' ही एक गोष्ट तुम्ही फिट रहाण्यासाठी म्हणून तुम्ही करताय - पण त्याने खरंतर आरोग्याची अपरिमित हानी होत असते

ही एक गोष्ट तुम्ही फिट रहाण्यासाठी म्हणून तुम्ही करताय – पण त्याने खरंतर आरोग्याची अपरिमित हानी होत असते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मानवी शरीराच्या जडणघडणीसाठी अत्यंत आवश्यक अन्नघटक म्हणजे प्रथिनं. मानवी शरीर कार्यरत राहण्यासाठीही प्रथिनांची आवश्यकता असते.

जेव्हा अन्नपचनाची प्रक्रिया सुरु असते, तेव्हा प्रथिनांचं पोटात विघटन होतं आणि त्यातून शरीराला आवश्यक अशी अमिनो आम्लं मिळतात. नैसर्गिकरीत्या प्रथिनं मिळवण्याचे अनेक स्त्रोत आहेत.

मांस, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, द्विदल धान्यं, अंडी अशा अनेक पदार्थांपासून आपल्याला प्रथिनं मिळतात.

तशी प्रथिनांची आवश्यकता लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना असते. पण खेळाडू आणि शारीरिक ताकदीची कामं करणाऱ्या लोकांना ही गरज इतरांपेक्षा जास्त असते असं मानलं जातं.

आणि मग या समजुतीमुळे अन्नापासून मिळणाऱ्या प्रथिनांव्यतिरिक्त इतर स्त्रोतांपासून प्रथिनं मिळवण्याचे प्रयत्न सुरु होतात.

पुढे, या “हिरो”ज ना बघून सामान्य माणूस देखील त्याच मार्गावर जातात…आणि सुरु होते आरोग्याची अपरिमित हानी…

 

best-protein-powder-product-inmarathi
seannal.com

 

सध्या या प्रथिनस्त्रोतांचा किंवा supplements चा बाजार जोरात आहे. व्यावसायिक खेळाडूच नव्हे तर हौशी व्यायामपटू आणि वजन कमी करण्याची इच्छा असलेले लोक या प्रथिनस्त्रोतांच्या मागे अक्षरशः वेड्यासारखे धावताहेत.

या लोकांसाठी या प्रथिनस्त्रोतांचा मुख्य परिणाम – ताकद वाढवणे किंवा वजन कमी करणे – हाच सर्वात महत्वाचा आहे.

पण यांच्या अतिरेकामुळे होऊ शकणाऱ्या दुष्परिणामांकडे अजून कुणाचं फारसं लक्ष गेलेलं दिसत नाही.

ही उत्पादनं बाजारात आणणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांना अशा दुष्परिणामांबाबत सजग करणं, किमान त्यांची जाणीव करून देणं याची अपेक्षा आहे, पण त्याही आघाडीवर सगळा आनंदीआनंद आहे. त्यामुळे अशा प्रथिनस्त्रोतांच्या दुष्परिणामांबद्दल ग्राहकांनीच जागरूक असणं आवश्यक आहे.

कृत्रिम प्रथिनस्त्रोतांचे तीन प्रमुख दुष्परिणाम आढळून आलेले आहेत –

१. एकंदरीत तब्येत ढासळणं –

tiredness inmarathi
everyday health

वजन उतरवण्यासाठी जे कृत्रिम प्रथिनस्त्रोत वापरण्यात येतात, त्यांच्यात अनेक प्रकारची उत्तेजक द्रव्यं वापरलेली असतात. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची जीवनशैली बैठी असेल, तर वजन कमी करणं हे जवळपास अशक्य आहे.

वजन जास्त असलेल्या व्यक्तींना जर जास्त हालचाल करायची असेल तर त्यांना त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी त्यांना उत्तेजकांची आवश्यकता असते. दुसरं कारण म्हणजे ही उत्तेजक द्रव्यं अतिरिक्त उष्मांकांचं ज्वलन करतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बहुसंख्य उत्तेजक द्रव्यं ही भुकेवर दबाव आणून भूक कमी करतात.

त्यामुळे अवाजवी खाण्याचा धोका कमी होतो. पण यामुळे शरीराला आवश्यक असलेली पोषणद्रव्यं मिळत नाहीत. त्यामुळे हाडं, स्नायू, रक्त या सगळ्यांच्या वाढीवर आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो आणि तब्येत ढासळते.

२. यकृताचे प्रश्न –

 

side-effects-inmarathi
seannal.com

 

प्रोटीन वर्ल्डसारख्या कृत्रिम प्रथिनस्त्रोतांमध्ये हरित चहाचा अर्क वापरलेला असतो. अनेक वजन उतरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रथिनस्त्रोतांमध्ये हरित चहाचा अर्क हा एक लोकप्रिय घटक आहे.

पॉलिफेनॉल्स आणि अँटि-ऑक्सिडंट गुणधर्म असणारी फ्लॅव्हॅनॉल्स ही दोन प्रकारची संयुगं हरित चहामध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर त्यात कॅफीनही असतं आणि त्यामुळे हरित चहाचं भरपूर प्रमाणात सेवन केल्यास अस्वस्थता, निद्रानाश आणि डोकेदुखी हे त्रास उद्भवू शकतात. अर्थात, हे एवढेच त्रास त्यापासून होत नाहीत.

अनेक लोकांमध्ये हरित चहाचा अर्क घेतल्यानंतर यकृताचे त्रास आढळून आलेले आहेत. जर तुमची त्वचा पिवळट झाली असेल, मूत्राचा रंग गडद तपकिरी झाला असेल आणि पोटात दुखत असेल, तर तुम्ही प्रोटीन वर्ल्ड घेणं ताबडतोब थांबवलं पाहिजे.

हा त्रास तुम्हाला त्यात असलेल्या हरित चहाच्या अर्कामुळे होत असण्याची दाट शक्यता आहे. जितका जास्त काळ तुम्ही प्रोटीन वर्ल्ड घ्याल, तितकी असा त्रास होण्याची शक्यता आणि त्रासाची तीव्रता हे दोन्हीही वाढतील.

३. व्यसनाधीनता –

 

suppelment-inmarathii
healthline.com

अशा प्रकारच्या पदार्थांच्या बराच काळ केल्या गेलेल्या वापरामुळे शारीरिक आणि मानसिक व्यसनाधीनता विकसित होऊ शकते. त्यातून बाहेर पडणं हे खूपच कठीण असू शकतं.

बरेच वेळा लोक त्यांच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणाऱ्या पदार्थांवर मानसिकदृष्ट्या अवलंबून राहतात आणि त्यांना हळूहळू त्याचं व्यसन लागतं.

त्यांना असं वाटतं की आपण जर हे पदार्थ घेणं थांबवलं, तर वजन वाढणं आणि त्याच्याशी संबंधित बाकीचे प्रश्न परत उद्भवतील.

कदाचित असं असू शकतं की अशा प्रकारच्या चरबी कमी करणाऱ्या पदार्थांपासून कुठलाही सकारात्मक परिणाम आता त्यांच्या शरीरावर होणार नाही आणि त्यांचं वजन अजिबात कमी होणार नाही.

हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं कारण आपलं शरीर अनेक उत्तेजकांना विरोध करतं आणि त्यामुळे उत्तेजकांच्या असलेल्या पातळीने शरीरावर काहीही परिणाम होत नाही. पण अशा लोकांचा मेंदू त्यांचा बुद्धिभेद करतो.

शारीरिक व्यसनाधीनता ही कॅफीन असलेल्या प्रथिनस्त्रोतांमुळे जी तरतरी येते, त्याच्याशी प्रामुख्याने संबंधित असते.

जर एखाद्याने अशी उत्तेजकं वापरायची नाहीत असं ठरवलं, तर शरीराला आधीच्या उत्तेजित परिस्थितीत परत न्यायची गरज त्याला वाटू शकते. अशा प्रकारच्या व्यसनातून बाहेर पडणं हे मानसिक प्रकारच्या व्यसनातून बाहेर पडण्यापेक्षा नक्कीच सोपं आहे.

कारण त्यासाठी प्रयत्न आणि वेळ हे दोन्हीही बऱ्याच कमी प्रमाणात लागतात. पण ही व्यसनाधीनता ही अप्रत्यक्षपणे आपल्या आरोग्यावर परिणाम करते.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?