेशच्या पंतप्रधानांना भेटून याबाबत सूचना देखील दिली होती.

पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. काही आठवड्यानंतर ज्या मिलिटरी ऑफिसर बाबत काव नी बांगलादेशच्या पंतप्रधानांना सूचित केले होते तोच ऑफिसर टँक घेऊन पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला आणि पंतप्रधानांना कुटुंबासहित संपवलं.

 

r n kav-inmarathi07

 

आर.एन. काव पंतप्रधान इंदिरा गांधीच्या जवळचे होते. मोरारजी देसाईंचे सरकार आल्यावर त्यांनी आपल्या पदावरून निवृत्ती घेतली. १९८० साली जेव्हा दुसऱ्यांदा इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या तेव्हा त्यांनी काव ना सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केले.

आर. एन. राव ह्यांचे जीवन खूपच रंजक असे असल्यामुळे त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांना स्वतःच्या जीवनावर एखादे पुस्तक लिहिण्याचा आग्रह धरला पण काव ना त्यांचे जीवन नेहेमी खाजगीच ठेवायचे होते.

तसेच ते सार्वजनिक ठिकाणांवर देखील खूप कमी दिसत. २००२ साली वयाच्या ८४ वर्षी भारताच्या या पहिल्या सुपरस्पाय ने जगाचा निरोप घेतला.

छायाचित्र आणि माहितीचा स्त्रोत : thebetterindia.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?