यशस्वी लोक या ५ गोष्टी चुकूनही करत नाहीत – म्हणूनच यशस्वी होतात…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धा ही परस्परविरोधी भावनेला जन्म देत असते. यातून स्पर्धेत पुढे येण्यासाठी अनेकदा शॉर्टकट्स शोधले जातात.

अशावेळी नैतिकतेलाही सोडचिठ्ठी दिली जाते. अशा मार्गाने आपण यशस्वी झालो तरी आपल्याला समाधान मात्र मिळत नाही.

त्यामुळे जर आपल्याला मिळालेल्या यशाचा आपल्या विरोधकानेदेखील सन्मान करावा, यशाची श्रृंखला अखंडित राहावी असं आपल्याला वाटत असेल तर

आपण काय करायला हवं या इतकंच किंबहुना यापेक्षा अधिक आपण काय करू नये हे कळणं आवश्यक आहे.

पुढे सांगितलेल्या गोष्टी यशस्वी माणसांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. नेमक्या कोणत्या गोष्टी आपलं यश आणि आपल्या मध्ये येतात आणि आपल्याला यश मिळवण्यापासून रोखतात हे आता पाहू.

 

१. पूर्वग्रह

यशस्वी मनुष्य एखादी गोष्ट पूर्वग्रहदूषित मनाने पाहत नाही. ही माणसे ओपन माईंडेड असतात. त्यामुळे इतर लोकं दुर्लक्ष करतील अशा संधी ती माणसं सहजतेने हेरतात.

उदाहरणच द्यायचं झालं तर आज भारताची हेल्थकेयर सेक्टरमधली प्रगती आणि उत्तम हेल्थ इंफ्रास्ट्रक्चरमुळे काही वर्षांपूर्वी भारतात नावालाही नसलेलं मेडिकल टूरिजम दिवसेंदिवस विकसित होत आहे.

 

preoccupiedness-inmarathi
crimtan.com

 

कारण भारतात इतर विकसित देशांच्या तुलनेत इलाज स्वस्त होतो. तसंच भारताची वैशिष्ट्य असलेल्या आयुर्वेद, नॅचरल थेरेपी यासोबतच भारतातील आधुनिक वैद्यकीय इलाज लोकांना भुरळ पाडत आहे.

यामुळे प्रतिवर्षी सुमारे एक- दीड लाख मेडिकल टूरिस्ट भारतात येतात.

 

२. उद्धटपणा :

यशस्वी लोकांनी उद्धट असून चालत नाही. किंबहुना ती उद्धट नसतात.

ती हुशार असतात. नम्र असतात. उच्चशिक्षित असतात. ती बहुभाषी असतात. त्यामुळे त्यांना जगात इतरत्र पसरलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर बोलायला कोणा दुभाषाची गरज पडत नाही.

 

rudeness-inmarathi
wsj.com

 

त्यांना भरपूर छंद असतात. त्यांना विविध संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी भ्रमंती करायला आवडते. ही जात्याच कलावंत प्रवृत्तीची असतात.

त्यामुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधण्याची त्यांना सवय असते.

 

३. भांडण-तंटा

कोणत्याही लहानसहान गोष्टीवरून भांडण हे व्यवसायासाठी वाईटच. यशस्वी लोकांना शांतता, खेळीमेळीचे वातावरण आवडते आणि त्यासाठी ती तडजोडी करायला तयार असतात.

काही न काही मधला मार्ग काढून ते परिस्थितीवर तोडगा काढतात. शेवटी काम यशस्वी तेव्हाच होतं जेव्हा तुमचा स्टाफ, तुमच्या हाताखाली काम करणारी माणसं खूष असतील.

त्यामुळे यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या माणसांना भांडणात रस नसतो. ते शक्यतोवर भांडणे टाळायचा प्रयत्न करतात.

 

rude people inmarathi
knot9

 

ते भांडणापेक्षा सुसंवाद आणि तंट्यापेक्षा शांततेला प्राधान्य देतात. ते त्यांच्या विरोधकांशी सुद्धा मैत्रीचे संबंध ठेवतात.

खरंतर हुशार विरोधकांपासूनसुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं. कोणी विचारवंताने म्हटलेच आहे, की तुम्ही एखाद्याला जिंकू शकत नसाल तर त्याला तुमचा मित्र बनवा. तो तुमची ताकद बनू शकतो.

 

४. भीती

भित्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ते काही उगीच नाही. भीती ही विषासारखी असते. ती तुम्हाला आतून पोखरत जाते. तुम्हाला जखडून ठेवते.

तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर भीती हा शब्द तुम्ही तुमच्या शब्दकोशातून वगळायलाच हवा.. कारण जो घाबरतो तो यशस्वी होत नाही.

भीतीमुक्त होण्यासाठी स्वयंप्रेरणा, उत्साही वृत्ती आणि खंबीर असण्याची गरज असते.

 

Fear-Man-inmarathi
youngisthan.in

 

यशस्वी माणसं जगाला दिशा देण्याचं काम करतात. त्यांना पुढे वाढून ठेवलेल्या परंतू माहीत नसलेल्या गोष्टींची भीती नसते. ते येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायला आणि त्यातून मार्ग काढायला सज्ज असतात.

जेव्हा इतर जण संकटाच्या भीतीने थबकतात तेव्हा ही माणसं त्या संकटाशी दोन हात करायला त्याच्या पुढे उभी ठाकतात.

आणि त्यांची हीच वृत्ती त्यांना नेता, लीडर बनवते. समाजाला पुढे नेणारा तो नेता.

लोकं त्यांचा आदर्श बाळगतात. आणि ह्यातूनच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. आव्हान स्वीकारायची वृत्ती तुम्हाला पुढे जायला बळ देते आणि तुम्हाला पुढच्या संधी शोधायला भाग पाडते.

 

५. वैयक्तिक आयुष्यातील प्रॉब्लेम्स :

आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील चढ-उतार आपल्याला आपल्या कामावर लक्ष पूर्णपणे एकाग्र करू देत नाहीत. पण यशस्वी माणसं आपल्या दुःखाचं भांडवल करत नाहीत. ते त्याला सुद्धा आपली ताकदच बनवतात.

कोणत्याही नकारात्मक घटनांना ते आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ देत नाहीत. ते आपलं करिअर आणि कुटुंब यांचा योग्य तो मेळ घालतात.

आणि दोन्हीही यशस्वी करून दाखवतात.

 

problems-inmarathi
teachpedia.blogspot.in

 

अशा प्रकारे माणसांकडून घडणाऱ्या चुका माणसाचं यशस्वी होणं लांबणीवर टाकत असतात. म्हणून यशस्वी लोकं अधिकाधिक चुका टाळायचा प्रयत्न करतात आणि जास्तीत जास्त संधींचा लाभ घेतात.

संकटांकडेही, ही लोकं संधी म्हणून बघतात. एखादी नवीन गोष्ट चालू करत असताना तिच्याबद्दल यशस्वी लोकांचं मन पूर्वग्रहदूषित नसतं.

तसंच ते सुसंवादी असतात. त्यांना आपण यशस्वी होऊ अगर नाही याची भीती नसते.

यशाची गुरुकिल्ली वगैरे असते का माहिती नाही पण यशस्वी लोकं राज्य करतात मनामनांवर…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?