झाडांना वाईट बोलल्याने ते खरंच सुकून जातात का? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

‘तारे जमीन पर’, आमिर खान चा हा चित्रपट आपण बघितला असेल. त्यामध्ये ईशान ह्या लहान मुलाच्या वडिलांना आमिर खान समजविण्यासाठी एक गोष्ट सांगतो, ‘सॉलीमन आयलंडमध्ये जेव्हा आदिवास्यांना जंगलाचा कुठला भाग छाटायचा असतो शेतीसाठी तेव्हा ते तिथल्या झाडांना कापत नाही, तर त्या झाडांजवळ सर्व एकत्र येतात आणि त्या झाडाला वाईट साईट बोलतात. आणि बघता बघता ती झाडे स्वताहून सुकून जातात, मरून जातात.’ हे सांगून आमिर खानने ईशानच्या वडिलांना त्यांची चूक लक्षात आणून दिली होती.

 

tree-experiment-inmarathi03

 

ही कहाणी खरी होती की खोटी हे तर माहित नाही. पण IKEA ह्या फर्निचर बनविणाऱ्या एका कंपनीने ह्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे. IKEAने आपल्या ऑफिसातील दोन झाडं वेगवेगळ्या शाळेत ठेवले आणि शाळेतील मुलांना सांगितले की, एका झाडाजवळ नकारात्मक, वाईट शब्द म्हणा. तर दुसऱ्या झाडाजवळ सकारात्मक, चांगले शब्द म्हणा…

 

tree-experiment-inmarathi

 

मुलांना आपला आवाज रेकॉर्ड करण्यास सांगितल्या गेलं, एका झाडाशी चांगलं तर एका झाडाशी वाईट बोलायला सांगितल्या गेलं…

३० दिवसानंतर ह्या प्रयोगाचा जो रिझल्ट समोर आला तो खरंच आश्चर्यकारक होता. ज्या झाडाला प्रेम, सकारात्मकता मिळाली, म्हणजेच ज्या झाडाला सर्वांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या ते झाडं चांगल्याने वाढलं. दुसरीकडे ज्या झाडाला नकारात्मक गोष्टी बोलल्या गेल्या ते झाडं सुकायला लागलं. ह्या दोन्ही झाडांची एकसारखीच काळजी घेतली गेली. त्यांना सारखं खत, पाणी आणि उन दाखवल्या गेलं. ह्यात फरक होता तो केवळ शब्दांचा, एकाला सकारात्मक आणि दुसऱ्याला नकारात्मक वागणूक.

 

tree-experiment-inmarathi01

 

Bullying म्हणजेच दुसऱ्यांना चिडवणे  त्यांचा मानसिक छळ करणे ह्याबाबत जागरूकता पसरविण्यासाठी हा अनोखा प्रयोग केला गेला. ज्याचा रिझल्ट हा खरंच आश्चर्यकारक होता.

 

tree-experiment-inmarathi02

 

जर एका झाडावर नकारात्मक शब्दांचा एवढा वाईट परिणाम होऊ शकतो, तर विचार करा खाद्य व्यक्तीवर ह्याचा किती वाईट परिणाम होत असेलं. जगभरात अनेक मुलं आणि मोठे देखील Bullying ला बळी पडतात. अश्या मुलांना कमी लेखून त्यांच्यावर जबरदस्ती केल्या जाते, त्यांना वाईट-साईट बोलल्या जाते, त्यांचा मानसिक छळ केला जातो.

 

अशी वागणूक ज्यांना मिळते त्या मुलांवर ह्याचा अतिशय वाईट परिणाम होतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, कधीकधी त्यांना हा छळ सहन होत नाही आणि ते आत्महत्या करण्याचं पाउल उचलतात. त्यामुळे ह्यापासून त्यांना वाचविणे खूप गरजेचे असते. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणे त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलणे गरजेचे आहे. तसेच ह्याबाबत जागरूकता पसरविणे देखील गरजेचे आहे. म्हणजे ह्या त्रासाला कंटाळून कुणाचा नाहक बळी जाणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?