' एकरभर जमिनीतून वर्षाला तब्बल तीन लाख कमवतोय हा तरुण शेतकरी! – InMarathi

एकरभर जमिनीतून वर्षाला तब्बल तीन लाख कमवतोय हा तरुण शेतकरी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

आज आपल्याकडे कृषीसंशोधनामुळे शेतीच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती सहज उपलब्ध होताना दिसते. अनेक योजना, विविध बी-बियाणांवर संशोधन करून त्यापासून मिळवलेल्या नवीन जाती, कीटकनाशके यांसंदर्भात सातत्याने नवीन संशोधन होत आहे.

बदलत्या हवामानानुसार शेती क्षेत्रातही वेगाने बदल होत आहेत. त्या सर्व गोष्टींना केंद्रवर्ती ठेऊन संशोधन झालेले आपणाला दिसून येते. यामुळे आज आपल्याकडे आधुनिक शेतीचे प्रमाण मोठया प्रमाणावर दिसून येते.

आज कृषीसंशोधनामुळे मिश्र शेतीचा विस्तारही वाढताना दिसून येतो आहे. नवी तरुण पिढीही आज कृषी संशोधानातून एकूण आपली शेती व्यवस्था व शेतकरी यांच्या जीवनमानाचा, राहणीमानाचा दर्जा उंचवावा या दृष्टीने प्रयत्नशील असलेली दिसून येते.

माती परीक्षण, हवामानाचा अंदाज, पाण्याची उपलब्धता व नियोजन याचाही विचार होताना आपल्याला दिसतो. कमी काळात, कमी वेळात, शरीराला पोषक अन्नद्रव्ये असणारी पिके आज घेतली जातात.

बाजारपेठेतील अस्थिरता लक्षात घेऊन बाजारपेठेत चांगला भाव मिळणारी पिके घेतली जातात. कोरडया व ओल्या दुष्काळाच्या अनुषंगाने विविध योजना राबवल्या जातात. सेंद्रिय शेती केली जाते.

 

irigation-inmarathi

हे ही वाचा – तिने सॉफ्टवेअर क्षेत्रातली नोकरी सोडून शेती आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु केलीय..

स्थानिक वातावरणात तग धरणाऱ्या पिकांची पेरणी करून जास्त उत्पादकता असणारी, अधिक उत्त्पन्न मिळून देणारी पिके घेतली जातात. बी बियाणांची उपलब्धता, जमीन व पिकांचे योग्य संगोपन या बाबींचाही विचार आता नव्याने संशोधनात केला जातो. याच तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणजे मनजीत.

हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्याच्या मानव रचना विश्वविद्यालयातून बी.टेक (सिविल इंजीनियरिंग) केलेल्या मनजीत याने शेतीची वाट निवडली.

त्यांनी “आजकालच्या तरुणांना शेती करण्यात कमीपणा वाटतो” हा समज चुकीचा ठरवत आजकालची तरुण पिढी आधुनिक प्रकारे शेती करून अधिक नफा कमवू शकते हे सिद्ध केले आहे.

मनजीतने इंजीनियरिंगच्या क्षेत्रात काम करून आपले भविष्य घडवायचा विचार न करता मल्टीपल ऑरगॅनिक क्रॉपिंग पद्धतीने शेती सुरू केली.

 

haryana_farmer_inmarathi

 

मनजीत यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. त्यांनी चौधरी चरण सिंह हरियाणा कृषि विश्वविद्यालयामधून एमबीए (एग्रीकल्चर) केले. मात्र त्यातल्या कंपनीमध्ये काम करण्याचे टाळलं. त्यांना शेतकऱ्यांना घातक आणि विषारी कीटकनाशके शेतकऱ्यांना विकणे हे योग्य वाटलं नाही.

मनजीतना एमबीएच्या दरम्यान विविध पद्धतीने पीके घेण्याच्या पद्धती शिकवण्यात आल्या होत्या.

त्यामुळे त्यांनी शिक्षण घेत असतानाच असं ठरवलं होतं की मी शिकत असलेल्या शेतकीच्या पद्धतींचे प्रयोग मी माझ्या शेतात सर्वप्रथम करेन आणि त्यातले यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात करावेत म्हणून त्यांना प्रेरित करीन.

या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन स्वतःची ऑरगॅनिक शेती चालू केली. मनजीत सांगतात,

“बेड सिस्टिममध्ये उसाची लागवड केली जाते तेव्हा उसाबरोबरच इतर त्याला पूरक पिके लावून चांगले उत्पादन केले जाऊन शकते.”

स्वतःच्या एक एकर जमिनीच्या पायलट प्रोजेक्टमध्ये बेड सिस्टम पद्धतीने त्यांनी उसाच्या जोडीने इतर सात पिकांचे उत्पादन घेतले. यात त्यांनी अमेरिकी केशर, मोहरी, लसूण, धने, मेथी, चणे आणि गव्हाचे पीक घेतले. बेड सिस्टममध्ये उसाच्या पिकाला पाणी देतानाच होणाऱ्या ओलाव्यातून इतर पिकांची पाण्याची गरज भागते.

सप्टेंबर ते मार्चमध्ये ऊसाचे पीक तयार होते. तेव्हाच त्याच्या जोडीने लावलेली इतर पिकेसुद्धा तयार होतात.

 

kesar-inmarathi

हे ही वाचा – अमेरिकेतील नोकरी सोडून ‘हा’ तरुण सेंद्रिय शेतीतून कमावतोय लाखो रुपये!

या आठ पिकांपैकी अमेरिकी केशर सर्वाधिक यशस्वी ठरले. एक एकर जमिनीतून अंदाजे अडीच ते तीन किलो अमेरिकन केशराचे उत्पादन मनजीतने घेतले.

हे अंदाजे ५०-७० हजार रुपये प्रति किलो किमतीने दिल्लीच्या बाजारात विकले जाते. त्यामुळे मनजीतचं असं म्हणणं आहे की वर्षभर अशा पद्धतीने शेती केली तर एक एकर जमिनीतून अंदाजे तीन लाख रुपयांची कमाई होऊ शकते.

त्याचप्रमाणे त्याने पिकांवर पडणाऱ्या सर्व रोगांचे निदानसुद्धा रासायनिक औषधे न वापरता जैविक पदार्थ वापरून उदाहरणार्थ शेणखत तत्सम वापरून केले.

त्याशिवाय शेतात आत्ता ऊस ही पिकून तयार आहे ज्यातून होणारा फायदा हा एकूण नफ्यात भरच घालेल.

मनजीतचं असं म्हणणं आहे की, येणाऱ्या काळात याच एक एकर जमिनीतून तो कडधान्यं सुद्धा घेईल ज्याने त्याच्या कमाईमध्ये भरच पडेल. याव्यतिरिक्त या पिकांच्या कापणीनंतर शेतकरी हळदीचे पीकसुद्धा ऊसाच्या पिकासोबत घेऊन आपले उत्पन्न वाढवू शकतात.

आता त्यांच्या शेतात यशस्वी झालेले हे प्रयोग इतरांना शिकवावेत असा त्यांचा मानस आहे. जागतिकीकरणाच्या बदलत्या काळात आपल्याला शेती व्यवसायात उंच भरारी घ्यायची असेल तर कृषी संशोधनात सातत्याने होणारे बदल आपल्याला अंगीकारणे जरुरीचे आहे आणि मनजीत सारखे तरुण या बदलाची मुहूर्तमेढ रोवत आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?