' "कहां राजा भोज, कहां गंगू तेली" या म्हणीमागची कधीही न सांगितली गेलेली कथा

“कहां राजा भोज, कहां गंगू तेली” या म्हणीमागची कधीही न सांगितली गेलेली कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण दैनंदिन जीवनात कित्येक म्हणी सर्रासपणे वापरतो. कित्येकदा आपल्याला त्या म्हणीचे, वाक्प्रचाराचे मूळ माहित नसते. पण कधीकधी अचानक त्या म्हणीमागच्या गोष्टी आपल्या समोर येतात आणि आपल्याला तिचा उगम कळतो.

छछूंदर के सर पे ना भाए चमेली
कहा राजा भोज कहा गंगू तेली
दुल्हे राजा मधलं फेमस गाणं…

आणि त्यात वापरलेली “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली” ही म्हण. कित्येकदा “तू कुठे आणि तो कुठे” या अर्थाने असलेली ही म्हण आपल्या तोंडात येते. एखादया मोठ्या व्यक्तीची तुलना दुसऱ्या सामान्य व्यक्तीशी करताना ही म्हण वापरतात खरी पण तिची गोष्टपण तितकीच रंजक आहे. या म्हणीमागे भोजराजाच्या पराक्रमाची गोष्ट लपलीये.

 

raja-bhoj_inmarathi
bhaskar.com

मध्यप्रदेशात भोपाळ पासून सुमारे अडीचशे किलोमीटर दूर धार जिल्हा आहे. त्याला भोजराजाची धारानगरी म्हणतात. हे शहर म्हणजेच ११ व्या शतकातील माळवा राज्याची राजधानी. ज्या भोजराजाने हे शहर वसवलं त्या राजाची मोठे मोठे विद्वान आजतागायत प्रशंसा करत आले आहेत.

भोज राजा हा केवळ प्रतिभावंत च नव्हता तर तो शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा ज्ञाता होता. त्याने वास्तुशास्त्र, व्याकरण, आयुर्वेद, योग, साहित्य आणि धर्म यावर अनेक ग्रंथ लिहिले आणि टीका – टिपण्णी देखील केली आणि ती कोणत्याही विद्वानांच्या तोडीची होती.

असं म्हणतात, की मध्यप्रदेश ची राजधानी असलेले भोपाळ हे एके काळी “भोजपाल” म्हणून ओळखले जाई.

भोजपाल म्हणजे ज्याचा पालनकर्ता , राजा भोज आहे असे ते. नंतर त्याचा अपभ्रंश होत होत त्यातील ज हे अक्षर जाऊन त्याचं नाव “भोपाल” पडलं. भोपाळ शहरात प्रवेश करतानाच भोज राजाची एक विशाल मूर्ती आपल्या नजरेस पडते. ११ व्या शतकात भोजराजाने कित्येक मंदिरे बांधली. इमारती बांधल्या.

त्यातली एक म्हणजे भोजशाला. भोज राजा सरस्वतीचा उपासक होता. त्याने शिक्षणाच्या प्रसारासाठी भोजशाळा उघडली. भोजशाळेत सरस्वतीच्या एका मूर्तीची सुद्धा स्थापना केली होती जी आज लंडनमध्ये आहे.

पण आज आपण या भोजराजाला ओळखतो ते “कहां राजा भोज कहां गंगू तेली ” या म्हणीमुळे. तर कोण होता हा गंगू तेली… तर गंमतीची गोष्ट अशी की गंगू तेली अशी कोणी व्यक्ती अस्तित्त्वातच नव्हती.

“गंगू तेली नहीं अपितु गांगेय तैलंग”
गंगू तेली नव्हे, तर गांगेय तैलंग

 

gangu-inmarathi
abpnews.abplive.in

 

गंगू म्हणजे गांगेय कलचुरि नरेश आणि तेली म्हणजेच चालुका नरेश तैलय या दोन्ही राजांनी संयुक्त सेना घेऊन भोजराजावर आक्रमण केले. हे दोघे दक्षिणेकडचे राजे होते. त्यांनी धार नागरीवर आक्रमण केलं होतं. एकत्र येऊन सुद्धा भोजराजाला हरवू शकले नव्हते.

त्यांचा या युद्धात सपेशल पराभव झाला. तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणाली “कुठे राजा भोज आणि कुठे गांगेय तेलंग”. त्याचा अपभ्रंश होऊन नंतर लोक “गंगू तेली” म्हणू लागले. आणि त्यातून “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली” ही म्हण रूढ झाली.

तर ही आहे “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली ” या म्हणीची न सांगितलेली गोष्ट.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?