' शॉपिंग मॉलमधील चित्रपटगृहे टॉप'फ्लोअरवर असण्यामागे 'चलाख' व्यावसायिक कारण आहे! जाणून घ्या..

शॉपिंग मॉलमधील चित्रपटगृहे टॉप’फ्लोअरवर असण्यामागे ‘चलाख’ व्यावसायिक कारण आहे! जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आधीच्या काळापेक्षा आताच्या चित्रपट ग्रुहांचा चेहरामोहरा खूप वेगळा झाला आहे. आता तर खूप कमी ठिकाणी आपल्याला सिंगल स्क्रीन सिनेमा हॉल बघायला मिळतात. कारण आता त्यांची जागा मल्टीप्लेक्सने घेतली आहे. मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट बघण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की हे सर्व चित्रपटगृह मॉलच्या सर्वात वरच्या माळ्यावर का असतात? म्हणजे पहिल्या माळ्यावर किंवा दुसऱ्या माळ्यावर का नाही, नेहेमी सर्वात वरच्या माळ्यावर का?

 

cinema-halls-inmarathi
topyaps.com

शॉपिंग मॉल्सचा मुख्य उद्धेष्य हा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा असतो. शॉपिंग मॉल्स हे ह्याच तत्वाखाली काम करत असतात. म्हणजे कधी सेल, सजावट, ऑफर्स इत्यादीचे आमिष दाखवून मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना स्वतःकडे कसे आकर्षून घेता येईल ह्याकडे त्यांचा कल असतो. सिनेमा हॉल सर्वात वरच्या मजल्यावर असण्यामागे देखील एक व्यावसायिक नीती आहे.

 

cinema-halls-inmarathi02
treebo.com

मॉल्सचे ध्येय हे मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करून सामानाची विक्री करण्याचं असतं. मग ते ग्राहक चित्रपट बघायला येणारे का नसो. चित्रपट बघायला येणारे लोक हे खालच्या सर्व माळ्यांवर फिरत फिरत वरच्या माळ्यावर पोहोचत असतात.

 

cinema-halls-inmarathi01
zricks.com

ह्यादरम्यान ते मॉल्सच्या इतर शोरूम आणि दुकानांतील वस्तू बघत बघत जातात. ह्याने विक्रीची शक्यता वाढते. सर्वात वरच्या माळ्यावर सिनेमा हॉल असण्यामागे हे सर्वात मोठे कारण आहे.

सिनेमा हॉल करिता एका मोठ्या जागेची गरज असते. जी वरच्या माळ्यावर सहज उपलब्ध होऊन जाते. ह्यामुळे मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांना अडचण होत नाही, ते त्यांची खरेदी अडथळ्याविना करू शकतात. आणि जे चित्रपट बघायला येतात ते वरच्या माळ्यावर जाऊन चित्रपट बघू शकतात. इतर लोक एकत्र सर्वात वरच्या मजल्यावर जात नाही, ई सिनेमा हॉल असल्यामुळे त्यांना जायची गरजही पडत नाही.

 

cinema-halls-inmarathi03
thehansindia.com

तसेच चित्रपट गृहात एकाच वेळी खूप मोठ्या संख्येत लोक चित्रपट बघत असतात. त्यामुळे तिथे सुरक्षेची काळजी आणि व्यवस्था असणे गरजेचे आहे. जर कधी कुठली दुर्घटना घडली किंवा कुठल्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांना वरच्या मजल्यावरून आपत्कालीन दरवाज्याने सुरक्षित बाहेर काढणे सोयीचं होते. आणि वरच्या मजल्यावर अग्निशमन इत्यादी व्यवस्थापन उपलब्ध असते.

ह्याच सर्व कारणांमुळे मॉल्समध्ये चित्रपट गृह हे सर्वात वरच्या मजल्यावर असतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?