'भारतीयांनी रोजच्या जीवनात आत्मसात केलेल्या या ७ गोष्टी चक्क पाश्चात्त्य लोकांच्या कॉपी आहेत!

भारतीयांनी रोजच्या जीवनात आत्मसात केलेल्या या ७ गोष्टी चक्क पाश्चात्त्य लोकांच्या कॉपी आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपला भारतीय समाज हा आज पाश्चिमात्य सभ्येतेच्या एवढा आहारी गेला आहे की आता त्यातून बाहेर येणं हे एवढं सोप्पं नाही. ते मग कपडे असो, वागणूक असो, खाणेपिणे असो किंवा संस्कृती असो. यात चुक पण आपलीच आहे कारण आपणच त्या कळत नकळत स्वीकारत आलो आहोत. स्विकारण्यापेक्षा आपण त्याची नक्कल करत आलो आहोत.

१. जीन्स

delhi-university-jeans-inmarathi

जीन्स हा विदेशी पोशाख आहे. आजवर ह्या जीन्सवर अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लोवेस्ट जीन्स. तसेच जीन्सवर इतरही एक प्रयोग करून ते फॅशनच्या नावाखाली विकले जातात. पण हे देखील विदेशातून आले आहे.

 

२. सूट घालणे :

 

Man-in-suit-inmarathi

 

भारतीय पोशाख म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वेगेवगळ्या समाजाचा वेगवेगळा पोशाख आठवतो. जो कधी काळी वापरला जायचा आणि आज एखाद्या विशीष्ट दिवशीच वापरला जातो. कारण आता त्या भारतीय पोशाखांची जागा ही पूर्णपणे विदेशी कपड्यांनी घेतली आहे. बदलत्या वेळेसोबतच कपडे घालण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या.

आपण आपल्या प्राचीन आणि परंपरागत पोशाखांना सोडून अगदी सहजपणे विदेशी कपड्यांना स्वीकारले आहे. ह्याचेच एक मुख्य उदाहरण म्हणजे सूट आणि टाय. जे जास्तकरून औपचारिक प्रसंगी घातले जातात.

पश्चिमी देश हे आपल्या देशाच्या तुलनेत जास्त थंड आहेत. त्यामुळे सूट आणि टाय हा पोशाख त्यांना ह्या थंडीपासून वाचविण्याचे काम करत.

पण देशाची भौगोलिक परिस्थिती बघता आपल्या देशात सूट आणि टाय घालायची गरज नाही कारण आपला देश त्या देशांच्या तुलनेत उष्ण आहे.

३. काचेच्या इमारती :

 

glass-buildings-inmarathi

 

आज भारतातील सर्व मेट्रो शहरांत मोठमोठ्या काचेच्या इमारती बघायला मिळतात. ज्यांच्याकडे बघून आपल्याला खूप अभिमान वाटतो की आपला देश विकासाच्या, आधुनिकीकरणाच्या बाबतील कुठल्याही देशापेक्षा कमी नाही.

पण काय खरंच आपल्या देशात ह्या काचेच्या इमारतींची गरज आहे, की आपण निव्वळ त्यांची नक्कल करत आहोत.

कारण विदेशात काचेच्या इमारती असणे ह्यामागे एक कारण आहे, त्यांना काचेच्या इमारतींची गरज आहे, कारण ते देश तिथलं वातावरण हे नेहेमी थंड असतं. त्यामुळे जेव्हा सूर्याची किरणे त्या काचांवर पडतात त्यामुळे उब निर्माण होते. म्हणून त्यांना ह्या काचेच्या इमारतींची गरज आहे.

४. कॉनव्होकेशन सेरेमनी :

 

convocation-inmarathi

 

पदवी शिक्षण झाल्यावर कॉनव्होकेशन सेरेमनी दरम्यान एक वेगळ्याच प्रकारचा कोट आणि त्यावर टोपी घालतात. पण काय तुम्हाला माहित आहे की ही देखील पश्चिमी देशांची परंपरा आहे. आपली नाही, आपण तर निव्वळ त्यांची कॉपी करत आहोत.

५. भारतीय चलन :

 

new-notes-facts-inmarathi

 

भारतीय चलनाला रुपया असं म्हटलं जातं. पण आपण इथेही विदेशी लोकांची नक्कल करत रुपयाला ‘बक’ असे नाव दिले. जेव्हा की डॉलर करिता च ह्या शब्दाचा वापर अमेरिकेत केला जातो.


६. : कागदपत्रांना अटेस्ट करणे :

 

 

attest-documents-inmarathi

 

हे तर सर्वांनीच केलं असेल. कारण कुठलाही महत्वाचा कागद असो त्याला अटेस्ट करणे हे खूप गरजेचे असते तेव्हाच तो मान्य केला जातो. पण तुम्हाला माहित आहे ह्याची सुरुवात कुठून झाली.

तर ब्रिटीश राज्यात प्रत्येक महत्वाच्या किंवा औपचारिक कागदपत्रावर गॅजेटेड ऑफिसरची स्वाक्षरी ह्यासाठी करविली जात होती कारण इंग्रजांना भारतीयांवर विश्वास नव्हता.

पण आज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर देखील आपण ते डोळेझाकपणे पाळत आहोत. (सरकारने हा प्रकार थांबवून “सेल्फ अटेस्टेशन” सुद्धा वैध ठरवलं आहे. मोठाच बदल आहे हा!)

 

७. काटा-चमचा :

 

table manners-inmarathi

 

आपण घरी कसेही जेवत असाल तरी जेव्हा आपण एखाद्या मोठ्या पार्टीत किंवा कुठल्या औपचारिक जेवणासाठी जातो, तेव्हा आपल्याकडून  हीच अपेक्षा केली जाते की, आपण काटा-चमच्याने खावे. का? तर ह्याला टेबल मॅनर्स म्हणतात म्हणून.

पण ही आपली संस्कृती नाहीच. आपण डोळे बंद करून निव्वळ नक्कल करत चाललो आहोत.

ह्या आणि ह्यासारख्या कितीतरी गोष्टीत आपण पश्मिमात्य देशांची विचार न करता नक्कल करत आलो आहोत आणि आज ती नक्कल आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?