' तुम्ही फक्त दिवसा नव्हे, तर रात्रीही वजन कमी करू शकता ! – InMarathi

तुम्ही फक्त दिवसा नव्हे, तर रात्रीही वजन कमी करू शकता !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वाढलेलं वजन ही समस्या आज जगभरातील लोकांच्या चिंतेचा विषय बनली आहे. कारण आज प्रत्येक पाचपैकी तिसऱ्या व्यक्तीला ह्या आजाराने ग्रासले आहे. ह्या समस्येने आता खूप मोठं रूप धारण केलं आहे. कारण ही समस्या विश्वस्तरावर पसरलेली आहे.

ह्याला कारणीभूतही आपणच आहोत. बदलती जीवनशैली, काम करण्याच्या पद्धती, कामाचा वेळ, विस्कटलेली दिनचर्या अशी अनेक कारणे ह्या आजारामागे आहे.

 

weight loss-inmarathi01
goodlookingbee.com

 

दिवसेंदिवस ही समस्या वाढतच जात आहे. ह्यावर जनजागृती पसरविण्यासाठी अनेक देशांनी, स्वयंसेवी संस्थांनी विश्वस्तरावर काम केले आणि आणि ते आजही करत आहेत. पण वाढत्या वजनाची ही समस्या आपल्यासोबत इतर आजारही घेऊन येते. त्यामुळे ह्यावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे.

 

obesity-inmarathi04
promedical.co.uk

 

आज लोक आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहेत. ते स्वतःची काळजी घ्यायला शिकत आहेत. कारण जर आपलं शरीरचं निरोगी, सुदृढ नसेल, तर आपण इतर ध्येय गाठू शकत नाही. त्यामुळे लोक आता स्वताहून ह्या आजारावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मग व्यायाम करणे, योग करणे, जिम जाने, डायटिंग करणे इत्यादी पर्याय आपण निवडतो.

 

obesity-inmarathi05
drweil.com

 

पण कधी कधी सर्वकाही करूनही आपलं वजन नियंत्रित होत नाही, मग अश्यावेळी आपण निराश होतो. पण ह्याला कारणीभूत आपल्याच काही चुकीच्या सवयी असतात ज्या आपल्याला फिट राहण्यापासून दूर सरतात. त्यामुळे वेळीच आपल्या चुकीच्या सवयी सोडून आपल्या शरीरासाठी उपयोगी ठरतील अश्या सवयींचा अवलंब करायला हवा.

 

weight loss-inmarathi03

 

सकाळी उठून धावायला जाणे, व्यायम करणे, योगा करणे, जिमला जाणे इत्यादी आपण करतो. तेथून आल्यावर आपण आपली हेल्दी दिनचर्या देखील पाळतो, म्हणजे काय खायचे, कधी खायचे, किती खायचे इत्यादी. पण आपण रात्री काय करतो. फक्त झोपतो.

पण तुम्हाला माहित आहे का, की ही रात्रीची वेळ देखील तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी वापरू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला रात्री जागून व्यायाम किंवा इतर काहीही करायची गरज नाही तर तुम्हाला केवळ काही रात्रीच्या सवयींचा आपल्या दिनचर्येत समावेश करायचा आहे. रात्रीच्या ह्या नियमांचे पालन केल्याने तुम्हाला वजन कमी करण्यात नक्कीच मदत मिळेल.

आपलं शरीर हे एका मशीनसारखं आहे. त्यामुळे जसं दिवसभरातील हालचाली तुमचं वजन कमी करण्यात मदत करतात तसेच रात्री देखील तुम्ही तुमच्या शरीराला वजन कमी करण्याच्या कामाला लावू शकता.

त्यासाठी तुम्हाला झोपायच्या आधी पुढील काही नियम पाळावे लागतील.

ग्रीन टी, ह्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहित आहे. ग्रीन टी वजन कमी करण्यात खूप मदत करते, म्हणून अनेक लोक साधा दुधाचा चहा न पिता ग्रीन टी घेतात. पण आपण सकाळी उठलो की सकाळच्या चहा एवजी ग्रीन टी घेत असतो. पण हीच ग्रीन टी जर आपण रात्री झोपायच्या आधी घेतली तर त्याने आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्‍मचा स्तर वाढतो. ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते.

 

obesity-inmarathi07
e-delikat.com

 

दुसरी गोष्ट म्हणजे मिरची. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, वजन कमी करण्यासाठी देखील मिरची फायद्याची ठरू शकते. त्यामुळे रोजच्या जेवणात मिरचीचा समावेश करावा म्हणजे वजन कमी होण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरु राहिलं.

 

obesity-inmarathi09
sorrisologia.com

 

रात्री झोपण्यापूर्वी साखर आणि स्टार्च कार्ब असतील असे पदार्थ खाऊ नये. कारण ह्यामुळे वजन वाढू शकत. इन्सुलिन हा शरीरातील मुख्य फॅट स्टोरेज हार्मोन असतात. जेव्हा इन्सुलिनचे प्रमाण कमी असते तेव्हा शरीरातील जमलेली चरबी घटण्याचे काम सुरु होऊन जाते. म्हणून रात्रीच्या वेळी कार्बयुक्त पदार्थांचे सेवन करण्यापासून टाळावे.

 

obesity-inmarathi08

 

अपूर्ण किंवा असंतुष्ट झोप हे देखील वजन वाढण्याचं एक मोठं कारण आहे. त्यामुळे वजन कमी करायचं असेलं तर चांगली आणि पूर्ण झोपही अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला चांगली झोपं लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ध्यान लावणे, संगीत ऐकणे, अंघोळ करणे इत्यादी उपाय तुम्ही करू शकता. ह्याने रात्री चांगली झोप येते.

चांगली झोप घेतल्याने शरीरातील मेटाबॉलिजम वाढते आणि चरबी कमी होण्यास कारणीभूत ठरते. झोपल्याने शरीरातील हार्मोन्स नियंत्रित राहतात. ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि शरीरतीत ऊर्जाही राखली जाते.

आजपासून रात्री झोपण्यापूर्वी ह्या चार नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि दिवसच नाही तर रात्रीही आपले वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरु ठेवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?