' यंदाचा आयपीएल सिझन गाजवणारे पाच 'सुपरस्टार' खेळाडू!

यंदाचा आयपीएल सिझन गाजवणारे पाच ‘सुपरस्टार’ खेळाडू!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील लीग सामने आता संपले आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद हे चार संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी लढत आहेत.

प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा यंदाची आयपीएल स्पर्धा नेहमीप्रमाणे धमाकेदार झाली आहे. आयपीएलचा हा १३ वा सीझन आहे.

“इनक्रेडिबल प्रीमियर लीग” असं म्हटली जाणारी ही इंडियन प्रीमियर लीग आज जगातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेट लीग झाली आहे. जगभरातील उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत भाग घेतात व आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.

आजवरच्या दमदार परफॉर्मन्सच्या आधारावर आम्ही तुम्हाला यंदाच्या आयपीएलमधील ५ सुपरडुपर खेळाडूंची नावं आणि माहिती देणार आहोत. त्यांनी त्यांच्या चमत्कारिक आणि अफलातून खेळाने क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आहेत.

त्यांचं हे यश खूप मेहनतीने त्यांनी मिळवलं आहे. उत्कृष्ट खेळाडूंची ती ओळखच आहे की ते सातत्याने उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात.

नव्या खेळाडूंनी सुद्धा यंदाच्या स्पर्धेत उत्तम छाप पाडली आहे. देवदत्त पड्डीकल, राहुल तेवातिया, ईशान किशन अशा युवा भारतीय खेळाडूंनी सुद्धा त्यांची छाप पाडली.

 

ishan-kishan-inmarathi

 

तर यंदाच्या आयपीएलचा पहिला उत्कृष्ट माचो खेळाडू आहे, ज्याने आपल्या चमकदार कामगिरीने क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत असा ‘यष्टीरक्षक’ फलंदाज के एल राहुल!

 

kl-rahul-ipl-inmarathi

 

यंदा पहिल्यांदाच त्याच्या गळ्यात आयपीएल कर्णधारपदाची माळ पडली! किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केली हे पाहायला मिळालं आहे. संघाच्या दुर्दैवाने, नशीब चांगलं नसल्याने त्यांना काही सामने गमवावे लागले.

चांगली आणि आश्वासक सुरुवात करूनही पंजाबच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. असं असलं, तरी त्यांचा कप्तान के एल राहुल सातत्याने धावा करत होता.

प्रत्येकच सामन्यात खणखणीत कामगिरी करत त्यानं धावांचा जणू रतीबच लावला होता. यष्ट्यांमागे उभं राहून संघाचा डोलारा सांभाळणाऱ्या राहुलने ५५.८३ च्या सरासरीने ६७० धावा काढल्या.

अर्थातच यंदाची ऑरेंज कॅप सध्यातरी त्याच्याकडेच आहे.

दुसरा माचो खेळाडू आहे, मूळचा दिल्लीकर आणि आयपीएलमध्येही दिल्लीच्या संघातून खेळणारा, सलामीवीर शिखर धवन. शिखरचं टोपण नाव आहे गब्बर… या गब्बरने यंदा अशीच एक कमाल कामगिरी करून दाखवली आहे.

 

shikhar-dhavan-inmarathi

 

सलग दोन सामन्यांमध्ये शतक झळकावण्याची किमया आजवर कुणालाही जमली नव्हती. धवन या नव्या विक्रमाचा मानकरी ठरला आहे. सुरुवातीला त्याला लय सापडली नाही, मात्र फॉर्मात आल्यानंतर त्याने त्याचा दबदबा राखला.

त्यानंतर, ‘गब्बर इज बॅक’ असं म्हणत त्यानं त्याच्या शैलीत उत्तम फलंदाजी केली. 

‘प्ले ऑफ’मधील मुंबई विरुद्धच्या सामन्यात तो अपयशी ठरला, आणि संघाचं काय झालं हे आपण पाहिलंच. Qualifier २ मध्ये त्यानं उत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा दिल्लीचे चाहते नक्कीच करत असतील.

या यादीचा तिसरा माचो मॅन आहे, जोफ्रा आर्चर… कॅरेबियन वंशाचा आणि इंग्लंड संघाकडून खेळणारा हा खेळाडू म्हणजे एक मस्तमौला अष्टपैलू!

राजस्थानचा संघ सुद्धा प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवू शकला नाही. पण या धुरंधराने त्याची छाप पाडली. १४ सामन्यांमध्ये २० गडी बाद केले. शिवाय वेळ पडली तेव्हा हातात बॅट घेऊन प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला चढवला.

 

archer-inmarathi

 

गोलंदाजीच्या बाबतीत म्हणाल, तर ती कामगिरी त्यानं चोखच बजावली. अनेक सामन्यांमध्ये त्यानं संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलली असल्याचं पाहायला मिळालं.

यंदाच्या मोसमात राजस्थानच्या संघानं आणखी एक हिरा भारतीय क्रिकेटविश्वाला दिला असं म्हणायला हवं. त्याचं नाव राहुल तेवातिया! या अष्टपैलू खेळाडूनं त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धचा सामना अस्सल क्रिकेट चाहते नक्कीच विसरणार नाहीत. राहुलने १८ षटकात पार धुमाकूळ घातला. सामना फिरवला.

 

rahul-tewatia-inmarathi

 

पहिल्या ४ चेंडूत ४ धमाकेदार षटकार…!!! तो एकामागून एक चेंडू सीमापार धाडत होता आणि रोमांच वाढत होता. पाचवा चेंडू हुकला. वाईट वाटलं.. फारच वाईट वाटलं. पण अखेरच्या चेंडूवर पुन्हा षटकार हाणला त्याने… शेल्डन कॉट्रेलला एका षटकात ३० धावा ठोकल्या.

या षटकानं त्याचे असंख्य चाहते वाढले असं ठामपणे सांगता येईल. अर्थात त्यानं  त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा लक्ष वेधून घेतलं. धावांवर रोख लावणं, कधी मोक्याच्या क्षणी विकेट्स काढणं आणि संघाचा फायदा करून देणं अशा गोष्टी त्यानं सहज केल्या.

भारतीय संघाची निवड समिती एक नवा अष्टपैलू म्हणून त्याच्यावर नजर ठेवणार यात काडीमात्रही शंका नाही.

या यादीत आणखी एका युवा खेळाडूचं नाव घ्यावंच लागेल. ते म्हणजे देवदत्त पडिकल!

 

padikal-inmarathi

 

या युवा सलामीवीराने रॉयल आयपीएलमध्ये रॉयल कामगिरी केली आहे. विराट कोहली, एबी डीव्हिलयर्ससारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू संघात असताना, या युवा खेळाडूची सतत चर्चा होणं, यातच सगळं आलं.

१४ सामन्यांमध्ये ४७२ धावा करून, यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या दहात त्यानं स्थान मिळवलं आहे. या युवा सलामीवीराचं अनेक दिग्गजांनी कैतुक केलं आहे.

भारतीय संघाचा भावी सलामीवीर म्हणून देवदत्तकडे पाहायला हरकत नाही असं चाहते म्हणू लागले आहेत. या युवा खेळाडूवर सुद्धा सगळ्यांची नजर असणार आणि त्याच्याकडून अपेक्षा वाढत जाणार, हे सुद्धा नक्की!

या यादीत वर उल्लेखित ईशान किशन किंवा गेली अनेक वर्षं सातत्याने उत्तम कामगिरी करूनही दुर्लक्षित राहिलेला सूर्यकुमार यादव, मुंबईचा जसप्रीत बुमराह, दिल्ली कॅपिटल्सचा कगिसो रबाडा अशीही अनेक नावं घेता येतील.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील संघातही स्थान न मिळालेल्या सूर्यकुमारमुळे आज येतेय अमोल मुझुमदारची आठवण!

यंदाची आयपीएल सुद्धा दमदारच ठरल्याने, या स्पर्धेत हे असे अनेक हिरोज आहेत. त्यामुळे सध्या ही यादी इथेच थांबवूया…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?