'प्राचीन भारतीयांनी वापरलेल्या "दहा" आश्चर्यकारक युद्धनीती!

प्राचीन भारतीयांनी वापरलेल्या “दहा” आश्चर्यकारक युद्धनीती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  

प्राचीन भारतातील अनेक गोष्टी अशा आहेत की त्या काळात या गोष्टी कशा घडवून आणल्या गेल्या असतील हे कोडे अजून सुटलेले नाही. मंदिरांचे बांधकाम, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र यासारख्या कित्येक गोष्टींची उदाहरणे देता येतील.

त्यापैकीच एक म्हणजे प्राचीन भारतीय युद्धनीती. भारतीय युद्धशास्त्रात अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आजही आश्चर्य वाटते. प्राचीन भारतीयांनी वापरलेल्या अशाच काही आश्चर्यकारक युद्धनीती आपण या लेखात पाहणार आहोत.

१) हत्तीचे कातडे पांघरलेल्या घोड्यांचा वापर 

भारतात मेवाडच्या राजांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या हत्तींना आपल्या घोड्यांना लहान हत्तींची कातडी पांघरून मूर्ख बनवले होते. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या हत्तींनी ती हत्तींची लहान बाळं आहेत असे समजून त्या घोड्यांवर हल्ला चढवला नाही.

महाराणा प्रताप यांनी ही युद्धनीती हल्दी घाटीच्या प्रसिद्ध युद्धात वापरली होती.

२) हत्तींचा प्रतिबंध करण्यासाठी दरवाजावर ठोकलेले खिळे

किल्ल्याची दारे फोडण्यासाठी हत्तींचा वापर केला जात असे. त्यामुळे किल्ल्यांच्या दरवाजावर हत्तींनी धडक देऊन दरवाजा फोडू नये यासाठी दरवाजांवर मोठाले अणकुचीदार खिळे ठोकले जात.

 

 

उंटाचा वापर

इतक्या मोठ्या प्रमाणात हत्तींचे नुकसान टाळण्यासाठी एक उपाय केला जाई. हत्ती आणि किल्ल्याच्या दरवाज्याच्या मध्ये एक उंट उभा केला जात असे. आणि हत्तीला उंटावर धडका मारायला लावत असत. अशा प्रकारे दरवाजा फोडला जात असे.

याचा परिणाम म्हणून उंट जीवाला मुकत असे. परंतू उंट हत्तीच्या मानाने स्वस्त असल्याने उंटाच्या मृत्यूमुळे होणारे नुकसान हत्तीपेक्षा कमी असे.

३) राजस्थानच्या किल्ल्यामधील छोटे, कमी उंचीचे दरवाजे :

राजस्थानमध्ये किल्ले अशा पद्धतीने बांधलेले होते की त्यांची त्या किल्ल्यातील खोल्यांमध्ये किंवा सभागृहात शिरण्याचे दरवाजे आखूड, कमी उंचीचे होते. प्रथमदर्शनी पाहणाऱ्याला ही बांधकामातील चूक वाटू शकते. पण ती एक युद्धनीती होती. युद्धप्रसंगी जेव्हा इतर टोळ्यांमधील किंवा गटातील सैनिक किल्ल्यात शिरत तेव्हा त्यांना मान खाली घालून आत शिरावे लागे.

 

amer-inmarathi
sandeepachetan.com

दारांच्या शेजारीच उभे असलेले सैनिक त्यांचे शीर धडावेगळे करत. तर कधी आत शिरल्यावर समोर पुढचा रस्ताच नसे. आणि याची माहिती नसल्याने सैनिक आत शिरून स्वतःच्या प्राणास मुकत.

४) अंधारी गुहा

पूर्वीच्या काळात जे तटबंदी भेदून पळून जायचा प्रयत्न करत त्यांना काळाकुट्ट अंधार असलेल्या नागमोडी, वळणावळणाच्या गुफेतून जावे लागे. त्या गुफेच्या आत अजून अंधारी गुफा असत, ज्या गुन्हेगाराला परत खाईत घेऊन जात. आतमध्ये काळोखात लपलेले सैनिक शत्रूपक्षातील सैन्याला अणकुचीदार भाल्याने मारून टाकत असत.

 

dwarf-inmarathi

 

या गुफेच्या दुसऱ्या बाजूस लोखंडी झाकण असे जे बंद केलेले असे आणि त्या बाजूने विषारी वायू सोडता येण्याची सोय केलेली असे.

५) बैलांच्या शिंगांवर मशाली बांधून मोठ्या संख्येने शत्रूच्या दिशेने बैल पाठवणे

ही पद्धत खुद्द शिवाजी महाराजांनी वापरलेली होती. रात्रीच्या कुट्ट काळोखात अशा पद्धतीने शिंगांवर मशाली बांधलेले बैल मोठ्या प्रमाणावर शत्रूच्या छावणीच्या दिशेने सोडले जात.

 

 

दूरवरून पाहणाऱ्याला शत्रूचे सैन्य मोठ्या प्रमाणावर आपल्यावर चाल करून येत आहे असे वाटत असे. आणि ते भयभीत होत असत. शिवाजी महाराजांनी ही युद्धनीती शाईस्तेखानाच्या सैन्याला घाबरवण्यासाठी वापरली होती.

६) मराठा सैनिकांचे छोट्या गटाने केले जाणारे हल्ले

१७ व्या शतकात जेव्हा मराठा सैनिक आजूबाजूच्या बिजापूर, कुतुबशाही अशा मुघल साम्राज्यावर हल्ले चढवत तेव्हा मुघलांचे सैनिक मोठ्या प्रमाणावर असत असे आणि शिवाय त्यांचा शस्त्रसाठा देखील मोठा होता. पण त्यांना येथील पश्चिम घाट आणि दक्खनच्या पठाराच्या भौगोलिक परिस्थितीबद्दल पुरेशी माहिती नव्हती.

त्यामुळे मराठा साम्राज्यातील राजे आपल्या सैन्याची छोट्या छोट्या गटात विभागणी करत आणि डोंगराच्या विविध ठिकाणाहून हल्ला करत. अशाने मुघलांना समोरचे सैनिक खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचा भास होई.

७) दरवाजांभोवती असलेले भिंतीचे आवरण 

 

 

जुने जोधपूर शहर हे चहुबाजूंनी भिंतींनी वेढलेले होते. जुन्या शहराला असलेल्या आठ दरवाजांपैकी एक दरवाजा असलेल्या मार्ती दरवाज्यासमोरच हत्तींनी धडक देऊन दरवाजा तुटला तर होणारे नुकसान कमी व्हावे म्हणून एक भिंत होती.

८) किल्ल्याच्या भिंतींमधून खाचा करून त्यातून उकळते तेल वा पाणी सोडणे

ही पद्धत जवळजवळ प्रत्येक किल्ल्यावर वापरली जाई. उदाहरणच द्यायचं झालं तर जैसलमेर किल्ला. त्यांच्याकडे शत्रू जेव्हा किल्ल्याच्या तटबंदीमध्ये प्रवेश करत असे तेव्हा सैनिक घासून गुळगुळीत झालेल्या गोट्यांवरुन उकळते पाणी सोडत. याने शत्रूचे सैन्य भाजले जाऊन जखमी होत असे.

 

 

चित्रात दाखवलेला दौलताबादचा देवगिरी किल्ला आहे. तटबंदीवर दिसणाऱ्या खाचेतून उकळते तेल ओतले जाई.

९) टोकदार वळणे असलेले अरुंद रस्ते

बहुतेक किल्ल्यांच्या मार्गावर अशी अरुंद टोकदार वळणे असत. याने शत्रूचा वेग कमी होत असे.

१०) संरक्षणार्थ रॉकेटचा वापर 

भारत हा संरक्षणाच्या कारणासाठी युद्धनीती म्हणून रॉकेट प्रक्षेपण करणारा पहिला देश आहे मैसूर हे संरक्षणासाठी युद्धप्रसंगी iron cased रॉकेट वापरणारे पहिले भारतीय राज्य आहे. १८ व्या शतकात हैदर अली हा मैसूरचा राजा होता. तेव्हा त्याने त्याचा वापर केला होता.

 

rocket-inmarathi
thebetterindia.com

आणि त्यानंतर टिपू सुलतान याने देखील इस्ट इंडिया कंपनीविरुद्ध रॉकेटचा वापर केला. टिपू सुलतान या राजाने fathul mujahiddin हे मिलिटरी मॅन्युअल सुद्धा लिहिले होते, जे रॉकेट प्रक्षेपणासंदर्भातील आहे. त्या पुस्तकाने या क्षेत्रातील लेखनाची मुहूर्तमेढ रोवली.

ही आणि अशी अनेक आश्चर्यकारक तंत्रे, युक्त्या पूर्वी भारतीय लोक वापरात असत. त्या काळाच्या मानाने ही तंत्रे वापरली गेली हे नक्कीच आश्चर्यकारक आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “प्राचीन भारतीयांनी वापरलेल्या “दहा” आश्चर्यकारक युद्धनीती!

  • December 21, 2018 at 10:33 am
    Permalink

    खुप छान लेख

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?