भारताचा चेहरामोहरा बदलून टाकू शकण्याची ताकद असलेल्या महत्वाकांक्षी सप्तयोजना

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

स्वातंत्र्योत्तर ७० वर्षांनंतर आज आपला भारत देश आर्थिकदृष्ट्या बलवान झाला आहे. भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. पण आपण आणखी काही गोष्टींमध्ये जर बदल घडवू शकलो तर तो बदल भारताला महासत्तेचा दर्जा मिळवून देऊ शकतो. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेतली आहे. सध्या चालू असलेल्या प्रकल्पांपैकी पुढील सात योजना जर भारताने यशस्वीपणे पूर्ण करून दाखवल्या तर विकासाच्या दिशेने आपला देश एक मोठी झेप घेईल.

१) भारतमाला

भारत सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होईल आणि २०२२ साली ती पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण भारतभर ३५००० किलोमीटर एवढे रस्त्याचे जाळे तयार करण्याचे योजले आहे. त्यासाठी ५.३५ लाख करोड रुपये खर्च होतील. दुसऱ्या टप्प्यात तीस हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा रस्ता बनेल अशी आशा आहे.

 

bharatmala-project-real-map-inmarathi
masterbuilder.co.in

या योजनेअंतर्गत सर्व राज्ये एकमेकांशी चांगल्या प्रकारे जोडली जातील. यामध्ये आत्ता रोड कनेक्टिव्हिटी विशेष चांगली नसलेल्या उत्तर-पूर्व राज्यांचा देखील समावेश आहे. या प्रकल्पामुळे या राज्यांमधील येणं-जाणं सोयीचं होईल. त्याचप्रमाणे २२ दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

२) सागरमाला

या महत्त्वपूर्ण योजनेची कल्पना अटल बिहारी बाजपेयी यांच्या २००३ साली अस्तित्त्वात असलेल्या सरकारची होती. देशाच्या आर्थिक विकासासाठी अशा योजना खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. जाणकारांच्या मते, ही योजना पूर्ण झाली तर देशाचे सरासरी उत्पादन प्रतिकुटुंब २% एवढे वाढेल.

 

sagarmala-project-inmarathi
mapsofindia.com

या प्रकल्पांतर्गत १२ मुख्य आणि १८५ छोट्या बंदराचे आणि ७५०० किलोमीटर पसरलेल्या समुद्रकिनारी प्रदेशांचे आधुनिकिकरण केले जाणार आहे. या व्यतिरिक्त बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी रोड कनेक्टिविटीमध्ये सुधारणा करायची आहे.जेणेकरून सामानाची ने-आण करणे सोयीचे होईल आणि वेळेचा अपव्यय टळेल. ह्या योजनेअंतर्गत १० दशलक्ष नवीन रोजगार निर्माण होतील. या योजनेवर साधारण ४ लाख करोड रुपये खर्च होणार आहेत. ही योजना २०२२ पर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे.

3. मालगाडीसाठी स्वतंत्र ट्रॅक :

आजपर्यंत प्रवासी ट्रेन्स आणि मालगाड्यांसाठी एकच ट्रॅक आहे. मालगाड्यांमुळे बहुतेकदा प्रवासी गाड्या खोळंबतात. पण सरकारची ही योजना पूर्णत्त्वास गेली तर कित्येक समस्यांचे निराकरण होईल.

एकच ट्रॅक असल्याने प्रवासी गाड्यांना उशीर होतो. कारण मालगाड्या खूप जास्त वेगाने चालवू शकत नाही.

त्यामुळे प्रवासी ट्रेन्सही त्यांच्या निर्धारित वेगात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या लेट होतात. प्रस्तावित नवीन योजनेअंतर्गत ३३०० किलोमीटरचे नवीन ट्रॅक तयार केले जातील. त्यामुळे मालगाड्या आत्तापेक्षा अडीचपट अधिक माल वाहून नेऊ शकतील. त्यांच्या गतीत सुधारणा करता येईल. त्यामुळे वेळेची बचत तर होईलच पण गाड्यांची कार्यक्षमता सुद्धा वाढेल.

 

goods-carrier-inmarathi
cnbc.com

त्याचप्रमाणे मालगाड्या रखडल्याने इतर रेल्वे प्रवाशांचा होणारा खोळंबा थांबेल आणि बाकीच्या रेल्वे वेळेवर धावू शकतील.यामुळे त्यांच्यावर असलेला लेट लतीफचा शेरा कायमचा पुसला जाईल. ही योजना २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

४: जगातील सर्वात उंच इमारत :

ही इमारत जगातील सगळ्यात उंच गगनचुंबी इमारातींपैकी एक इमारत असेल. २०१९ पर्यंत तिचे बांधकाम पूर्ण होण्याची आशा आहे. मुंबईत बनत असलेल्या ह्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल तेव्हा भारत जगातील सर्वांत उंच इमारती असलेल्या देशांपैकी एक देश बनेल. या टॉवरमध्ये ११७ मजले आणि २९० अपार्टमेंट्स असतील. लोढा ग्रूपच्या या बिल्डिंगमधल्या एक अपार्टमेंटची किंमत १५ कोटीपर्यंत असेल.

५. आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण बिझनेस कॉरिडॉर :

सध्या युरोप आणि राशियासोबत व्यापार करण्यासाठी भारताला जहाजातून नेदरलँडच्या रॉटरडॅम बंदरातून जावे लागते. मात्र या नवीन कॉरिडॉरमुळे हे अंतर ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येऊ शकेल.

 

International-North-South-Transport-Corridor-inmarathi
infrabuddy.com

७२००० किलोमीटर लांब मार्गाने मुंबईपासून इराणच्या अब्बास बंदरपर्यंत जहाजातून सामान नेले जाईल आणि तिथून रस्त्याने रशिया आणि इतर ठिकाणी सामानाची वाहतूक केली जाईल. यामुळे व्यापार अधिक किफायतशीर होईल. या नव्या कोरिडॉरमुळे ४० दिवसांचा प्रवास केवळ २५ दिवसांत पूर्ण होईल.

६) स्टॅचू ऑफ यूनिटी :

सरदार पटेल यांची ही मूर्ती जगातील सर्वांत उंच मूर्ती असेल. ही मूर्ती १८२ मीटर उंच असेल जी सध्या सर्वात उंच असलेल्या चीनच्या स्प्रिंग बुद्ध मंदिरापेक्षा अधिक उंचीची असेल. ही मूर्ती गुजरातमध्ये वडोदरा शहराजवळील साधू बेट या नदीवर बनवली जात आहे. आणि ही मूर्ती बनविण्याचा खर्च साधारण तीन हजार कोटी आहे.

 

statue-of-unity-inmarathi
dnaindia.com

ही मूर्ती बनविण्याचे काम २०१३ मध्ये सुरू करण्यात आले. या वर्षी सरदार पटेल यांच्या जयंती प्रसंगी या मूर्तीचे अनावरण होईल अशी आशा आहे.

७) बुलेट ट्रेन

ही देशाच्या सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या योजनांमधील एक योजना आहे. याने कित्येक किलोमीटर दूर अंतरावर असलेली शहरे काही तासांच्या अंतरावर येतील. ही योजना २०२३ साली पूर्ण होईल अशी आशा आहे.

 

bullet-train-inmarathi
indianexpress.com

बुलेट ट्रेन गुजरात आणि मुंबईदरम्यान चालवण्यात येईल. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर अहमदाबाद ते मुंबईमधील ७ तासाचे अंतर २ तास ८ मिनिटे इतके कमी होईल. या ट्रेनमध्ये एक वेळी १६०० प्रवासी प्रवास करू शकतील. आणि तिचा वेग ३५० किलोमीटर प्रतितास एवढा असेल. बुलेट ट्रेनने प्रवास करण्याचे भाडे प्रत्येक प्रवाशास जवळपास 3 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

या योजना सफल झाल्या तर त्या, आपल्या देशाचा चेहरामोहरा कायमचा बदलून टाकायला मदत करतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?