' विज्ञान तंत्रज्ञानातील या शोधांमुळे आज भारतही स्पर्धेत अग्रेसर ठरतोय! – InMarathi

विज्ञान तंत्रज्ञानातील या शोधांमुळे आज भारतही स्पर्धेत अग्रेसर ठरतोय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

टेक्नोलॉजीच्या ह्या विश्वात भारताला पाचवा सर्वात शक्तिशाली देश मानलं जातं. भलेही भारताला अजूनही विकसित देशांमध्ये मोजलं जात असेल, तरीदेखील आपल्या देशाची गणना आण्विक शस्त्र संपन्न देशांत केली जाते.

आज भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात एवढी प्रगती केली आहे की, संपूर्ण जगाचे लक्ष हे भारतीय विज्ञान आणि अंतराळ संशोधनाकडे लागून आहे.

भारतीय वैज्ञानिक दरवेळी नवनवीन टेक्नोलॉजी जगासमोर मधून भारताला वेळोवेळी सिद्ध करत आहेत. भारताने आण्विक शक्ती बनण्याचा दर्जा हा १९७४ सालीच मिळवला होता. भारताने आपलं पहिलं भूमिगत परीक्षण हे १८ मे १९७४ साली केलं होतं.

indias technologies InMarathi

 

पण तेव्हा भारताने हे स्पष्ट केले होते की, भारताचा आण्विक कार्यक्रम केवळ शांतीपूर्ण कार्यांसाठी असेल आणि हे परीक्षण हे केवळ भारताला उर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी करण्यात आले आहे.

त्यानंतर ११ आणि १३ मे १९९८ साली भारताने पोखरणमध्ये पाच आण्विक परीक्षणे केली. ज्यामुळे आपला देश हा आण्विक शक्तीसंपन्न देशांच्या रांगेत येऊन बसला.

ह्या व्यतिरिक्तही आणखी अश्या अनेक गोष्टी केल्या भारताने ज्यामुळे आज तो जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे.

Atomic Clock :

 

atomic clock-inmarathi
isro.gov.in

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने एक Atomic Clock विकसित केले आहे. ज्याचा वापर नेविगेशन सॅटेलाईट मध्ये केला जातो. ज्यामुळे नेमके लोकेशन डेटा मिळतो.

ह्याआधी पर्यंत इस्रोला नेविगेशन सॅटेलाईट साठी युरोपियन एरोस्पेस मॅन्युफॅक्चरर एस्ट्रीयम कडून Atomic Clock विकत घ्यावे लागत होते. Atomic Clockच्या निर्मितीनंतर इस्रो जगातील त्या अंतराळ संस्थांमध्ये सामील झाला आहे ज्यांच्या जवळ ही टेक्निक आहे.

सरस्वती सुपरक्लस्टर :

 

Saraswati-astronomers InMarathi

 

भारतीय अंतराळ वैज्ञानिकांच्या एका समुहाने आकाशगंगेचा एक खूप मोठा समूह ज्याला सुपरक्लस्टर म्हणतात तो शोधून काढला होता. ज्याला ‘सरस्वती’ हे नावं देण्यात आले. ह्या सुपरक्लस्टरचा आकार हा अरबो सूर्यांएवढा आहे.

पुणे येथील ‘इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) नुसार हे सर्वात मोठ्या माहिती असलेल्या समूहांपैकी एक आहे. जे पृथ्वीपासून ४०० प्रकाशवर्ष दूर आहे आणि १० अरब वर्षाहून जास्त जुना आहे.

आकाशगंगेचा हा समूह खूप मोठा आणि दुर्लभ आहे. आजवर अश्या खूप कमी समूहांचा शोध लावला गेला आहे. आणि भारताने पहिल्यांदा ह्याचा शोध लावला आहे.

एका रॉकेटने १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड :

 

isro-launch-kH7-inmarathi
livemint.com

इस्रोने एका रॉकेट मधून १०४ उपग्रह प्रक्षेपित करून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. हे करणारा भारत जगातील एकमेव देश आहे. ध्रुवीय अंतराळ प्रक्षेपण यान पीएसएलव्ही-C37 ने सर्वात आधी कार्टोसॅट श्रेणीच्या उपग्रहांना कक्षेत प्रवेश करवला.

ह्या नंतर उर्वरित १०३ नॅनो उपग्रहांना ३० मिनिटांच्या आत कक्षेत प्रवेश मिळवून दिला. ह्यात ९६ उपग्रह हे अमेरिकेचे होते. एका वेळी सर्वात जास्त उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम आतापर्यंत रशियाच्या अंतराळ एजेन्सीकडे होता जो आज भारताच्या नावे आहे.

जीएसएलव्ही एमके-3 :

 

gslv-mark-3-inmarathi
ndtv.com

जीएसएलव्ही एमके-3 च्या लॉन्चिंगला स्पेस टेक्नोलॉजीमध्ये एक मोठा बदल घडवून आणणारे मिशन म्हणून बघितलं जात आहे. आता भारताला इतर कुठल्या देशावर अवलंबून राहण्याची गरज नाही. हे रॉकेट अंतराळात ४ टनपर्यंतच्या वजनाच्या सॅटेलाईट्सला घेऊन जाऊ शकते. तर पृथ्वीच्या कमी उंचीवरील ऑर्बिटपर्यंत ८ टन वजन घेऊन जाण्याची क्षमता ठेवते.

१८ वर्षांच्या भारतीय मुलाने बनविलेला जगातील सर्वात हलका सॅटेलाईट :

 

kalamsat-inmarathi
innov8tiv.com

तामिळनाडू येथील पल्लापत्ती येथे राहणारा १८ वर्षीय रिफत शाहरुख ने जगातील सर्वात लहान सॅटेलाईट बनवला आहे. ६४ ग्रामच्या ह्या सॅटेलाईटला Kalamsat हे नाव देण्यात आले आहे. हा सॅटेलाईट बनविण्याकरिता २ वर्षांच्या कालावधी लागला असून त्यासाठी १ लाख रुपयांचा खर्च आला.

ह्या सॅटेलाईटचा उद्धेश 3D प्रिंटेड कार्बन फायबरच्या परफॉर्मेन्सना प्रदर्शित करणे आणि तापमान आणि रेडीएशनला रेकॉर्ड करणे असेलं. ह्याची मिशन अवधी ही २४० मिनिटे असेलं.

‘परम’ भारतचा पहिला स्वदेशी सुपरकॉम्पुटर :

 

param-supercomputer-inmarathi
nelive.in

परम सी-डॅक ने विकसित केलेला भारताच्या स्वदेशी सुपरकॉम्पुटर्सची एक चेन आहे. ह्या चेनमधील नवीन सुपरकॉम्पुटर हा परम ईशान आहे. तंत्रज्ञान निर्बंधचा परिणाम म्हणून क्रे सुपरकॉम्पुटरमधून वेगळे केल्यानंतर भारताने स्वदेशी सुपरकॉम्पुटर आणि सुपर कॉम्पुटिंग तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक कार्यक्रम सुरु केला.

सुपरकॉम्पुटर आण्विक शस्त्रांच्या विकासासाठी सक्षम समजला जातो. ह्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी १९८८ मध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्पुटिंग ची स्थापना करण्यात आली.

१९९० साली एका प्रोटोटाईपचे उत्पादन करण्यात आले. ह्याला ज्युरीख सुपरकॉम्पुटिंग शोमध्ये बेंचमार्क केलं गेलं. ह्याने इतर सिस्टिम्सना मागे सोडले होते. ज्यानंतर १९९१ साली परम 8000 हे अस्तित्वात आले.

आर्यभट्ट :

 

aryabhata-indias-first-satellite-inmarathi
drivespark.com

१९ एप्रिल १९७५ भारताचा आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ जो सोव्हिएत संघाद्वारे सुरु करण्यात आला होता. ह्याचे नावं गणितज्ञ आर्यभट्ट ह्यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. पण ह्या उपग्रहाने ५ व्या दिवशी काम करणे बंद केले.

तरीदेखील भारतासाठी ही खूप आनंदाची बाब होती, कारण हे भारतासाठी एक मोठ यश होतं. आर्यभट्टला भारतीय अंतराळ अनुसंधान संगठन ह्यांच्याद्वारे एक्स-रे खगोलशास्त्र, एरोनॉमिक्स आणि सौर भौतिकशास्त्रात प्रयोग करण्यासाठी बनविण्यात आलं होतं.

भारताच्या वैज्ञानिकांनी लावलेल्या या आणि अशा अनेक शोधांमुळे तंत्रज्ञान विकास आणि तंत्रज्ञान उपयोगितेच्या बाबतीत भारत अव्वल स्थानी आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा :  फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?