' आता बजाज आणि TVS च्या मोटारसायकल आणि ऑटो रिक्षा चालणार प्रेट्रोलशिवाय !

आता बजाज आणि TVS च्या मोटारसायकल आणि ऑटो रिक्षा चालणार प्रेट्रोलशिवाय !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

इथेनॉलसारख्या जैवइंधनाचा वापर परदेशात मोठ्या प्रमाणात होतो आहे. ब्राझील, अमेरिका या पुढारलेल्या देशात पेट्रोलियम आयातीला पर्याय म्हणून ऊस, मका, बीट आदी शेती उत्पादनांपासून थेट इथेनॉलचे उत्पादन वीस टक्‍क्‍यांपासून शंभर टक्‍क्‍यांपर्यंत करतात.

ब्राझीलमध्ये नवीन वाहनांत शंभर टक्के इथेनॉलचा वापर केला जातो.

जुन्या वाहनात तीस टक्‍क्‍यांपर्यंत वापर होतो.यामुळे या देशात कोट्यवधी रुपयांची इंधन बचत होते आहे. अमेरिका पस्तीस टक्‍क्‍यांच्या वर इथेनॉलचा इंधन म्हणून वापरते. सुरवातीला खनिज तेलाच्या किमती आटोक्‍यात होत्या पण त्यात दिवसेंदिवस वाढ होत गेली. यामुळे या देशांनी हळूहळू इथेनॉलचा वापर करण्यास प्रारंभ केला.

पण दुर्दैवाने आजवर आपल्याकडे याची गांभीर्याने दखल घेतली नाही. भारतात क्षमता असूनही इथेनॉलचा प्रभावी वापर झाला नाही. मात्र इथेनॉल निर्मिती व वापराला प्रोत्साहन दिल्यास प्रचलित इंधनापेक्षा स्वस्त दरात इंधन उपलब्ध होऊन त्याचा सर्वांगीण फायदा होऊ शकतो, हे लक्षात घेऊन अलीकडेच रस्ते बांधणी व राजमार्ग मंत्रालयाने वाहन कंपनी बजाज तसेच टीव्हीएसला अशा मोटारसायकल तसेच ऑटो रिक्षा बनवण्याची परवानगी दिली आहे ज्या गाड्या १००% तांदूळ व गव्हाच्या मळीपासून बनवण्यात आलेल्या जैव-इथेनॉलवर चालतील.

 

tvs-inmarathi
drivespark.com

सरकार खनिज तेल आयात करण्याचा खर्च वाचवण्यासाठी बायो- इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आणण्याचा विचार करत आहे. या गाड्यांमध्ये आपल्याला महागडं प्रेट्रोल भरण्याची गरज उरणार नाही.

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितिन गडकरी यांनी या गोष्टीला पुष्टी दिली आहे की बजाज आणि TVS या मोटार कंपन्यांनी पेट्रोलशिवाय चालणाऱ्या मोटारसायकल प्रत्यक्षात तयार करून दाखवल्या. त्याचप्रमाणे त्यांनी अशा गाड्या मोठ्या प्रमाणात बनवण्यासाठी मंजुरी दिल्याचे सुद्धा स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले की तांदूळाच्या शेतजमिनीचा योग्य तो वापर केला जात नाही. उलट पंजाब-हरियाणा जिथे भातशेती जास्त प्रमाणात होते तिथे ही तांदळाची मळी पुढील पेरणीपूर्वी जाळली जाते. त्यामुळे दिल्ली व आजूबाजूच्या परिसरातील हवा प्रदूषित होते. एक टन तांदूळ उत्पादन होणाऱ्या जमिनीपासून 280 लीटर इथेनॉल मिळवलं जाऊ शकतं.

इतर इंधनांच्या तुलनेत बायो-एथनॉल खूप स्वस्त आहे. शिवाय ते तयार करण्याच्या प्रक्रियेचा खर्च सुद्धा कमी होतो.

भात, गहू, मका यांच्या मळीचा वापर करून हे इंधन बनविण्यात येते. हे इंधन पर्यावरणपूरक असून याने पर्यावरणाची हानी टाळली जाऊ शकते. त्याचप्रमाणे या इंधन वापराने पेट्रोल व डिझेलवरील आपलं अवलंबित्त्व मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतं.

 

ethanol-inmarathi
asiabiomass.jp

सरकारच्या आयात कमी करण्यासंदर्भातील आणखी उपक्रमांबद्दल बोलताना ते म्हणाले, आपण जवळपास ४०००० कोटी किमतीचे लाकूड आयात करतो, ४००० कोटी किंमतीची सुगंधी लाकडे, ३५००० रुपयांचा कागदाचा लगदा आणि ३५००० कोटी रुपयांचे वर्तमानपत्राचे कागद आयात करतो. अशा तऱ्हेने आपली सगळी मिळून एक करोडपेक्षा जास्त आयात लकडाशी संबंधित आहे. सरकारने ही आयतदेखील कमी करण्याचे ठरवले आहे.

यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना बांबूची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यामुळे बांबूची आयात कमी होण्यास मदत होईल. यासाठी प्रथमच सरकारने बांबूच्या झाडाला, झाडाचा दर्जा देण्यात आला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

One thought on “आता बजाज आणि TVS च्या मोटारसायकल आणि ऑटो रिक्षा चालणार प्रेट्रोलशिवाय !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?