' रमजान आणि अधिक मास : उपवासाचा सोस आणि डायबेटीस ते कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण?

रमजान आणि अधिक मास : उपवासाचा सोस आणि डायबेटीस ते कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नुकताच हिंदूंचा अधिक मास आणि मुस्लिमांचा रमजान महिना संपला आहे. याकाळात रोजा उपवास, व्रत वैकल्य ह्या सर्वांचं पालन केलं जातं. यामुळे भाविक लोक पूर्ण दिवसभर उपवासाचे पालन करतात.

या दिवसांत दिवसभर अन्नाचा घास व पाण्याचा घोट सुद्धा घेतला जात नाही. अनेक लोकांना वजन कमी करायचे असते, त्यामुळे ते लोक वेळोवेळी उपवास करत असतात.

पण तुम्हाला कल्पना नसेल – संशोधनांती हे सिद्ध झालं आहे की अति उपवास केल्याने डायबेटीसचा धोका उद्भवतो आहे. युरोपियन सोसायटी ऑफ एन्डोक्रिनोलॉजिच्या संशोधकांनी हे मत मांडलं आहे.

त्यांच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे की उपवास व त्यासमयी सेवन करण्यात येणाऱ्या हलक्या अन्नाने शरीरातील इन्सुलिनचं नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो.

यामुळे डायबेटीसचा धोका उद्भवणे शक्य आहे. त्यामुळे अश्याप्रकारचे कुठलेही उपवास करण्या अगोदर काळजी घेतली पाहिजे असं संशोधकांचं म्हणणं आहे.

 

Ramdan-fasting-inmarathi

 

संशोधकांच्या मतानुसार हा असा पहिला अभ्यास आहे, ज्यामध्ये वजन कमी करणे आणि उपवास करणे यामुळे एका सुदृढ वयस्कर माणसाच्या स्वादुपिंडावर आणि इन्सुलिनच्या यंत्रणेवर होणाऱ्या परिणामांची व त्यामुळे होणाऱ्या डायबेटीस आणि इतर आजारांची माहिती घेण्यात आली आहे .

मागील काही वर्षांपासुन उपवास, डाएट करणे याला लोकप्रियता प्राप्त होत आहे. कित्येक लोक आठवड्यातून दोन दिवस अन्न पाणी ग्रहण न करता राहतात. ह्याने वजन कमी होऊन आरोग्यात सुधारणा होईल असा अनेकांचा ग्रह असतो.

पण संशोधक मात्र वेगळीच कहाणी सांगत आहेत. यामुळे डॉक्टर्स व संशोधकांमध्ये त्यांचा प्रभावीपणाबद्दल आणि धोकादायक परिणामाबद्दल मतभेद आहेत.

मागील काही वर्षांत झालेल्या संशोधना अंती हे सिद्ध झालं आहे की उपवासातुन फ्री रॅडीकल्स – जैविक कणांची आणि धोकादायक रसायनांची निर्मिती होते.

हे कण शारीरिक व्यवस्थेशी निगडित असणाऱ्या पेशींना नुकसान पोहचवत असतात. यामुळे कॅन्सर आणि शरीर लवकर थकून अकाली वार्धक्य येण्याचा धोका निर्माण होत आहे.

 

fasting-inmarathi

 

ह्या प्रयोगात संशोधकांनी ३ महिने पूर्ण वाढ झालेल्या उंदरांवर प्रयोग करून, उपवासाचे शरीरावर व वजनावर होणारे परिणाम, फ्री राडीकल्सची निर्मिती आणि इन्सुलिनचे कार्यक्षमता याबाबत संशोधन केलं.

जरी उंदरांचं खाणं पिणं कमी झालं असलं तरी त्यांचा शरीरातील fats मध्ये वाढ झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं.

याबरोबरच उपवासामुळे उंदराच्या स्वादुपिंडावर व इन्सुलिनच्या व्यवस्थेवर गंभीर परिणाम नोंदवण्यात आले असून, फ्री रॅडीकल्स व इन्सुलिनचा प्रतिकार करणाऱ्या घटकांची वाढ देखील नोंदवण्यात आली आहे.

संशोधनानंतर काढण्यात आलेल्या निष्कर्षाप्रमाणे जे लोक आधीपासून जैविक आजारांपासून पीडित आहेत त्यांच्यावर उपवासाचा गंभीर परिणाम नोंदवण्यात आला आहे. विषयाचं महत्व लक्षात घेऊन अजून संशोधन करणं चालूच ठेवलं गेलं आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार वजनदार लोक व स्थूल लोक (जे वजन कमी करण्यासाठी उपवास करतात) त्यांचात इन्सुलिन प्रतिकार करणारी यंत्रणा आधीच कार्यान्वित असते.

उपवासामुळे ती अजून जलद गतीने होते. या मुळे मोठयाप्रमाणावर वजन कमी होते व शारीरिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होतो आणि टाईप 2 डायबेटीसचा धोका उदभवतो.

त्यामुळे उपवास करताना शरीराची काळजी नक्की घ्यावी असं संशोधकांचं मत आहे. शक्यतो जास्त प्रमाणात उपवास करणं टाळलं पाहिजे असा सल्ला संशोधकांकडून देण्यात आला आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “रमजान आणि अधिक मास : उपवासाचा सोस आणि डायबेटीस ते कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण?

  • January 9, 2019 at 2:07 pm
    Permalink

    pitta

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?