' टॅक्सी चालवणारा कोलकात्याचा राजा तुम्हालाही नवी प्रेरणा देईल – InMarathi

टॅक्सी चालवणारा कोलकात्याचा राजा तुम्हालाही नवी प्रेरणा देईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

समाजात जर बदल घडवून आणायचा असेलं तर त्याची सुरवात ही स्वतःपासून करायची असते. हे जेवढे खरे आहे तेवढेच गरजेचे देखील आहे. आपलं प्रत्येक पाऊल हे समाजासाठी काहीतरी चांगल करण्यासाठी, काहीतरी समाजाच्या हितासाठी असायला हवं. तेव्हाच आपण एका चांगल्या समाजाची कल्पना करू शकतो.

कोलकाता येथे देखील एक असे टॅक्सी ड्रायव्हर आहेत, ज्यांनी त्यांच्या समाजाकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे त्यांनी लोकांना त्यातून एक चांगला संदेश दिला.

 

dhananjay-taxi-inmarathi02
firstpost.com

 

धनंजय चक्रवर्ती हे एक टॅक्सी ड्रायव्हर आहेत. पण त्याचं ध्येय हे लोकांसाठी समाजासाठी काहीतरी चांगल करण्याचं आहे. काही वर्षांपूर्वी पासून ते चर्चेत आहेत. त्यांनी वाढत्या प्रदुषणकडे  बघता आपल्या टॅक्सीवर गवत उगवले होते. त्यांच्या ह्या कामाची खूप प्रशंसा करण्यात आली.

 

dhananjay-taxi-inmarathi
newindianexpress.com

 

धनंजय हे ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार आपल्या टॅक्सीला आकर्षक आणि स्वच्छ ठेवतात. त्यांनी त्यांच्या नव्या टॅक्सीला कोलकाताचा इतिहास, परंपरा, कल्चर आणि तेथील सुंदर कलाकृतींनी सजवलं आहे.

त्यामुळे ते कोलकातामध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या ह्या उल्लेखनीय कामगिरी नंतर लोक त्यांना सोशल मिडीयावर ‘Bapi Green Taxi’ ह्या नावाने ओळखू लागले. अल्पावधीतच त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.

 

dhananjay-taxi-inmarathi01
firstpost.com

 

सध्याच्या काळात मुलांमध्ये स्मार्टफोनबद्दल वाढती क्रेझ बघता धनंजय ने आणखी एक शक्कल लढविली आहे. त्यांनी त्यांच्या टॅक्सीमध्ये बसणाऱ्या लहान मुलांसाठी बांग्ला भाषेतील कॉमिक्स ठेवणे सुरु केले.

जेणेकरून लहान मुलांना स्मार्टफोन्सच्या सवयीपासून वाचवले जाऊ शकेल. मुलांना वाचनाची सवय सुद्धा लागेल. अर्थात त्यांच्या टॅक्सीत लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी देखील कॉमिक्स आणि मॅगझिन्स आहेत.

त्यासाठी त्यांनी त्यांच्या कारच्या मागच्या सीटवर एक बुक रॅक बनविली आहे, जेणेकरून ग्राहक आपल्या आवडीनुसार जे हवं ते वाचू शकेल.

धनंजय ह्यांनी ह्याबद्दल सांगितलं आहे की, ‘माझ्या डोक्यात कॉमिक्सची आयडिया तेव्हा आली जेव्हा मी टॅक्सीमध्ये बसलेल्या एका लहान मुलाला विचारले की, काय तुला कॉमिक कॅरेक्टर ‘Batul the great’, ‘Handa Bhonda’ आणि ‘Nonte Fonte’ माहित आहेत, तर त्याच्या फोनवर स्क्रोल करत करत तो म्हणाला नाही.’

त्याचं उत्तर एकूण मला खूप वाईट वाटलं, कारण ९० च्या दशकात जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही ह्या सर्व कॉमिक्स वाचायचो. मग त्यादिवसापासून मी माझ्या कारच्या डॅशबोर्डमध्ये कॉमिक्स आणि इतर पुस्तके ठेवण्याची जागा बनवली.

मला फरक नाही पडत की प्रवासी, ५ किलोमीटर जाणार आहेत की, १५ किलोमीटर. मला फक्त एवढचं वाटतं की त्यांनी ह्यादरम्यान कॉमिक्स आणि पुस्तके वाचावी. ज्यामुळे त्यांची स्मार्टफोनची सवय कमी होईल. आणि ज्या ग्राहकांना ती कॉमिक आवडते ती मी त्यांना अर्ध्या भावात विकतही देतो.

 

 

एवढचं नाही तर त्यांचे ग्राहकही त्यांच्या ह्या पुढाकाराचे कौतुक करतात आणि त्यांना पसंतही करतात.

नंदिनी दासगुप्ता ह्यांनी सांगितले की, धनंजय ह्यांच्या टॅक्सीमध्ये फिरणे एक चांगला अनुभव होता. ह्यांच्यामुळे माझा मुलगा पहिल्यांदा बांग्ला भाषेतील कॉमिक्स वाचू लागला.

तर राजीव वर्मन ह्या ग्राहकाने सांगितले की, ‘मी माझ्या आयुष्यात एवढा क्रिएटिव्ह टॅक्सी ड्रायव्हर आधी कधीही बघितला नव्हता. ह्या टॅक्सीमध्ये फिरण्याचा एक वेगळाच अनुभव आहे.’

धनंजय ह्यांचासारखा विचार आपणही करायला हवा. आपणही आपल्या दैनंदिन जीवनात समाजासाठी काही करण्याचा विचार करायला हवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?