' जगभरातले लोक "या" प्राचीन भारतीय सवयीच्या प्रेमात पडलेत, कारण या सवयीचे हे ११ फायदे त्यांना पटले

जगभरातले लोक “या” प्राचीन भारतीय सवयीच्या प्रेमात पडलेत, कारण या सवयीचे हे ११ फायदे त्यांना पटले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या पिढ्यान्-पिढ्या काही पद्धती अंगिकारत आल्या आहेत. यातल्या काही पद्धतींचा संबंध थेट मनुष्याच्या स्वास्थ्याशी जोडला जाऊ शकतो. यातलीच एक पद्धत म्हणजे जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत.

सध्या धकाधकीची जीवनशैली आणि धावपळ यामुळे जेवण उरकण्याकडे अनेकांचा कल दिसतो. ऑफीसमध्ये तर टेबलवर बसूनच जेवावे लागते. शिवाय घरी असतानाही अनेकजण जेवण्यासाठी टेबल-खुर्चीचा वापर करतात.

 

dinner inmarathi

 

मात्र जमिनीवर बसून जेवणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.

जेवायला जमिनीवर न बसण्यासारखे जीवनशैलीतील हे बदल आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. सुरुवातीला अगदी लहान वाटणाऱ्या या गोष्टी भविष्यात गंभीर आजारांचे महत्त्वाचे कारण ठरु शकतात.

त्यामुळे वेळीच काळजी घेतलेली चांगली. आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक जमिनीवर सुखासनात बसून जेवण्याची पद्धत पाडली होती. पाहूयात काय आहेत जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे…

 

१) पचनक्रिया सुधारते :

 

lunch-indi--inmarathi

 

जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते आणि तो चावत असताना आपण परत पूर्वस्थितीत येतो.

या सतत पुढे मागे होण्याच्या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते आणि स्नायू सक्रिय राहतात. ही क्रिया आपल्या पोटातील ऍसिड वाढवते.

यामुळे आपली अन्न पचण्याची प्रक्रिया सुलभ होते. यामुळे पोटाशी निगडित समस्या कमी होतात.

 

२) वजन घटवण्यास मदत होते :

जमिनीवर बसून जेवल्याने, म्हणजेच सुखासनात किंवा अर्धपद्मासनात बसल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे.

जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते. कारण ती योग्य वेळी मेंदू व पोटाला तृप्त झाल्याचे संकेत देते.

टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही नियंत्रणात राहते.

 

dhoni-inmarathi

 

३) शरीराची लवचिकता वाढवते :

अर्धपद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण ग्रहण करण्यास व पचण्यास मदतच होते.

परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.

 

lunch indian style inmarathi

 

४) मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते :

आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार, जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो आणि तुमचे सारे लक्ष जेवणावर म्हणजेच अन्नाचा स्वाद, स्वरूप, चव यावर केंद्रित होते. म्हणजेच मनाची अस्थिरता कमी होते.

असे झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते . यामुळे अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते आणि वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येते.

 

५) शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते :

शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.

यामुळे शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते.

 

eating indian style inmarathi

 

६) अकाली वार्धक्य येण्यापासून वाचवते :

जेवण्याची ही पारंपरिक पद्धत तुम्हाला अकाली वार्धक्य येऊ देत नाही. कारण अशाप्रकारे बसून जेवल्याने पाठीचा मणका आणि पाठीशी संबंधित विकार उद्भवत नाहीत.

 

७) दीर्घायुष्याचा लाभ होतो :

‘European Journal of Preventive Cardiology’ च्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर तिचे आ़युष्यमान जास्त आहे, असे तज्ञ सांगतात.

कारण आधार न घेता जमिनीवर बसून उठण्यासाठी शरीर लवचिक असावे लागते आणि शारीरिक क्षमता अधिक असावी लागते. ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते.

एका अध्ययनात असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे की जी माणसे कोणत्याही आधाराशिवाय उठण्यास सक्षम नव्हती, त्यांची पुढील ६ वर्षांत दगावण्याची शक्यता ६.५ पटीने अधिक होती.

 

lunch indian style inmarathi 3

 

८) गुडघे व कमरेतील सांधे मजबूत आणि लवचिक होतात :

Yoga for Healing या पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रासही होत नाही.

गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे जेवताना सतत वाकावे लागल्याने लवचिक होतात आणि सांध्यातील स्निग्धता टिकून राहते. यामुळे अनेक विकार दूर होण्यास मदत होते आणि शरीर निरोगी राहते.

 

९) चंचलता कमी होते :

मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो.

म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.

 

१०) हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो :

काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का? हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला उर्जेची अधिक गरज असते.

खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे हृदय अगदी सहजपणे पचनक्रियेसाठी मदत करणाऱ्या सर्व अवयवांपर्यंत रक्तपुरवठा करते.

 

lunch indian style inmarathi 1

 

मात्र जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून जेवता तेव्हा रक्ताभिसरणाच्या मार्गात अडथळे येतात. यात रक्त पायापर्यंत वाहून नेले जाते जे जेवत असताना आवश्यक नसते.

म्हणून जमिनीवर बसून जेवल्याने आपल्याला मजबूत मांसपेशी आणि स्वस्थ हृदयाचा लाभ होतो.

 

११) कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते :

 

lunch indian style inmarathi 4

 

दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा. दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका
होतो.

तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी जवळीक वाढते.

तर हे आहेत मांडी घालून जेवायला बसण्याचे फायदे. दुर्लक्ष न करण्याजोगे.. मग काय ? आजपासूनच पुन्हा मांडी घालून जेवायला बसायची सुरुवात करताय ना ? करायलाच पाहिजे !

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?