“मोदीजी, लोक कंटाळून राहुल गांधींना मत द्यायला तयार होताहेत” : एक कट्टर मोदी समर्थक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : नचिकेत शिरुडे

===

“राहुल गांधी अगदी कसा ही असला तरी तो खोटी आश्वासनं देत नाही”

हे वाक्य घराच्या हॉलमध्ये बैठकीत चाललेल्या एका चर्चेदरम्यान, बाजूच्या खोलीत बसून मी ऐकलं होतं.

बोलणारी व्यक्ती कोण होती माहिती नाही, पण समोर आजोबा आणि आजी बसलेले.

त्यांनी त्याला होकारार्थी रिप्लाय दिला होता. माझ्यासारख्याचा घरात ही परिस्थिती आहे तर बाकीच्यां घरांबद्दल बोलायला नको…!

आमच्या आयुष्यात खरंच बदल झाला आहे का ? तर माझं मी मागच्या ४ वर्षांपासून माझ्या घरच्यांच्या, नात्यातल्या माणसांच्या केलेल्या Observation वरून तरी नाही वाटत. मी मोदींना एक विकासपुरुष म्हणून आणि भाजपाला एक चांगला पर्याय म्हनून त्यावेळी समर्थन दिलेलं. माझ्या घरातील अगदी सर्वांनी दिलेलं.

पण त्या मोबदल्यात त्यांना काय मिळालं अस मला त्यांच्याकडे बघून कधी वाटलं, अनेकदा मी त्यांचं frustration अनुभवतो आहे.

 

Modi-in-Vadnagar-inmarathi
indianexpress.com

महाराष्ट्र सरकारने ओ बी सी शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट जमा करण्याचा नवा निर्णय काढलेला आहे. आधी ते पैसे डायरेक्ट कॉलेजला वर्ग होत असत, आता ते अकाउंट मध्ये येणार पण त्या अगोदर पैसे भरावे लागणार असं मला कॉलेज मधून सांगण्यात आलं.

मी मुंबईला जरी राहायला असलो तरी माझं घर ज्या गावात आहे तिथे शेती वर धंदा केला जातो. उत्पन्न हे विशिष्ट समयीच येत असतं. अश्यावेळी मी त्यांचाकडे पैश्याची मागणी केली तेव्हा माझी आई म्हणाली होती

“तुमच्या सरकारला पैसे झाडावर लागतात अस वाटतं का ?”

कॉलेजची चूक नाहीच. शासन आदेश तसा आहे म्हटल्यावर काय करणार. चार कागद जोडून याच शिष्यवृत्ती साठी अर्ज करताना माझ्या घरच्यांना पडलेला त्रास, उन्हातान्हात वयस्कर आजोबांनी मारलेल्या तहसील दरबारी चकरा बघितल्या आहेत. आधी online फॉर्म मग offline फॉर्म अश्या दोन्ही वेळी मी document साठी घेतलेला त्रास आठवतो आहे.

अश्या परिस्थितीत मध्यंतरी घरी गेल्यावर आजीला न राहून विचारलं होत की भाजपा चांगली का काँग्रेस? त्यावेळी आजीने दिलेलं उत्तर मला स्तब्ध करून गेलं. ती म्हणाली

“भाजपा व काँग्रेस दोघींपैकी चांगलं कोण हे मी सांगू शकत नाही, कोणीच चांगलं नाही. पण फक्त एवढं आहे की साठ वर्षात आम्ही भारताचे सर्व पंतप्रधान बघितले आहेत, पण कोणी आज इतकं गळ्यापर्यंत पोहचलेलं नाही. आम्ही आणीबाणी च्या वेळी इंदिरा सरकारच्या जुलूमाला जितके कंटाळलो नाही तितके आज कंटाळलो आहोत.”

रोज नवीन कायदे, रोज नवीन योजना, हे सर्व करत बसावं लागत आहे. एवढे आश्वासन दिले, पूर्ण केले नाहीत फक्त स्वतःच महिमामंडण च करण्यात आले आहे. भलेही मोदी हा एक कर्तबगार माणूस असला तरी त्याने सामान्य जनतेला वठणीवर आणण्यासाठी काठीचा वापर करायला नको होता.”

यापुढे माझ्याकडे शब्द नव्हते बोलायला.

मी सोशल मीडिया वर भलेही कोणालाही धोबी पछाड देऊ शकलो तरी घरच्यांसमोर हतबल आहे. एका पूर्णपणे भाजपा समर्थक कुटुंबाला त्याचा विरोधात जाताना बघणं हे दुःख दायक आहे. समस्या देखील जशाच्या तश्याच आहेत.

ना गावात काही बदल ना लोकांत. हो फक्त आधार कार्ड बनवायला खेड्या पाड्याहुन येणारे मात्र दिसत आहेत.

 

adharinmarathi
ivechennai.com

हे वास्तव शहरात बसलेल्या अनेकांना जरी आवडणार नसलं तरी सत्य आहे.

ग्रामीण भारत आज त्रस्त आहे आणि तो राहुल गांधीना सुद्धा मतदान करायला तयार आहे. मोदी सरकारने केलेल्या विकासकामांपेक्षा त्यांचा कार्याचा वेगळाच अंश इकडे दिसतोय. लोक मोदीला फक्त स्वप्रतिमा मोठा करणारा माणूस म्हणून बघत आहेत. अजूनही समर्थक आहेच पण त्यांचे मत बदलत आहेत.

कारण सदैव फक्त टीका करणारा पंतप्रधान लोकांना आता नको झाला आहे.

 

modi-manmohan-inmarathi
India.com

मोदींच्या राज्यात विकासकामे झाली आहेत. मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्न झाले आहेत हे लोक मान्य करत आहेत पण हे सर्व करण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात जातीय अस्मितेच्या अराजकाचे चित्र बघून लोक ‘काँग्रेस बरी होती, निदान तिच्याविरुद्ध लोक एकत्र येत, इकडे आपसातच भांडत बसली आहेत.

देशभक्तीचे दाखले देऊन याला त्याला देशद्रोही ठरवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. लोकांच्या श्रद्धासुद्धा भाजपाच्या काळात पायदळी तुडवल्या गेल्याचे चित्र लोक बघत आहेत.

विकासाच्या नावाखाली मूळ अस्तित्वाची होणारी हेळसांड लोक बघत आहेत.

पण ते गप्प आहेत कारण त्यांना राहुल गांधीपेक्षा मोदी उजवे वाटत आहेत. पण ग्रामीण भागात लोक हे स्थानिक उमेदवारांकडून न करण्यात आलेल्या कामांमुळे व न बदललेल्या परिस्थिती मुळे देखील नाराज आहेत. त्यात सरकारने लादलेली अघोषित आणीबाणी लोकांना त्रस्त करत आहे.

शेतकऱ्यांचे निघालेले मोर्चे, संप आज लोक बघत आहेत. त्यात झालेली कर्जमाफी आणि ती मिळवण्यासाठी खाललेल्या खस्ता लोकांच मतपरिवर्तन करण्यासाठी पूरक आहेत.

गावातील छोटे व्यवसायिक GST मुळे त्रस्त आहेत. दर आठवड्याला CA ला भेटणं त्यांना त्रासदायक ठरत आहे. अनेकांची GST मुळे Profit margin प्रचंड कमी झाली आहे त्यामुळे आता ते ठोस कार्याची अपेक्षा बाळगत आहेत.

 

modi-inmarathi
punjabtribune.com

पण ते ठोस कार्य घडताना दिसत नसल्यामुळे ते नाराज आहेत. मुद्दा विकासाचा होता तो पूर्ण भरकटलेला आहे, हे लोक बघू शकत नाहीत. असंतोष वाढत चालला आहे, पण तरी लोक अजूनही आशावादी आहेत.

जर सरकारने खरंच त्यांनी सोसलेल्या त्रासाचे पोझिटिव्ह इफेक्ट लोकांना दाखवले नाही तर भविष्यात सत्तांतर व्हायला वेळ लागणार नाही. मोदी समर्थक व भक्त यांच्यातील फरक जर लवकर सरकार करू शकले नाही तर हक्काचा मतदार भाजपा गमावणार आहे.

मी एक कट्टर मोदी समर्थक आहे. पण हे मी अनुभवलेलं सत्य आहे. जर लवकर यावर काही केलं गेलं नाही तर, भाजपाने लक्षात ठेवावे ही तीच जनता आहे, जिने इंदिरा गांधी यांना खाली खेचले आहे !

आता तरी विकासकाम लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य हाती घ्या, याला त्याला देशद्रोही म्हणण्यात वेळ वाया घालवू नका.

नाहीतर इरादे चांगले होते, पण करण्याची नियत नव्हती – असं म्हणत ही जनताच तुम्हाला लाथाडल्याशिवाय राहणार नाही.

 

vote-inmarathi01
connectedtoindia.com

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

18 thoughts on ““मोदीजी, लोक कंटाळून राहुल गांधींना मत द्यायला तयार होताहेत” : एक कट्टर मोदी समर्थक

 • May 12, 2018 at 6:22 pm
  Permalink

  पुर्व सरकारची ६० वर्षाच्या कारकिर्दीत सरकार चालविण्यासाठी केलेली स्वत:च्या स्वार्थासाठी जनतेला अंधारात ठेवुन अंगवळणी पडलेली वाट हि प्रजा सहजासहजी विसरु शकतील कां? मोदीची धडपड आणि मेहनत,नवीन तंत्रज्ञानाने स्मार्ट देश बनविण्यास साठी वेगळया वाटेने तर जावे लागणार ती वाट अंगवळणी पडण्यास वेळ तर द्यावाच लागेल,आणि त्याना आपण साथ देण्यास पाहीजे.नव्या युगाचा प्रगत देशाचा शोध घेणा-या जगतज्येषठ्या नरेंद्र मोदीचे बरोबर भारताचा विकास घडवुन नवीन राजमार्ग तयार करुया। जय हिंद। जय भारत।

  Reply
  • December 14, 2018 at 10:33 am
   Permalink

   Khare ahe.Modijina apan ankhi thoda vel dila pahije. Modi ani Rahul yanchi barobari karuch naye.Yachat tulna ho u shakat nahi. Congress ne JANTELA phakta shasnachya facilities ver jagnyache shikvle ahe.Modiji pratekala swalambi kartayat.Yachi zal saglyana lagnarch. Business karnyarana ter totach vatnar karan profit margin kami zali ahe. Ver chalu asleli charcha zali pahije tyatun Modiji kahi tari upay shodhatil.Pan corruptionla sagle waytagle ahet.Tyamule public sudharna hotana honara trass sahan karnar.

   Reply
 • May 12, 2018 at 6:27 pm
  Permalink

  जनतेसाठी या नवीन व्यासपिठाचे कौतुक आहै.या व्यसपिठावरुन खारीच्या वाट्याने मला देश सेवेचा आनंद मिळत आहे.धन
  धन्यवाद।

  Reply
 • May 12, 2018 at 6:44 pm
  Permalink

  या सर्व लेखातून मोदी द्वेषच व्यक्त होतो आहे आणि लिहिणारे लेखक पूर्वग्रहदूषित लिखाण करीत आहेत.. घरात खायला काही ठेवलेले का काँग्रेस ने जे तुम्ही लगेच पंक्तीत बसायची स्वप्न बघत आहात..

  Reply
 • May 12, 2018 at 9:01 pm
  Permalink

  We Indians are not having a mindset where we can take some trouble for better future we want it at other’s cost but not to me…this Article is the result of the same mindset…i feel…But take a thing from me…the situation presently in world …all will remember modi even if he will not in power in 2019 because of efforts he took in past four years on each front and specially on International relations …But as i said we Indians will prefer Rahul Gandhi because there will be no pinch to individual rest Indian economy and India’s position who cares …is the attitude and mindset and Modi is trying to change the same 60 years mentality so this is happening to him…thanks our god comes always to save us…hope he will come again in next 5 to 6 years if world situation gets worse…because if Rahul Gandhi is there as PM then even god will also think twice

  Reply
 • May 13, 2018 at 4:21 am
  Permalink

  Bhau mla 25000 fee hoti open madhe me swta kam krun bhari tevha kute hote congress

  Reply
 • May 13, 2018 at 8:57 am
  Permalink

  This government is better than congress , at lest they are making decisions for long term . We want everything free but are not ready to pay taxes . I agree with you that Modi has not done anything for salaries middle class . But still I prefer Modi over Rahul , Mamta , Yechuri, mehbooba , Mulayam , Mayawati , Uddhav , Raj , Amar etc

  Reply
 • May 13, 2018 at 9:11 am
  Permalink

  Ak no. Cha faltu lekh aahe
  Jay modi

  Reply
 • May 13, 2018 at 9:16 pm
  Permalink

  aani kay lihinar ha bhu, navatch na aahe lekhakachaya

  Bhu samaj na jara, 60 varsha kahi karu shakale naahi u 4 varchatch hisab magto

  Reply
 • May 14, 2018 at 6:18 am
  Permalink

  या लेखातली आणि प्रतिसादांमधली वाक्ये विचार करायला लावणारी आहेत. मात्र त्यातली मराठी भाषा दर घासाला दाताखाली खडा आल्यासारखी खटकते. कृपया इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

  Reply
  • December 11, 2018 at 8:49 pm
   Permalink

   Bhavnekade lakshya dya….. pratek veli tumcha shudhhatecha aagraha mhatvacha nasto

   Reply
 • December 11, 2018 at 11:41 am
  Permalink

  हि आजची सत्य परिस्थिती आहे

  Reply
 • December 11, 2018 at 11:46 am
  Permalink

  swatach

  Reply
 • December 11, 2018 at 11:53 am
  Permalink

  khup mst lekh ahe ani stya pn hech ahe

  Reply
 • December 11, 2018 at 10:32 pm
  Permalink

  Saglech fukat pahije….kuthla hi tras nko…yeta jata…Modi mulech sagle vaiet hotey….bhav kadhi hota shet Malala…
  Berojgari…ata vadli ki kami…
  Digitalization …hotey…transferancy having tar…online form bharne aalech..

  Vichar Kara…ata gamavle tar parat Modi honar nahi…sudhara..pragat vha..

  Reply
 • December 12, 2018 at 4:49 pm
  Permalink

  Bloody damn BJP
  BJP IS Most corrupted party in India

  Reply
 • December 12, 2018 at 8:46 pm
  Permalink

  बोलायेला भीती वाटतेय पण बोलणे गरजेच आहे इतका त्रास पूर्वी कधीच झाला नाही इतका त्रास आता होतोय सर्वच क्षेत्रात त्रास आहे वेळेची वाट बघतोय बाकी आपल्या हातात काहीही नाही

  Reply
 • December 16, 2018 at 1:09 am
  Permalink

  पण शिस्त लावण्या साठी काही कडक निर्णय कधीतरी घ्यावेच लागणार होते ते निर्णय प्रामाणिक पणे मोदींनी आपल्या कारकीर्दी ची आणि सरकार ची पर्वा न करता घेतले ते स्वतः साठी नाही तर तुम्हा आम्हा साठी. पण असले हे लेख लिहून तुम्ही उतावळेपणा का दाखवता तेच समजत नाही. जी सत्तर वर्षे काॅग्रेस च्या काळात काढली ती सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे दिशाहीन होती असं वाटत नाही का? बाकीचे राष्ट्र आपल्या नंतर स्वतंत्र होऊन त्यांची प्रगती पाहून शरम वाटायला पाहिजे. आता हिन्दू सोडून बाकीचे धर्म आपल्या राष्ट्रात एवढे कट्टर का झाले याचा कोणी विचार केलाय का? धर्म परिवर्तन सगळ्यात जास्त आपल्या देशात झालं आहे आणि आता तीच मोठी समस्या आहे, याला काॅग्रेस ने आवर का घातला नाही? कारण देश चालवणारे नकली गांधी. हे तर मोठे आंतरराष्टीय कटकारस्थान होते आणि अजूनही आहे.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?