'हा व्हिडीओ बघितला तर तुम्ही परत कधीच ट्रेनमध्ये चहा पिणार नाही!

हा व्हिडीओ बघितला तर तुम्ही परत कधीच ट्रेनमध्ये चहा पिणार नाही!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपण ज्यावेळी रेल्वे ने प्रवास करतो त्यावेळी आपण साहजिकच विक्रीला येणाऱ्या खाद्यपदार्थांची खरेदी करत असतो, चहा तर आपल्या प्रवासा दरम्यानच आवडत पेय, अनेक वेळा रेल्वे मधल्या विक्रेत्याकडून चहा ची खरेदी करत असतो पण जर तुमच्या चहात रेल्वेतल्या स्वच्छतागृहाचे पाणी मिसळले असेल तर ? तुम्ही तों चहा पुन्हा प्याल ? असाच काहीसा धक्कादायक प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आला आहे.

 

financialexpress.com

ह्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, यापुढे कधीच रेल्वे स्थानका वरील चहा न पिण्याचा निश्चय प्रवाशांनी केला आहे. तर काही सुज्ञ प्रवाशांनी याबाबतीत रेल्वे मंत्रालया कडे व रेल्वे बोर्डाकडे तक्रार केली आहे.

हा व्हिडीओ ज्या ठिकाणी व्हायरल करण्यात आला त्या चारबाग स्टेशन वरील प्रवाश्यांनी फेरीवाल्या चहा विक्रेत्यांविरोधात कडक कारवीची मागणी केली आहे.

प्रशासनाने केलेल्या तपासानंतर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की प्रस्तुत व्हिडीओमधील घटना डिसेम्बर २०१७ ची असून रेल्वे क्रमांक १२७५९ चेन्नई सेन्ट्रल ते हैद्राबाद चारमिनार या जलद गाडीत घडली आहे.

 

 

तपासाअंती रेल्वे बोर्डाने कंत्राटदाराला १ लाखाचा दंड ठोठावला आहे, परंतु सत्य माहिती नसलेल्या चारबाग स्थानकावरील प्रवाश्यांना तो व्हिडीओ चारबाग इथलाच वाटला व गोंधळ उडाला. ह्या व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे कि एक चहा विक्रेता दरवाज्या बाहेर उभा असून दुसरा चहावाला आत चहाच्या कॅनमध्ये स्वच्छतागृहाचे पाणी टाकत आहे.

हा व्हिडीओ बघून आपणच ठरवा कि यापुढे रेल्वेतले खाद्यपदार्थ विकत घ्यायचे का नाही, खासकरून चहा सारखे ‘अमृततुल्य’ पेय !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?