'हे आहेत जगभरात लाखो लोकांचा बळी घेणारे काही घातक व्हायरस !

हे आहेत जगभरात लाखो लोकांचा बळी घेणारे काही घातक व्हायरस !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

वायरस… जगातील सर्वात भयानक आणि घातक आजार हे कुठल्या ना कुठल्या वायरसमुळे होतात. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वायरसमुळे अनेकांना आपले जीवन गमवावे लागले.

ह्यापैकी काही हे तेवढे भयानक नसले तरी तेही आपल्याला नुकसानकारकच आहेत.

सध्या आपल्या देशातही अश्याच एका वायरसने काहूर माजवले आहे. तो म्हणजे निपाह वायरस. हा आणि ह्यासारखे आणखी कितीतरी वायरस आहेत, जे मानवासाठी अत्यंत घातक असे आहेत.

जीका वायरस :

 

trouble-zika-virus-inmarathi
mybiosource.com

२०१७ साली हा जीका वायरस भारताकडे फिरकला होता. ह्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. गुजरातच्या अहमदाबादमध्ये डासांमुळे जीका वायरस पसरला होता. महत्वाचे म्हणजे ह्याची कुठलीही लस उपलब्ध नाही.

इबोला वायरस :

 

ebola-virus-inmarathi
hearstapps.com

२०१४ साली हा इबोला वायरस भारतात आला. ह्या आजारात शरीरातील नसांतून रक्तस्त्राव होतो आणि अंतर्गत रक्तस्त्रावामुळे माणसाच्या जिवंत राहण्याची शक्यता कमी होऊन जाते. सर्वात आधी ह्या वायरसचे निदान हे आफ्रिकेत करण्यात आले होते.

मारुबर्ग वायरस :

 

Marburg-virus-inmarathi
cosmos-magazine.imgix.net

मारुबर्ग वायरस इबोला वायरस प्रमाणेच आहे. ह्यात देखील इबोला प्रमाणे स्नायू दुखायला लागतात आणि त्वचेतून रक्तस्त्राव व्हायला लागतो. हा वायरस एवढा भयंकर होता की, ह्याची लागण झालेल्यांपैकी ९० टक्के लोक वाचू शकले नाही.

स्यारनुर फारेस्ट वायरस :

 

Forest_Virus-inmarathi
gyanpanti.com

ह्या वायरसचा शोध पहिल्यांदा भारतात लागला. वैज्ञानिकांनी हे तर माहित केले की, हा वायरस एका विशिष्ट पक्षी/प्राण्यामुळे पसरतो. पण तो नेमक्या कुठल्या पक्षी/प्राण्यामुळे पसरतो हे शोधण्यात वैज्ञानिकांना अजूनही यश आलेले नाही.

हंटा वायरस :

 

sn-hepatitis-inmarathi
sciencemag.org

ह्या वायरसचा शोध १९५० साली लागला. अमेरिकी सैनिकांत हा पहिल्यांदा आढळून आला. ह्या वायरसची लागण झाल्यावर त्या व्यक्तीला फुफ्फुस आणि यकृतासंबंधी आजार होतात.

डेंगू :

 

dengue-inmarathi
egypttoday.com

हा वायरस आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. आजवर कित्येक निष्पाप जीवांचा बळी ह्या वायरसने घेतला. डास चावल्याने होणारा हा आजार अतिशय घातक आहे, ह्यात पिडीत व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेट्स जगद गतीने कमी होतात.

ह्यात योग्य तो उपचार न मिळाल्यास रोग्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.

निपाह वायरस :

 

nipah-virus-inmarathi
sth.india.com

सध्या आपल्या देशात ह्या वायरसचे आगमन झाले आहे. केरळमध्ये आढळलेला हा निपाह वायरस अनेकांचे बळी घेऊन चुकला आहे. १९९८ साली मलेशियात पहिल्यांदा ह्या वायरसची ओळख झाली होती.

तेथील एका ठिकाणच्या डूक्करांमुळे हा वायरस पसरला होता ज्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. डूक्करांव्यतिरिक्त हा वायरस वटवाघळांमुळे देखील पसरतो. ह्यात व्यक्तीला ताप आणि डोकेदुखी चा त्रास होतो.

आतापर्यंत ह्या आजारावर कुठलाही उपचार मिळालेला नाही.

क्रीमियन कांगो वायरस :

 

b6-virus-inmarathi
stanford.edu

हा वायरस ढेकणांच्या मार्फत पसरतो. ह्यात व्यक्तीच्या तोंडातून आणि त्वचेतून रक्तस्त्राव होऊ लागतो.

बर्ड फ्लू वायरस :

 

flu-virus-inmarathi.jpg
rekordeast.co.za

हा वायरस चिकन म्हणजेच कोंबडीमुळे पसरतो. हा देखील एक घातक वायरस असून आशियात लोक चिकन जास्त खातात त्यामुळे हा वायरस ह्या भागात जास्त सक्रीय असतो.

एचआईवी वायरस :

 

HIV-AIDS-Inmarathi01
onhealth.com

असुरक्षित शरीर संबंधातून पसरणारा हा वायरस अतिशय घातक आणि जीवघेणा आहे. तसेच ह्यावर अजूनही कुठला उपचार शोधण्यात आलेला नाही. मानवजातीसाठी हा सर्वात घातक वायरस ठरू शकतो.

त्यासाठी आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. सुरक्षित यौन संबध आणि हवी ती काळजी घेत आपण ह्या वायरस पासून वाचू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?