' मॅच हरूनही धोनीने असा रेकॉर्ड बनवलाय, जो आजवर कित्येक दिग्गजांना हूल देत होता! – InMarathi

मॅच हरूनही धोनीने असा रेकॉर्ड बनवलाय, जो आजवर कित्येक दिग्गजांना हूल देत होता!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आयपीएलचा ५२ वा सामना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली डेअरडेविल्समध्ये खेळला गेला. या मॅच मध्ये दिल्लीने चेन्नईवर ३४ धावा राखून मात केली.

जरी या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई ची टीम पराभूत झाली असली तरी या सामन्यात महेंद्रसिंग धोनी ने एक नवीन विक्रम रचला आहे, त्याने एक असा कारनामा करून दाखवला आहे जो आजवर कुठलाच विकेट कीपर करू शकला नाही.

या सामन्यात धोनी फलंदाजीत जरी विशेष कमाल दाखवू शकला नाही, तो २३ चेंडूत केवळ १७ रन्स बनवून बाद झाला. परंतु या लहानश्या खेळातसुद्धा त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करून घेतला आहे. या सामन्यात १० रन्सचा टप्पा ओलांडल्याबरोबर धोनीने टी ट्वेंटी करिअर मध्ये ६००० रन्सचा टप्पा पार केला आहे.

 

ms-dhoni-inmarathi
indiatoday.in

धोनीने हा रेकॉर्ड १३ व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बनवला आहे. अमित मिश्राच्या चेंडूवर एक सिंगल धाव काढत त्याने हा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. याबरोबरच महेंद्रसिंग धोनी टी ट्वेंटी क्रिकेट मधला ६००० रन्सचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.

महेंद्रसिंग धोनीचा आधी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ६००० चा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहली, रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि सुरेश रैना यांच्या नावावर आहे. तसं असलं तरी यापैकी कोणीही यष्टीरक्षक नसल्यामुळे हा रेकॉर्ड धोनीच्या नावावर झाला आहे.

या सामन्यात धोनीने फलंदाजीत निराशा केली असून २३ चेंडूत केवळ १७ रन्स बनवले आहेत. मागील इतर सामन्याप्रमाणे त्याचे विस्फोटक रूप या सामन्यात बघायला मिळाले नाही. १८ व्या ओव्हर मध्ये ट्रेंट बोल्टच्या बॉलवर धोनी कैच आउट झाला.

 

dhoni-ms-inmarathi
deccanchronicle.com

चेन्नई दिल्लीने दिलेल्या १६२ रन्सच माफक आव्हान पेलू शकली नसून, चेन्नईच्या फालंदाजानी दिल्लीच्या गोलंदाजापुढे सपशेल नांगी टाकली असून केवळ १२८ धावात सर्व संघ गारद झाला. भलेही या सामन्यात चेन्नई हरली असो तरी यामुळे तिच्या पॉईंट टेबल मधील स्थानावर काही परिणाम होणार नाही.

परंतु या सर्वात महेंद्रसिंग धोनीने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला व स्वतः एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फालंदाज बनला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?